मानवी प्रगतीचा एक अर्थ असा लावता येतो की अन्न, वस्त्र, निवारा वगैरे मूलभूत गरजा भागविणआाठी करायला लागणाऱ्या कष्टांचे प्रमाण आणि कष्टांचा/कामाचा कालावधी कमी-कमी होत जाणे, आणि उपभोगाचा किंवा रिकामपणाचा कालावधी वाढत जाणे. या प्रगतीची महत्त्वाची साधने दोन होती – एक म्हणजे परस्परांना मदत, सहकार्य आणि स्पेशलायझेशन. दुसरे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर.
सहकार्यः
एकट्याने शिकार करण्यापेक्षा अनेकांनी एकत्रपणे शिकार केल्यास ती अधिक फलदायी होते हे शिकारी रानटी कुत्र्यांनाही कळते, ते आदिमानवांच्याही लक्षात आले. तेच सहकार्य हिंस्र पशृंपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी पडले. हेच सहकार्य पढे विकसित होत, मले सांभाळणे, हत्यारे तयार करणे, शिकार केलेल्या पशंचे कातडे वेगळे करून त्याचे कपडे शिवणे वगैरे आवश्यक कामांच्या कौशल्यांध्ये स्पेशलायझेशन काही लोकांनी केल्यास काम अधिक चांगले होते आणि सर्वांच्याच वेळेची बचत होते, हे लक्षात येऊन परस्परांवर अवलंबून असणाऱ्यांचा एक समाज किंवा टोळी तयार झाली.