इसवी सन दोनहजार बाराचे शरीरक्रियाशास्त्रीय वैद्यकशास्त्र या विषयातले नोबेल पारितोषिक ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ सर जॉन गर्डन आणि जपानी जीवशास्त्रज्ञ शिन्या यामानाका ह्या दोघांना प्रौढ पेशीपासून बहुशक्तिक पेशी बनवण्यासाठी देण्यात आले. ह्यातील प्रौढ पेशी आणि बहुशक्तिक पेशी म्हणजे काय आणि एका प्रकारच्या पेशीचे रूपांतर दुसरीत कशासाठी करायचे हे समजून घेण्यासाठी हा लेख.
आपल्या शरीरात साधारण चारशे प्रकारच्या पेशी असतात. प्रत्येक प्रकाराचे काम ठरलेले असते. उदाहरणार्थ लाल रक्तपेशी प्राणवायू वाहून नेतात तर शेत रक्तपेशी शरीराचे जन्तूंपासून रक्षण करतात. तसेच स्नायुपेशी, अस्थिपेशी, मज्जारज्जूधील पेशी या सर्वांचे काम आणि त्यांची रचना परस्परांहून अगदी भिन्न असते.
भांडवलशाही आणि मार्क्सवाद
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपात भांडवलशाहीचा उदय झाला. तेव्हापासून तिच्याविरुद्ध निरनिराळे मतप्रवाह समाजात प्रचलित आहेत. युरोपातील भांडवलशाहीने सरंजामशाहीशी मोठा लढा दिला. औद्योगिक क्रांती होऊन नवीन उत्पादनपद्धती प्रचलित झाल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या नाड्या भांडवलदारांच्या हातात आल्या व त्यांना राज्यसत्ता ताब्यात घेण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तेव्हा त्यांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे गुलामांची मुक्तता. त्यांना गुलामांबद्दल प्रे होते म्हणून नव्हे, तर त्यांना कारखान्यात काम करायला स्वस्तात मजूर हवे होते म्हणून. दुसरी गोष्ट, त्यांनी राज्यसत्ता आणि चर्च यांची फारकत व्हावी आणि राज्यसत्ता निधर्मी राहावी अशी मागणी करून तिची अंलबजावणी केली.
आकडेबाजी (२)
एक तरुण उद्योजक-स्नेही सांगत होता, मला बावीस सरकारी खात्यांशी झगडत काम करावं लागतं! नाकी नऊ येतात. पण लोकांना आम्हा तरुण entrepreunersबद्दल काही सहानुभूतीच नाही. सगळे आपले शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या याबद्दल बोलतात! आणि तो त्याच्या बीएमडब्लूधून निघून गेला. २००७ साली अर्जुन सेनगुप्ता आयोगाने अविरचित क्षेत्रातील उपजीविकेची कामे करण्याच्या स्थिती (On Conditions of Work and Promotion of Livelihoods in the Unorganized Sector) यावर एक अहवाल सादर केला. त्यात शेतकऱ्यांशी निगडित काही आकडेवारी दिली गेली. शेतकरी चर्चेत का आहेत आणि का असावेत ते कळण्यासाठी या आकडेवारीचा उपयोग होईल.
अनवरत भंडळ (२)
[मानवी व एकूण सजीवांचे आयुष्य, त्याचा आदि-अंत, त्याचे कारणपरिणाम, ते जेथे फुलते त्या जागेशी असलेले त्याचे नाते, त्याची स्वयंसिद्धता वा अवलंबित्व, विशाच्या विराट अवकाशातील त्याची प्रस्तुतता ह्या विषयांचे मानवी मनाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. माणसाने विवेकवादी असण्या-नसण्याची व असावे-नसावेपणाची काही कारणे वा पूर्वअटीही ह्या मुद्द्यांध्येच दडून आहेत. त्यामुळे आ.स्.चा तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्यावर वैज्ञानिक दृष्टिकोणातून लिहिलेली प्रभाकर नानावटींची मानवी अस्तित्व ही मालिका आपण गेल्या वर्षीपासून वाचत आहोतच. आता ही थोड्या वेगळ्या अंगाने लिहिलेली, विज्ञान व अध्यात्म ह्यांची सांगड घालणारी मालिका.
कार्यकर्त्यांची पाठशालाः दत्ता सावळे
भारतातील अनेक जनसंघटना, त्या जनसंघटनांतील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, विचारवंत आणि विश्लेषक दत्ता सावळे यांचे गुरुवार दि.१३ डिसेंबर रोजी त्यांच्या गावी, पंढरपुरी, वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. गेली ३-४ वर्षे त्यांना पार्किन्सनच्या आजाराने ग्रासले होते. शारीरिक हालचाली मंदावणे, विस्मरण, परावलंबित्व अशांळे त्यांचा शेवटचा काळ काहीसा त्रासदायक झाला होता. मात्र अशा अवस्थेतही भोवतालच्या सामाजिक-राजकीय घडामोडींविषयी ते कमालीचे सजग होते. अलिकडल्या काळातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानिमित्त काहीशी उभारी मिळालेल्या जनमानसाला, १९७० च्या दशकात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून उभारी मिळालेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनासारखे टोक कसे आणता येईल याविषयीचे मत भेटावयास येणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर ते आग्रहाने मांडत होते.
