बंजारा समाजातील बहुसंख्य गीते स्त्रियांनी गायिलेली आहेत. त्यामुळे स्त्रीमनाच्या सामूहिक नेणिवेतील स्त्रीनिष्ठ अनुभवांचे पोत तपासून पाहण्याची संधी येथे घेतली आहे. जॅस मारितेनया मते, काव्याचा उगमच माणसाच्या समग्र व्यक्तिमत्त्वात आहे. तो म्हणतो, “It proceeds from the totality of the man, sense, imagination, intellect, love, desire, instinct, blood and spirit together” मानवाच्या आत्मकेंद्रात संवेदनशक्ती, कल्पनाशक्ती, बुद्धी, प्रेम, इच्छा आणि सहजप्रवृत्ती इ.साऱ्या गोष्टी एकत्र नांदत असतात. काव्यनिर्मितीच्या वेळी या आत्मकेंद्राशी संवाद साधला जातो आणि व्यक्तीच्या सामूहिक निश्चेतनातील निगूढ भावाशय काव्यात रूपबद्ध होऊ लागतो. लोकगीतात मात्र ‘मी’ कटाक्षाने टाळलेला आढळतो.
आत्मा आणि पुनर्जन्म : सत्य की कपोलकल्पित? (भाग-२)
बहिर्गमन ही काय भानगड आहे?
गर्भनलिकेमध्ये जेव्हा वडिलांकडून आलेले पुंबीज आणि आईकडून आलेले स्त्रीबीज (Ovum) यांचा संयोग होतो तेव्हा आत्मा त्यात प्रवेश करतो आणि माणसाच्या मृत्यूच्या वेळी तो बाहेर पडतो अशी कल्पना आहे. ही कल्पना शास्त्राद्वारे चुकीची सिद्ध करण्याचा हा प्रयत्न:
1) एका वीर्यामध्ये (साधारण पाव चमचा) सहा ते बारा दशलक्ष शुक्राणू असतात. वीर्यपतनाच्या वेळी साधारण 3-4 घनसेंमी वीर्य पडते म्हणजे एका समागमाच्या वेळी दोन ते तीन कोटी इतके शुक्राणू मातेच्या योनिमार्गात सोडले जातात. त्यांतील फक्त एक शुक्राणू स्त्रीबीज फलित करतो.
मानवी अस्तित्व (७)
माणसात ‘स्वत्व’ (self) असे काही असते का?
आपण जेव्हा झोपतो तेव्हा ती नाहीशी होते. जागे होतो तेव्हा परत आपोआप आलेली असते. काही वेळा स्वप्नात येते. काही वेळा स्वप्नच गायब झालेले असतात. हे शरीर माझेच आहे व मीच त्याचे नियंत्रण करत आहे याची जाणीव देणारे असे काही तरी आपल्यात असावे. त्यामुळे आपण आपली वेगळी ओळख पटवून देत असतो. हीच ओळख आयुष्यभर आपली सोबत करते; काही वेळा अनुभवांच्या आठवणीतून व काही वेळा भविष्यात डोकावून. हे सर्व एखाद्या गाठोड्यासारखे वाटते. तेच कदाचित आपल्यातील ‘स्व’ची जाणीव असू शकेल.
न केलेल्या चुकीची अद्दल
श्री बाळ ठाकरे यांच्या मृत्यूनंतर मुंबईत पाळल्या गेलेल्या बंदमुळे वैतागलेल्या एका तरुणीने त्याबद्दलची नाराजी फेसबुकवर लिहिली आणि त्या माध्यमाच्या पद्धतीने तिच्या एका मैत्रिणीने ‘मला पटतं’ म्हटले. या साध्याश्या, खरे म्हणजे अगदी निरुपद्रवी कृतीची फार मोठी किंमत या मुलींना आणि अनेकांना भरावी लागली आहे. या दोन मुलींना अटक करून अर्ध्या रात्रीपर्यंत पोलीसचौकीत डांबण्यात आले. एकीच्या नातेवाईकांच्या इस्पितळाचे सुमारे पंचवीस लाखांचे आणि दुरुस्त करून घेण्यासाठी लागणाऱ्या अनंत तासांचे नुकसान झाले. त्यावेळी इस्पितळात असलेल्या रुग्णांचे काय झाले; त्यांना मार बसला असेल, लावलेले सलाईन उघडले असेल.
नैतिक इहवादाच्या आड येणाऱ्या अस्तिकता नेमक्या कोणत्या?
राजकीय संदर्भात ‘सेक्युलॅरिझम’चा इहवाद हा सरळ अर्थ घेऊन, कायदे बनविताना कोणत्याच संप्रदायाचा आधार न घेणे आणि नागरिकाचा संप्रदाय कोणता या आधारावर कोणताही भेदभाव न करणे, अशा स्वरूपात हा प्रश्न सोडविला गेलेला नाही. त्याऐवजी सर्वधर्मसमभाव हा संभ्रम वाढवणारा शब्द रुळला आहे. कोणताही जमातवाद हा ‘बाहेरच्यां’चे अधिकार नाकारणारा समूहवाद असतो व म्हणून त्याज्य असतो असे न मानले जाता अल्पसंख्य/बहुसंख्य यांच्यात समूहवादी ‘समता’ आणण्याच्या भरात जमातवाद चालूच ठेवले गेले. यावरून जे राजकीय वाद आहेत ते ह्या लेखाच्या विषयात घेतलेले नाहीत.
