भारत हा जगातील, लोकशाही स्वीकारलेला एक मोठा देश, म्हणून ओळखला जातो. सरंजामशाहीतून पारतंत्र्यात गेलेल्या व कालांतराने स्वतंत्र झालेल्या देशांना उपलब्ध पर्यायांतून तसा नवीन व फारसा वादग्रस्त नसलेला लोकशाहीचा पर्याय निवडावा लागल्याने अनेक देशांनी तो स्वीकारला देवील. यापूर्वीच लोकशाही स्वीकारलेल्या व नांदवणाऱ्या देशांची उदाहरणे समोर असतानाच लोकांची, लोकांसाठी, लोकांकरवी हे लोकशाहीचे ब्रीदवाक्यच साऱ्या नागरिकांना लुभावणारे व आश्वासक वाटल्याने आता आपली सत्ता आली म्हणजे नवराष्ट्र हे सर्वांना हितकारी ठरेल हा भाबडा आशावादही त्यामागे होता. मात्र लोकशाही स्वीकारणे व ती अंगीकारणे यातली तफावत लक्षात न आल्याने व केवळ लोकशाही स्वीकारल्याने सारे प्रश्न सुटतील असे गृहीत धरल्याने आज आपल्याला लोकशाही असून देखील एक सर्वव्यापी जनअसंतोषाला सामोरे जावे लागते आहे.
आत्मा आणि पुनर्जन्म : सत्य की कपोलकल्पित? (भाग-१)
भारतामध्ये आणि त्यांत प्रामुख्याने हिंदूंमध्ये आत्मा, पुनर्जन्म या गोष्टी अगदी रोमारोमांत भिनल्या आहेत. श्रीमद्भगवद्गीतेतील ‘वसे देहांत सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा’ ‘मारोत देहास परी मरेना’ आणि त्याचबरोबर
‘सांडुनिया जर्जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवीन।
तशींचि टाकूनि जुनी शरीरें आत्माहि घेतो दुसरी निराळीं।
आणि म्हणूनच ‘जन्मतां निश्चयें मृत्यु मरतां जन्म निश्चयें।
असे भगवंतांनी आणि हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या थोर ऋषिमुनींनी सांगून ठेवले असल्यामुळे अनादि काळापासून हे तत्त्वज्ञान खरेच असले पाहिजे अशी जनसामान्यांचीच नाही तर अगदी उच्चशिक्षित डॉक्टर्स, इंजीनिअर्स, व शास्त्रज्ञांचीही खात्री आहे.
मानवी अस्तित्व (६)
माझ्यात जाणीव आली कुठून?
आपण कालकुपीत बसून आपला जन्म होण्यापूर्वीच्या काळात जायचे ठरविल्यास आपण त्यावेळी कुठे होतो, हे सांगता येईल का? पुन्हा एकदा कालकुपीत बसून आपल्या मृत्यूनंतरच्या भविष्काळातील फेरफटका मारण्याचे ठरविल्यास आपण कुठे आहोत, हे तरी सांगता येईल का? स्पष्ट सांगायचे तर आपण कुठेही नाही. एके दिवशी आपल्या तुटपुंज्या आयुष्याची काही कारण नसताना सुरुवात होते व विनाकारण समाप्तही होते. किती गुंतागुंत व गोंधळ? फक्त आयुष्याचा विचार करण्यासाठी जाणीव नावाची चीज असल्यामुळे असले भंपक प्रश्न आपल्याला सुचत असावेत, असेही वाटण्याची शक्यता आहे.
सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे
सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे
आधुनिक भांडवलशाहीचा जन्म झाला आणि आधुनिक औद्योगिकीकरण उदयास आले, त्यावेळी, ज्यांना पाश्चात्त्य संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणता येईल, असे काही विचारवंत निर्माण झाले. त्यांनी व्यक्तीच्या पराक्रमावर सरकारचे कसलेही बंधन असू नये, असे प्रतिपादन करण्यास सुरुवात केली. ‘प्रायव्हेट एन्टरप्राईजेस’ (खासगी उद्योगा)मुळे सर्वांनाच संधी मिळते. प्रत्येकाने आपापले हित पाहावे, म्हणजे सर्वांचेच हित साधेल, व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहील, ‘ग्रेटेस्ट गुड ऑफ दि ग्रेटेस्ट नंबर’ (जास्तीत जास्त लोकांचे हित) याच मार्गाने साधू शकेल, अशा प्रकारचे त्यांचे तत्त्वज्ञान होते.
सरंजामशाहीच्या जमान्यात सर्वसामान्य व्यक्तीला फारच थोडे स्वातंत्र्य असे.
पत्रसंवाद
प्रमोद सहस्रबुद्धे, बी 4/1101 विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल कम्पाउंड, ठाणे (पश्चिम) 400 607
मेंदू-विज्ञान विशेषांक : एक प्रतिक्रिया
मेंदू-विज्ञान विशेषांक (खरे तर मेंदू-विज्ञान-तत्त्वज्ञान विशेषांक म्हणायला हवे.) हा अंक वाचताना एक उत्सुकता होती. मेंदूविज्ञानातील प्रगती अजूनही तत्त्वज्ञानातील प्रश्न सोडवण्या इतपत झालेली नाही असे माझे एक मत होते. त्यामुळे हे दोन विषय संलग्न नाहीत असे मला वाटत असे. हा अंक वाचताना माझ्या मताविषयी काही मजकूर येऊन माझे मतपरिवर्तन होईल अशी एक शक्यता वाटत होती आणि म्हणून त्याबद्दल उत्सुकता होती.
