स्त्रिया आणि अंधश्रद्धा-निर्मूलन

तिमिरातून तेजाकडे : समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे या पुस्तकाची पहिली आवृत्ती एप्रिल २०१० ला प्रकाशित झाली. त्यातील एका प्रकरणात ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय डॉ. दाभोलकरांनी सविस्तर मांडला आहे. हा विषय डॉक्टरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता कारण स्त्रिया त्यांच्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीमुळे, गुदमरून टाकणाऱ्या वातावरणामुळे अंधश्रद्धांना जास्त सहजपणे बळी पडतात; एवढेच नव्हे तर अंधश्रद्धेचे त्यांच्यावर झालेले संस्कार त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवतात; कित्येक वेळा त्या पार पाडीत असलेल्या पूजाअर्चा, कर्मकाण्डे निरर्थक आहेत, वेळ-पैसा-मेहनत यांचा अपव्यय त्यामध्ये होतो हे पटूनसुद्धा त्यांना यातून बाहेर पडता येत नाही.

पुढे वाचा

मार्क्सचा शासनसंस्थाविषयक विचार या लेखातून आध्यात्मिकता

आध्यात्मिकते (spiritualism)ची खरोखरच गरज आहे का ? आजकाल ‘माझा कुठल्याही धार्मिक कर्मकांडावर विशास नाही; मी धार्मिक नाही; परंतु मला आध्यात्मिकतेची (spiritualism) रुची आहे’ असे सार्वजनिकरीत्या विधान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जणु काही आध्यात्मिकता म्हणजे एक फॅशन असल्यासारखे त्याकडे बघितले जात आहे. इंटरनॅशनल म्हणून स्वत:च शिक्का मारून घेतलेल्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये तर याचे पेवच फुटले आहे. त्यांच्या मते प्रत्येकाला आपले समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आध्यात्मिक शहाणपणाची (spiritual) आहे. मुळात आध्यात्मिकता ही एक अत्यंत ढोबळ, तकलादू अशी संकल्पना आहे. त्याची शाब्दिक फोड केल्यास ऐहिकतेच्या विरोधातील ही संकल्पना आहे, हे लक्षात येईल.

पुढे वाचा

ग्रंथपरिचय/परीक्षण (उत्तरार्ध)

ग्रंथपरिचय/परीक्षण (उत्तरार्ध)
(मूळ इंग्रजीः ‘चर्निंग द अर्थ, द मेंकिंग ऑफ ग्लोबल)
श्रीनिवास खांदेवाले
पर्यावरण धोरणाची स्थिती आणि परिणाम ह्यांचे परीक्षण हे प्रस्तुत ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. तीन प्रकरणां ध्ये त्यांचा अभ्यास केला गेला आहे. त्यात वने, नद्या, खनिजे, ही विकासाकरता वापरताना त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या आदिवासी, कोळी व इतर जमीन कसणाऱ्या जाती-जमातींच्या जगण्याच्या संसाधनांवर घाला येत आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची पर्यायी समाधानकारक व्यवस्था न करताच त्यांना विस्थापित केले जात आहे. त्यांना विकासप्रक्रियेत सामील करून घेतले गेले नाही, हा महत्त्वाचा भाग आहे. तितकाच महत्त्वाचा मुद्दा देशाच्या नैसर्गिक संसाधनांचे (दोहन नव्हे) जे शोषण चालू आहे, त्याचा आहे.

पुढे वाचा

मायबोली मराठी

मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा से
नसो आज ऐशर्य या माऊलीला
यशाची पुढे थोर आशा असे…
असे कमी माधव ज्युलियन यांनी १७ मे १९२२ सालीच म्हणून ठेवले आहे. पण आज नव्वद वर्षांनंतरही मराठीची अवहेलना चालूच आहे. आज मराठी माध्यमांच्या शेकडों शाळा बंद पडताहेत. खेड्यापाड्यातून चकचकीत, भव्य, शोभिवंत इमारतीत इंग्रजी माध्यमांच्या शेकडोंनी शाळा सुरू झाल्या आहेत. कचकड्याच्या बाहुलाबाहुलीगत, बूट, टाय घालून लहान-लहान गोजिरवाणी मुले पिवळ्या गाड्यात बसून इंग्रजी भाषेचे आणि संस्कृतीचे धडे गिरवीत आहेत. मराठी लेखक असोत, ऑफिसर असोत, मंत्री, आमदार असोत अनेकांची मुले, नातवंडे या इंग्रजी माध्यमाच्या भोवऱ्यात अडकलेली आहेत.