व्यक्तीने स्वतः न निवडलेला संप्रदाय कुटुंबात शिकविला जातोच.
हिंदूच्या देवळांची उत्पत्ती
हिंदूच्या देवळांची उत्पत्ती
इसवी सनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकापर्यंत हिंदुजनांत व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्धधर्माचा पाडाव करून भटी वर्चस्वस्थापनेसाठी महाभारताच्या व रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. मात्र त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षूच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ, मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघमंदिरांत महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजाअर्चा बौद्धाच्या हीनयान पंथाने सुरू केल्या.
पत्रसंवाद
वृन्दाश्री दाभोलकर, 57, प्रतापसिंह कॉलनी, बारावकरनगर (संभाजीनगर), सातारा 415004. (मोबा.9881736366)
बंधुभाव हा शब्द आपण वापरतो. आसुच्या अलीकडील दोन्ही अंकांत तो अनवधानाने असावा-वापरलेला आढळला. हा शब्दप्रयोग अतिशय आक्षेपाहे आहे हे कुणीही विवेकवंत मान्य करेल.
‘बंधुभाव’ यात भगिनीभाव अध्याहृत/गृहीत धरलेला आहे. पण ही समावेशकता या शब्दात वस्तुतः अजिबात नाही. परंपराझापड असल्यामुळे त्यातील आक्षेपार्हता कुणाच्या सहजी लक्षातही येत नाही.
आपण सभेत बोलताना कायम ‘बंधुंनो व भगिनींनो’ (भगिनींनो असे स्वतंत्रपणे) संबोधतो. त्याच जातकुळीतील हा प्रकार असल्याने आपण त्याच धर्तीवर बंधुभाव ऐवजी बंधुभगिनीभाव हा शब्द वापरणे युक्त आहे.
मी अश्रद्ध का आहे? (प्रश्नकर्ते पॉल क्रूझ यांना श्रद्धांजली)
अमेरिकेतील निधर्मी, मानवतावादी तत्त्वचिंतक पॉल कुर्झ ह्यांचे नुकतेच निधन झाले. विविध प्रकारच्या विज्ञानातील निराधार अपसमज, गूढवाद, बुवाबाजी, प्रसारमाध्यमांतील भोंदूगिरी आणि सर्व रूपांतल्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व धर्मभोळेपणा ह्यांचा बीमोड करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. परमेश्वराच्या संकल्पनेशिवाय निकोप सामाजिक व नैतिक आयुष्य जगण्यासाठी युप्रैक्सोफी नामक विज्ञानाधिष्ठित पर्याय त्यांनी लोकांसमोर ठेवला.
पॉल कुर्झ हे नामांकित लेखकदेखील होते. त्यांनी 1973 साली मानवाधिकारांचा जाहीरनामा तयार केला. हा जाहीरनामा म्हणजे 1933 साली तयार करण्यात आलेल्या धर्मविषयक जाहीरनाम्याची नवी आवृत्ती होती, परंतु त्यामध्ये आण्विक शस्त्रास्त्रे, लोकसंख्या : नियंत्रण, वंशवाद आणि लैंगिकता यांसारख्या नव्या युगातील मुद्दयांची भर घालण्यात आली होती.
शेतीच्या पाण्याचा व्यापार
[ पाण्याचा बाजार किंवा व्यापार म्हटले की समोर येते ते बाजारात सर्वत्र दिसणारे बाटलीबंद पाणी. पण आता पाण्याच्या व्यापाराचे नवीन – आणि सरकार – पुरस्कृत स्वरूप महाराष्ट्रात पुढे येत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (मजनिप्रा) शेतीच्या आणि शेतकऱ्याच्या पाण्याचा व्यापार उभा करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. एकीकडे राज्यातील सिंचन विभागात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराने गदारोळ माजविला असताना, जलक्षेत्रातील या अत्यंत महत्त्वाच्या बदलांकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. किंबहुना, या बदलांची माहिती अजून पूर्णपणे लोकांसमोर आली नाही. सिंचनक्षेत्राची सफाई एकीकडे सुरू असताना (थोडे आशावादी असायला हरकत नाही) पाण्याच्या व्यापारीकरणाच्या आणि बाजारीकरणाच्या या प्रक्रियेवरसुद्धा आपली नजर राहावी हे या लेखाचे मुख्य उद्दिष्ट.
ही स्त्री कोण? (भाग-३)
धर्म आणि बाईजात
‘धर्म आणि धर्मजात’ या शब्दप्रयोगात उघडपणे दोन शब्द किंवा संकल्पना आहेत, असे दिसते. पहिली धर्म आणि दुसरी बाईजात. आता शब्द दोनच असले तरी संकल्पना चार आहेत. धर्म, बाई आणि जात अशा मूळ तीन परस्पर भिन्न सट्या अलग करता येणाऱ्या संकल्पना आणि ‘बाईजात’ ही चौथी संमिश्र संकल्पना.
बाईजात’ ही एकच एक संकल्पना नाही. तिच्यात बाई आणि जात अशा दोन भिन्न संकल्पना दडलेल्या आहेत. म्हणजे तीन सुट्या संकल्पना आणि एक संमिश्र संकल्पना, अशा चार संकल्पना मिळून ‘धर्म आणि बाईजात’ दोन संकल्पनांचे शीर्षक बनते.