बहुसंख्याकवाद आणि धार्मिक हिंसेला सामोरे जाताना

प्रश्न : आज बहुसंख्याकवाद आणि धार्मिक हिंसेला सामोरे जाताना हा विषय आपण घेतला आहे, तेव्हा हा जो बहुसंख्याकवाद आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं?

विश्वंभर चौधरी : आपल्याला एक सवय झाली आहे की बहुसंख्याकवाद हा आपण फक्त धार्मिक अंगानी पाहतो. पण आपल्या सोयीसाठी तो आपण जातीय अंगानीपण पहायला पाहिजे. मला एक चर्चा आठवते – एबीपी माझा ह्या चॅनेलसाठी झालेली आणि ठाण्याच्या एका हिंदुत्ववादी ग्रुपसोबत – त्या चर्चेत मी होतो आणि नाव बदलण्याचा मुद्दा त्यात होता. औरंगजेब रोडचं नाव बदलण्याचा असा काहीतरी मुद्दा होता.

पुढे वाचा

धर्म और सामाजिकता – जावेद अख़्तर के साथ बातचीत

ज्ञानेश पाटील : जावेद सर, आपका बहुत बहुत स्वागत. हमारा समाज मुख्यतः धार्मिक, श्रद्धालु, ईश्वरीय कल्पना पर आस्था रखनेवाले लोगों का है. इस समाज की एक विशेषता है कि नास्तिकता को या नास्तिक होने को वो kindly नहीं लेता है. दूसरी तरफ जो नास्तिक समाज है वो भी कहीं ना कहीं धर्म से घिरा हुआ ही रहता है. धर्म से, अंधश्रद्धाओं से परेशान रहता है. और फिर धीरे धीरे अपने समाज के बहुत बड़े हिस्से से वो डिस्कनेक्ट हो जाता है.

पुढे वाचा

एकांकिका – सत्य असत्याशी मन केले ग्वाही…

[या एकांकिकेचे कथाबीज, संकल्पना ही लेखकाची आहे. सदर एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याकरिताच लेखकाचा मोबाईल नंबर, पत्ता व ईमेल आयडी सोबत दिलेला आहे. परवानगीशिवाय सदर एकांकिका, एकांकिकेतील कोणताही भाग कोणत्याही माध्यमांमध्ये किंवा माध्यमांद्वारे सादर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व वादासाठी न्यायालयीन क्षेत्र सांगली राहील.] 

‘जेव्हा एखाद्या माणसाला भ्रम होतो, तेव्हा त्याला मनोविकार म्हणतात आणि जेव्हा बऱ्याच माणसांना भ्रम होतो, तेव्हा त्याला धर्म म्हणतात’
– रॉबर्ट पिर्सिग ( ‘झेन अँड आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स’ चे लेखक)

प्रसंग १ 

(तालुक्यामधील एक सधन घर.

पुढे वाचा

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

आपला नास्तिकवाद आपण तपासून पाहिला पाहिजे

नमस्कार.

मला खूप अवघडल्यासारखं झालंय. कारण, एक तर सभेत बोलायची माझी सवय मोडली आहे. आणि आज तुमच्यासमोर बोलताना तर मला आणखीन भीती वाटतेय. कारण, मी गेली ५० वर्षे जरी चळवळीत काम करत असले तरी, ज्या असोशीने तुम्ही नास्तिकतावादाचा पुरस्कार करताय, त्याचा प्रचार करताय, त्या प्रकारे मी नास्तिकतावादाचा पुरस्कार किंवा प्रचारही केलेला नाहीये. एकतर मी ज्यावेळेला चळवळीमध्ये पडले त्यावेळेला मुंबईमध्ये गिरणी कामगारांची चळवळ फोफावलेली होती. चळवळीमध्ये भाग घेणारे कार्यकर्ते घरी गेल्यानंतर काय करतात त्यापेक्षा गिरणीच्या दरवाज्यावर ते काय करतात, काय बोलतात यावरच सगळं लक्ष केंद्रित झालेलं असायचं.

पुढे वाचा

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

समविचारी लोक आजूबाजूला हवेत

मी उज्ज्वला परांजपे. मुद्दाम सांगते. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मी कुठल्या बॅकग्राऊंडमधून आले आहे. सदाशिवपेठी, पुणेकर, टीपिकल टीपिकल टीपिकल! त्यामुळे घरामध्ये कर्मठ वातावरण. सर्व सण, उत्सव, समारंभ, व्रत-वैकल्य याच्यामध्ये मी लहानपणापासून आहे. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये शिकले. या शाळा अतिशय कर्मठ असतात. या शाळांच्या ‘अ’ आणि ‘ब’ तुकड्या अशा झापड लावून घडवल्या जातात की, तुम्हाला साधी दुसऱ्या जातीतील मैत्रीणसुद्धा करायची संधी मिळू नये. अशा कडक आणि स्ट्राँग वातावरणात मी वाढले. पण त्याच वयात प्रत्येक गोष्टीला आपण ‘का?’

पुढे वाचा

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

विचाराने जगायचे तर किंमत चुकवावी लागते

सर्वांना सस्नेह नमस्कार.