पुढे वाचा

बंधुत्व-अभाव

(एक)
दर माणसामागे किती जमीन उपलब्ध आहे असा विचार केला, तर प्रत्येक अमेरिकन हा प्रत्येक भारतीयाच्या सुमारे अकरा पट ‘जमीनदार’ आहे. दोन्ही देशांमधल्या जमिनीकडे पाहायच्या दृष्टिकोनांत अर्थातच बराच फरक आहे. हा फरक सर्वांत तीव्रतेने दिसतो तो प्लॉट-फ्लॅट या संबंधातल्या रीअल इस्टेट उद्योगात.

भारतीय माणसांना मालकीचे घर असणे, त्यात दरडोई ऐसपैसपणा असणे, ते फॅशनेबल वस्तीत असणे, जमल्यास ‘फ्लॅट’ऐवजी बंगला असणे, या गोष्टींचे फार अप्रूप वाटते. राजधानी दिल्लीत तर बंगल्यांना ‘कोठी’ म्हणतात, जो शब्द महाराष्ट्रात अन्नधान्य साठवण्याच्या खोलीसाठी किंवा पत्र्याच्या मोठ्या डब्यांसाठी वापरतात!

पुढे वाचा

भांडवलशाही टिकते कशी?

एकोणिसाव्या शतकात युरोपात सुरू झालेली भांडवलशाही, विसावे शतक संपता संपता केवळ युरोपीय देशातच नव्हे, तर सर्व खंडांत, सर्वनैव नांदू लागली. खऱ्या अर्थाने ती जागतिक अर्थव्यवस्था झाली. भांडवलशाही ही अर्थव्यवस्था म्हणून राष्ट्राच्या सीमा ओलांडणार व जागतिक होणार हे मार्क्सने आधीच लिहून ठेवले आहे. तेव्हा प्रश्न भांडवलशाही जागतिक होण्याचा नाही, तर ती इतक्या वेळा अरिष्टात सापडूनही त्यातून बाहेर कशी येते किंबहुना पूर्णपणे बाहेर न येताही कशी टिकते, हा आहे. त्याचबरोबर भांडवली लोकशाही असो, लष्करी हुकूमशाही, की एकधर्मीय हुकूमशाही, इतकेच काय चीनच्या तथाकथित कम्युनिस्ट पक्षाचे शासन जरी असले, तरी भांडवलशाही कुठल्याही राज्यव्यवस्थेत आपली अर्थव्यवस्था अंलात आणते.

पुढे वाचा

नवसंस्कृती व नवा मानव

आपणास एक नवी संस्कृती निर्माण करावयाची आहे याची जाणीव आम्ही सतत ठेविली पाहिजे. तीनशे वर्षांपूर्वी युरोपखंड आधुनिक युगात आले, भौतिकविद्येत त्यांनी आघाडी मारली. भौतिक सत्याचे संशोधन करीत असताना आप्तवाक्य व शब्दप्रामाण्य यांच्यापुढे जाऊन बुद्धिवाद आणि आत्मप्रामाण्य यांचा आधार घेतला. बुद्धिवादातून बुद्धिस्वातंत्र्य जन्मास आले आणि या बुद्धिस्वातंत्र्यासाठीच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार प्रथम करण्यात आला. त्यांच्या संरक्षणासाठी राज्यक्रांत्या कराव्या लागल्या व तशा त्या ब्रिटिश, अमेरिकन व फ्रेंच लोकांनी केल्याही. पण त्या क्रांत्या केल्यानंतर व्यक्तिस्वातंत्र्य आर्थिक व्यवहारात प्रभावी बनले. सत्यसंशोधन आणि समाजसेवा ही व्रते घेणाऱ्यांसाठी ते जितके हितावह होते तितकेच ते आर्थिक व्यवहारांत अनर्थावह ठरले आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आसु जुलै २०१३ मधील तारक काटे यांचा लेख वाचला.