अंक वाचताना आणि तयार होताना असे जाणवले की संपादकांनी बरीच मेहनत घेऊन अंक तयार केला आहे.
‘दोन टिपणे
दुष्काळाशी दोन हात
दुष्काळाची चर्चा सुरू झाली की विरोधी पक्षांचे नेते म्हणतात, सरकारने रोजगार हमीची कामे काढावीत, गुरांच्या छावण्या उघडाव्यात, पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत. फार फार तर कर्जाची वसुली थांबवावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. सरकार म्हणते, दुष्काळ निवारणासाठी आम्ही इतकी रक्कम मंजूर केली, अमुक इतकी कामे सुरू केली, एवढ्या छावण्यांना एवढी मदत केली, इतके टँकर सुरू केले, फी माफ, कर्ज वसुली स्थगित.. झाले. बघता बघता दिवस निघून जातात. पुन्हा दुष्काळाची परिस्थिती येते. विरोधी पक्षवाले पुन्हा मोर्चे काढतात. सत्ताधारी बैठका घेतात.
सुखाकडे जाणारी वाट
गेल्या दोन हजार वर्षांपासून प्रामाणिक नीतिवाद्यांमध्ये सुखाला, आनंदाला तुच्छ लेखण्याची, दूर ठेवण्याची (त्यापासून दूर पळण्याची म्हणाना!) चाल आहे. ‘सहनं परमो धर्मः’ मानणाऱ्या तितिक्षावादी (स्टोईक) लोकांनी सुखाचा उपदेश करणाऱ्या एपिक्युरसवर ‘हल्लाबोल’ केला. त्याच्या उपदेशाला ‘फालतू तत्त्वज्ञान’ म्हणून हिणवले आणि त्याच्याबद्दल नाही नाही त्या वंदता पसरवून आपला ‘वरचढपणा’ सिद्ध केला. ही तर प्राचीन गोष्ट म्हणून सोडून देऊ. त्याच्या २००० वर्षांनंतर काय झाले? जर्मन प्राध्यापकांनी असे काही सिद्धान्त शोधून काढले, की ज्यामुळे जर्मनीचे तर अधःपतन झालेच, परंतु संपूर्ण जगावरच ही आजची अवकळा आली. ह्या सर्व लोकांना सुखाचा तिटकारा होता.
विज्ञान, तंत्रज्ञान व गांधीजी
“यंत्रसामुग्री हे आधुनिक समाजाचे मुख्य प्रतीक आहे. ते खूप मोठे पाप आहे.”
“नई तालीम ह्या माझ्या योजनेमध्ये अधिक चांगली ग्रंथालये, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था असतील. रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि इतर तज्ज्ञ ह्यांची फौज असेल. हे लोक राष्ट्राचे खरे सेवक असतील आणि आपले हक्क व गरजा ह्यांच्याबाबत सजग झालेल्या जनतेच्या विविध आणि वाढत्या गरजांना ते पुरे पडतील. हे तज्ज्ञ जेव्हा परकीय भाषा न बोलता लोकांची भाषा बोलतील, त्यांनी संपादन केलेले ज्ञान ही जनतेची सामाईक मालमत्ता मानली जाईल, तेव्हाच निव्वळ नक्कल न होता खरे मूलभूत स्वरूपाचे काम होईल आणि त्याचे मूल्य समान व न्यायी पद्धतीने सर्वांमध्ये विभागले जाईल.”
कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आजच्या हलाखीच्या स्थितीवर उपाय
मी ह्या विषयातला तज्ज्ञ नाही; फक्त माझ्या मनात विचार, त्यावर चर्चा सुरू व्हावी ह्यासाठी, पुढे मांडत आहे.
महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील कोरडवाहू शेतकरी आज मरणासन्न स्थितीत आहे. त्याच्या करुण अवस्थेची वर्णने सर्वत्र वाचायला मिळतात. त्यातल्या त्यात कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या हालांना तर सीमाच नाही, त्यांचे हाल कुत्रादेखील खात नाही.
त्यांच्या परिस्थितीचे सविस्तर वर्णन करण्याची गरज नाही.
पन्नास वर्षांपूर्वी त्यांची स्थिती इतकी वाईट नव्हती. ते कर्जबाजारी होते; पण त्यांच्यावर आत्महत्या करण्याचा प्रसंग क्वचित् येत होता. मग आताच स्थितीत असा कोणता फरक पडला की ज्यामुळे त्यांची स्थिती मरणासन्न झाली?
लोकनेता: शाहणा
मे महिन्यातली सकाळ! कडक उन्हाळा! सकाळचे नऊ-साडेनऊ वाजलेले! काल संध्याकाळी गावाशेजारच्या मोठ्या गावात मोर्चा निघालेला होता, व शेवटी मोर्चा सरकारी धान्याच्या गोडाउनवर गेला. नंतर पोलिसांच्या लाऊडस्पीकरवरून कडक सूचना. शेवटी मोर्चेकऱ्यांनी न ऐकल्याने लाठीमार, अश्रुधूर व गोळीबाराचे आदेश. सात-आठ लोकांचा गोळ्या लागल्याने जागेवरच मृत्यू व अनेक जखमी. बाकीचे हौशे-नवशे आपापल्या गावांकडे पळाले.
अर्थातच रात्री व रात्रभर याची चर्चा गावागावांत चालू होती. पोलिसांच्या समोर सरकारी गोडाऊन फोडण्याच्या घटनेमुळे लोकांना एकप्रकारचा आत्मविश्वास आलेला होता. आपल्याला हवी असलेली वस्तू सरकारी मालकीची व सरकारी बंदोबस्तात असली तरी ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो!