जी एम शेतकऱ्यांच्या हिताचे

आज जे लोक जी. एम. मक्याला विरोध करीत आहेत, तेच लोक यापूर्वी जी. एम. कापूस (बी.टी. कापूस) भारतीय शेतकऱ्यांना दिला जाऊ नये म्हणून प्रयत्नशील होते. या लोकांच्या प्रचंड विरोधामुळे आणि दहशतीमुळे बी. टी. कापूस तब्बल ६ वर्षे (१९९६ ते २००२) भारतीय शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. मध्येच बी. टी. कापसाची मोठ्या प्रमाणात चाचणी होऊन त्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे स्पष्ट झाले होते. तरीही त्या विरोधात जी. एम. मक्यासारखाच धादांत खोटा, विषारी प्रचार करून काही लोकांनी सदर बियाणे भारतात येऊ देण्यास विरोध केला होता.

पुढे वाचा

मुक्त अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि विदर्भातील शेतकरी – आत्महत्या

संसदेच्या कृषि स्थायी समितीने जनुकांतरित पिकाच्या विरोधात सादर केलेला भक्कम पुरावा निष्प्रभ करण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. ‘हरित कार्यकर्त्यांचे काम’ असे म्हणून त्याची हेटाळणी होत आहे. हा साडेचारशे पानांचा अहवाल हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या खासदारांनी मिळून दोन ते अडीच वर्षे केलेल्या अभ्यासाचे फळ आहे. ह्या खासदारांमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षाचे, डावे आणि उजवे अशा सर्वांचा समावेश होता, ज्यांचे सर्वसाधारणपणे एकमेकांशी मतैक्य होत नाही. त्या अर्थाने ते, जनुकांतरित बियाणे बनविणाऱ्या कंपन्या, त्यांनी प्रायोजित केलेल्या स्वयंसेवी संस्था, जनसंपर्काची अभिकरणे आणि तथाकथित शेतकरी नेते ह्यांनी प्रसारमाध्यमे, जनता आणि धोरणकर्ते ह्यांच्याकडे केलेल्या एका खोट्या प्रचाराचे खंडन होते.

पुढे वाचा

जनुक – संस्कारित बियाणे : कोणासाठी, कशासाठी?

मी गेल्या तीन दशकांपासून सेंद्रिय / नैसर्गिक शेती करीत आहे. माती, पाणी, वातावरणाचे जतन आणि विषमुक्त/सुरक्षित आहार हे प्रमुख उद्देश मनात ठेवून मी दीर्घकाळ काम केले. आरंभी देशात माझ्यासारखे मोजकेच लोक होते. नंतर हळूहळू सेंद्रिय शेतीपद्धती रुजत गेली. आज या क्षीण प्रवाहाचे मोठे पात्र होत असताना सेंद्रिय शेती तगेल की नष्ट होईल असा मला प्रश्न पडला आहे.

सेंद्रिय शेतीपद्धती नुसतीच पर्यावरणस्नेही नाही तर भूमी आणि जल ह्यांचे संवर्धन साधून जैवविविधतेत भर घालणारी आहे. याउलट जनुक-संस्कारित बियाण्यामुळे या सर्वांवर विपरीत परिणाम होऊन माणसांचे आणि पशूंचे भोजनसुद्धा प्रदूषित होत असल्याचे अनुभव आहेत.

पुढे वाचा

लढवय्या शेतकरी

वॉर ऑन हंगर आणि एफिशियंट मार्केट्स ‘अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूळ गरजा आहेत” हे घासून गुळगुळीत, बुळबुळीत झालेले वाक्य; पण प्रगतीचे घोडे अजून पहिल्याच पायरीवर अडलेले आहे. अर्थात, अनेकांच्या मनात पुढचे वळण घेतले की आलेच नंदनवन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण तिथे लवकरच पोहचू हा विश्वास अटळ आणि अढळ आहेच. माणूस सर्वसुखी होण्यात अनेक नैसर्गिक अडचणींचा मोठा अडथळा आहे आणि त्यासाठी माणसाला अनेक पातळीवर युद्ध करावे लागते. त्यापैकीच एक आहे वॉर ऑन हंगर.

जगाची लोकसंख्या आज सात अब्ज आहे आणि त्यातले एक अब्ज लोक उपाशी आहेत.

पुढे वाचा

जैवविविधता व जनुक – संस्कारित पिके

आपल्या पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व म्हणजे मुळातच एक नवलाईची बाब आहे. त्यातही जास्त विस्मयकारक आहे ती या सजीवांची विविधता. अंदाजे ९०० कोटी प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव या पृथ्वीवर वास्तव्य करून आहेत. येथे जवळपास ७०० कोटी लोकसंख्या आहे माणसांची व त्यात सतत भर पडतेच आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या असंख्य प्रकारच्या गरजा पुरविण्यासाठी मात्र निसर्गातील जैवविविधतेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणेबळी दिला जात आहे. जैवविविधतेच्या -हासाला खरा वेग आला तो जगात औद्योगिक क्रांतीला सुरवात झाल्यानंतर. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात मानवी समाजाचा एकूण ऊर्जावापर वीस पटीने तर प्रति माणशी वापर शंभर पटीने वाढला आहे.