आज जगभरात… २,८६,००० प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत…. नवी प्रजाती (species) किंवा वाण तयार होतो…. जगात आज गव्हाच्या १४००० वाणांची नोंद झाली आहे. भारतात तांदळाचे जवळपास दोन लाख वाण अस्तित्वात असावेत. असे ते पहिल्या-दुसऱ्या परिच्छेदात लिहितात. २,८६,००० प्रजातींपैकी भारतातील २,००,००० तांदळाचे आणि जगातील १४००० गव्हाचे वाण वगळले तर इतर जगातील तांदळाच्या, मका, पालेभाज्या, फळभाज्या, फळफळावळ, कंदमुळे, शोभेची फले अशा असंख्य सपष्प वनस्पतींचे फक्त ७४,००० च वाण आहेत असा निष्कर्ष येतो.

मला वस्तुस्थिती माहीत नाही.

पुढे वाचा

मुस्लिम मनाचा उत्कट आविष्कारः अजीम नवाज राही यांची कविता

मराठी कवितेत मुस्लिम कवींचे योगदान प्राचीन काळासूनच राहिलेले आहे. शेख मोहंद, शेख सुलतान, अल्लाखान, याकूब हुसेनी इ. मुस्लिम कवींनी संत कवितेत सुफी पंथाच्या मानवताधर्माची मांडणी केली आहे, तर तंत कवितेच्या काळात मराठी शाहिरी काव्य लिहिणारे सगनभाऊ, दादू पिंजारी, शेख कलंदर ह्यांची नावे आपल्यासमोर येतात. आधुनिक काळात शाहीर अमरशेख, प्रा. नसीमा पठाण, खलील मो नि, अल्लाउद्दीन आणि रफीक सूरज हे नामांकित कवी आहेत. मध्ययुगीन काळातील सुफी कवींच्या कवितेतून सुफी तत्त्वज्ञानांच्या औदार्याचे दर्शन तर शाहिरांच्या कवितेतून लावण्याच्या विविध छटा आविष्कृत होत गेल्या. आधुनिक कवितेतून मुस्लिम समाजातील आर्थिक अनिश्चितता, अल्पसंख्यकपणाची जाणीव यांसह बंधुभावासाठीचे उमदे मन हे विषय अभिव्यक्त झाले.

पुढे वाचा

विज्ञान आश्रमाची कथा – लेखांक २

आघाडीचा अभ्यासक्रम मूलभूत ग्रामीण तंत्रज्ञानाची पदविका (DBRT)

‘ग्रामीण तंत्रज्ञान पदविका’ हा विज्ञान आश्रमाने विकसित केलेला मुख्य अभ्यासक्रम आहे. मागच्या अंकात म्हटल्याप्रमाणे निसर्ग हाच अभ्यासक्रम मानून सोईसाठी या अभ्यासक्रमाचे – अभियांत्रिकी, ऊर्जा-पर्यावरण, शेती डु पशुपालन आणि गृह आरोग्य हे चार विभाग केले आहेत. ज्यांना कोणाला हे तंत्रज्ञान शिकायचे आहे, त्यांना थोडे फार गणित आणि लिहिणे-वाचणे येते ना, म्हणजे सर्वसाधारणपणे आठवीपर्यंतचे शिक्षण आहे ना, वय चौदा वर्षांपुढे आहे ना, त्यांना एकट्याने घराबाहेर वर्षभर राहता येईल ना याची खात्री केली जाते. बाकी हिंदी – मराठीचे व्यवहारापुरते ज्ञान असले की मार्काची काही अट नसते.

पुढे वाचा