‘माझा नास्तिकतेचा प्रवास’ या परिसंवादाच्या निमित्ताने आज आपण जमलेलो आहोत. मी नास्तिक कसा झालो? इकडे माझा प्रवास कसा झाला? हे मी विषद करतो. मी लहान असताना आमच्याकडे ‘घोड्यावरचा देव’ नावाचा एक प्रकार असायचा. तर त्यासाठी आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावरती जायचो. ‘सासनकाठी’ नावाचा एक प्रकार इकडे असतो. म्हणजे काय? तर काहीतरी एक उत्सव असतो. त्यात गुलालामध्ये बुडवलेलं खोबरं असतं. ते खोबरं मंदिरावरती टाकायचं आणि तिथून ते खाली पडलं की उचलून खायचं, असा तो प्रकार असतो.

पुढे वाचा

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

नास्तिक्य आणि राजकारणी

साथींनो जिंदाबाद.

आज या नास्तिक परिषदेत ‘माझा नास्तिकतेचा प्रवास’ या विषयावर आपण बोलतो आहोत. नास्तिकतेचा माझा अनुभव मी सांगते. जवळपास सहा महिन्यांपासून परिषदेच्या निमित्ताने मी लोकांमध्ये जात होते. “आम्ही नास्तिक परिषद घेणार आहोत. तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. आणि आम्हाला फंडचीही गरज आहे.” असे सातत्याने जेव्हा मी लोकांपुढे मांडत होते तेव्हा लोकांमधून प्रश्न आला, “मॅडम तुम्ही? नास्तिक? तुम्ही तर नगरसेविका!” साधारण सगळ्यांनाच वाटते की नास्तिक्य आणि राजकारण हे अगदी वेगळे विषय आहेत. राजकारणी हा नास्तिक मंचावर असूच शकत नाही.

पुढे वाचा

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

नास्तिकतेचा प्रवास करावा लागला नाही

नमस्कार.

आज या सगळ्यांची मनोगतं ऐकली. मागे मी एका दुसऱ्या मेळाव्याला गेले होते, भगतसिंग विचारांच्या. तिथंही अनेक जणांचा नास्तिकतेचा प्रवास मी ऐकला. तेव्हा मला माझ्या नशिबातून आलेलं वेगळेपण असं जाणवलं की, मला हा प्रवास कधी करावाच लागला नाही. 

मी आजी-आजोबांकडे वाढले, माझ्या आईच्या आई-वडिलांकडे! ते त्या काळामध्येसुद्धा कट्टर नास्तिक होते. माझ्या आजी-आजोबांच्या घरामध्ये देव्हारा नव्हता. माझी आजी कुठलेही उपवास करत नसे आणि विशेष म्हणजे ती माझ्या आजोबांना त्या काळामध्येदेखील ‘ए अप्पा’ अशी नावाने हाक मारत असे. त्या काळामध्ये हा विचार केवढा बंडखोर होता.

पुढे वाचा

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

नास्तिक्य मिरवलं तर बिघडलं कुठे?

नमस्कार,

हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळे सगळ्यांवर साधारणपणे जे संस्कार होतात तसे माझ्यावरसुद्धा झाले. लहानपणी आपल्याला योग्य अयोग्याची तशी समज नसते. आई-वडील सांगतात त्यावर आपला विश्वास असतो. ते सांगतात तसेच आपण करत असतो. माझंही तसंच होतं. पण वाढत्या वयात काही काही गोष्टी निरीक्षणात यायला लागल्या आणि प्रश्नही पडायला लागले. आजूबाजूचे लोक कोणाच्याही आणि कशाच्याही पाया पडतात हे दिसायला लागलं. प्रश्न पडू लागला की गावाच्या वेशीवरची एखादी दगडाची मूर्ती देव कसा काय होऊ शकेल? गणपतीच्या बाबतीत तर विशेषच. त्या मूर्तीत जर देवत्व आहे तर ती मूर्ती काढून नवीन मूर्ती कशी बसवता येईल?

पुढे वाचा

नास्तिकता समाजात अजून रुजलेली नाही

नास्तिकतेचा विचार भारतामध्ये शेकडो वर्षांपासून आहे; पण आपल्याकडे नास्तिकता अद्याप रुजलेली नाही. नास्तिकतेचा विचार करणाऱ्यांना आजही एकटेपणाची भीती वाटते. समाजात तुटल्यासारखं वाटतं. जी माणसे ह्या प्रवाहाच्या विरोधात पोहूनसुद्धा ठामपणे आपला विचार मांडतात, त्यांचा लढा खरेतर आस्तिकांच्या विरोधात नसतो, तर तो आस्तिक विचारांच्या विरोधात असतो. आगरकर नेहमी म्हणायचे की विचारकलहाला कशाला घाबरायचं?

नास्तिक आपले विचार ठामपणे मांडून देवा-धर्माची चिकित्सा करतात आणि आस्तिकांनाही विचार करायला प्रवृत्त करतात. पण याचा अर्थ आस्तिकांशी त्यांचा लढा असतो असा होत नाही. आस्तिक असणाऱ्यांनी विचार करावा, आपल्या काही चुकीच्या समजुती आहेत, रूढी आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या टाळाव्यात ह्यासाठी नास्तिक पुढाकार घेऊन त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करत असतात.

पुढे वाचा