चमत्कार
चमत्कार
चमत्कार त्यारात्री कुठलाच झाला नाही
उपहार गृहात होते काही लोक
सगळ्यांच्या होठावर होते काही शब्द
अन डोळ्यात धारणेचे दीप
हे ईश्वराचे निवास्थान आहे
भूकंप हद्रवणार नाही त्याला नाही कधी जाळू शकणार
शेकडो चमत्कारच्या कथा, सगळ्यांनी ऐकल्या होत्या
शेकडोजा जी त्यासान्यानी
अम्बाकेकात्याया परलोकानूनही कोटावायचा नाही
आपरवराण,जापालिका
सारेच्या सारे होळपळून भस्म झाले आगीत
चमत्कार त्या रात्री कुठलाच झाला नाही
मूळ उर्दू कवी : गुलजार
मराठी अनुवाद : अनुराधा मोहनी
सुलेखन : मयूर आडकर
जात-पात
जातिसंस्थेला व स्पृश्यास्पृश्यतेला खऱ्या अर्थाने मूठमाती द्यावयाची असेल तर शूद्र-अतिशूद्र ह्यांच्याकडे परंपरेने आलेल्या कष्टकरी व्यवसायांना व श्रमनिष्ठ जीवनाला प्रतिष्ठा व सन्माननीय उत्पन्न मिळवून देणे अगत्याचे आहे. प्रत्येकाला उच्चशिक्षित पांढरपेशा जीवनशैलीत प्रवेश मिळाला तर जन्माधिष्ठित जातपात कदाचित उखडली जाईल, पण शूद्र, अतिशूद्र नव्या स्वरूपात कायमच राहतील. तसेच बहीण-भावंडवृत्ती जर जीवनाची बैठक नसली, तर शोषण, अन्याय, दडपणूक ह्यांना कधीच आळा घालता येणार नाही.
मानवी अस्तित्व (८)
मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का?
आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुरूप वागतो की आपल्याकडून कोणी हे करून घेते याबद्दल नेमके भाष्य करणे जवळजवळ अशक्य आहे. रेने देकार्त (१६४४) म्हणून एक तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याने हे जग खरोखर आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. जग आहे का म्हटल्यावर त्यातील चराचर सृष्टी आहे का असाही प्रश्न ओघाने आलाच. पैकी चेतन सृष्टीतला जो मी आहे, तो तरी खरा आहे का इथपर्यंत त्याची शंका पोहोचली. मग त्यावर, अशी शंका घेणारा कुणीतरी आहे, म्हणजे मग तोच मी आहे असे त्याने स्वतःच्या प्रश्नाला उत्तर दिले.
विक्रम आणि वेताळ
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.
राजा, खरेतर नियमाप्रमाणे मला तुला गोष्ट सांगणे आणि त्यानंतर प्रश्न विचारणे भाग आहे, पण खरे सांगू? आज कोणतीही नवीन गोष्ट तुला सांगण्याची अजिबात इच्छा नाही बघ. त्यापेक्षा असे करू या का? आपला जो हा उद्योग कित्येक वर्षांपासून, नव्हे शतकांपासून चालू आहे, तू, म्हणजे राजा विक्रमादित्याने, प्रेत उचलून खांद्यावर टाकायचे आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागायचे, मग मी जागे होऊन तुला एक गोष्ट सांगायची आणि त्या आधारावर प्रश्न विचारावयाचे, त्यावर तुला उत्तर द्यावयास बाध्य करून तुझ्या मौनव्रताचा भंग करावयाचा आणि मी लगेच झाडावर जाऊन लोंबकळावयास लागावयाचे.
चार फुले
हेही खरंच की हा सावधगिरीचा इशारा आहे
एक छोटंसं मूल आहे
हेही खरंच की हा सावधगिरीचा इशारा आहे.
चार फुलं फुलली आहे.
इशारा हा की अजून आनंद आहे
आणि माठात भरलेले पाणी पिण्यायोग्य आहे.
हवेत श्वास घेतला जाऊ शकतो अजूनही
आणि इशारा हा की जगही आहे
उरलेल्या जगात मीही आहे उरलेला.
हा इशाराच की मी अजून उरलो आहे
एखाद्या संभवनीय युद्धातून जिवंत वाचून,
मी आपल्या इच्छेनुसार मरू इच्छितो,
आणि मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत
अनंतकाळ जगण्याची कामना करतो.
कारण अजून चार फुलं आहेत आणि जग आहे.