पुढे वाचा

निवेदन : सामाजिक समता केंद्र

नितिन आगे हत्येमुळे दलितांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोहसीन शेखच्या हत्येने धर्मांध राजकारणाचा धोका स्पष्ट केला आहे. आदिवासी आणि भटक्या जमातींच्या लोकांवर आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार ही तर नित्याचीच गोष्ट आहे. या घटना थांबल्याच पाहिजेत. दलित, आदिवासी, भटके, आदी पददलितांना आणि अल्पसंख्याक व स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी निरनिराळ्या आघाड्यांवर कामगार कर्मचारी संघटना, सामाजिक संस्था, – प्राध्यापक शिक्षक संघटना, महिला संघटना अशा संस्था व व्यक्तींनी खारीचा वाटा उचलला आणि अशा कामांमध्ये समन्वय साधला तर निश्चित प्रगती साधता येईल. त्यासाठी आपल्या गावात सामाजिक समता केंद्र स्थापन करावे व त्यामार्फत प्रबोधनात्मक व कृतिशीलतेचे काम करावे, असा प्रस्ताव ठेवत आहोत.

पुढे वाचा

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

“तुम्ही तुमच्या शब्दांनी मला जखमी करा
डोळ्यांनी माझे तुकडे तुकडे करा
तुमच्या द्वेषाने मला ठार मारा
पण हवेतून वर मी परत उभी राहीन”

ती आठ वर्षाची होती तेव्हाच तिने बोलणे टाकले. त्याच वर्षी तिच्या आईच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या पोटातील तीव्र यातना, रक्त, खटकन्, ऊसकलेली तिची कंबर, या पेक्षा तिला सर्वात भयानक जाणीव होती ती तिच्या आवाजाने घेतलेल्या त्या नराधमाच्या प्राणाची ! न्यायालयात त्याच्या विरुद्ध तिने उंच आवाजाने भोकांड पसरल्यावर त्याला जोड्यांनी ठार मारण्यात आले होते. त्यानंतर ती पाच वर्ष आपल्या भावाशिवाय इतर कोणाशीच बोलली नाही.

पुढे वाचा

मोठी धरणे बांधावीत का?

धरण प्रकल्पांच्या पद्धतशीरपणे खालावलेल्या दर्जाचे सगळे श्रेय मूर्ख आणि खोटारडे लोक यांना जाते. मूर्ख म्हणजे अवाजवी आशादायी जे भविष्याकडे केवळ गुलाबी चष्म्यातूनच बघतात आणि त्यासाठी यश मिळण्याची शक्यता अगदीच कमी असतानासुद्धा जवळच्या सगळ्या पुंजीचा जुगार खेळतात. खोटारडे लोक स्वतःच्या आर्थिक किंवा राजकीय फायद्यासाठी प्रकल्पांबाबतच्या गुंतवणुकीचे अति चांगले भवितव्य रंगवून जनतेची मुद्दाम दिशाभूल करतात जेणेकरून येन-केन-प्रकारेण प्रकल्प मंजूर होतील. महाकाय धरण प्रकल्पांचे प्रस्तावक अपवादात्मक यशोगाथांवरच भर देतात जेणेकरून त्यांचे प्रस्ताव मंजूर होतील.

‘महाकाय धरण प्रकल्पांचे प्रस्तावक अपवादात्मक यशोगाथांवरच भर देतात जेणेकरून त्यांचे प्रस्ताव मंजूर होतील’.

पुढे वाचा

हिंदू कोण?

पूर्वीच्या काळी दिनचर्या, खाणेपिणे, वेशभूषा, व्यवसाय आदींबाबत मनुस्मृतीने घालून दिलेल्या नियमांपैकी काहींचे जरी उल्लंघन केले, तरी त्यामुळे संबंधित व्यक्तीचे हिंदू म्हणून असलेले इतर हक्क हिरावून घेतले जात नसत. मग काही नियम अनिवार्य तर काही उल्लंघनीय असे झाले. परंतु मग हिंदू कोणास म्हणावे असा प्रश्न उपस्थित झाला. स्मृती व रीतिरिवाज ह्यांचा मिळून असलेला हिंदू कायदा लागू होण्यासाठी हिंदू कोण, ह्याचा निर्णय होणे आवश्यक होते.

त्या काळात, एखाद्या व्यक्तीने काही रीतिरिवाज पाळले नाहीत तर त्याला घराबाहेर काढणे, संयुक्त कुटुंबाच्या संपत्तीतला हिस्सा नाकारणे अशा प्रकारची शिक्षा करण्याचा अधिकार कुटुंबप्रमुखाला होता.

पुढे वाचा

जातिव्यवस्था आणि न्यूनगंड

भारतीय समाजामध्ये जातिव्यवस्था खूप खोलवर रुजली आहे. त्याचे दूरगामी परिणाम आपल्या व्यावहारिक जगण्यावर तसेच मानसिकतेवरही झाले याहेत. जातिनिर्मूलनाचे अनेक प्रयत्न व चळवळी ह्या देशात झाल्या, त्याने थोडाफार फरक पडला, पण निर्मूलन झाले नाही. इतकेच नव्हे तर सामाजिक परिवर्तनासाठी ज्या ज्या संघटना उभारण्यात आल्या, त्यांचे स्वरूप वरकरणी जरी जातिभेद न मानणारे दिसत असले, तरी जातिव्यवस्थेने घडविलेल्या मानसिकतेतूनच त्या मुळातून काम करीत असतात. ह्या मानसिकतेचे एक व्यक्त रूप म्हणजे तथाकथित खालच्या जातींना येणारा न्यूनगंड. ह्या न्यूनगंडाची कारणमीमांसा व परिणाम आपण ह्या लेखात पाहणार आहोत.

पुढे वाचा