ईश्वर – एक मुक्त चिंतन

“आस्तिक विरुद्ध नास्तिक” असा एक कायमचा घोळ समाजाच्या वैचारिक विश्वात चालू असतो. हा घोळ आस्तिकांनी घातला आहे. नास्तिकांची विचारसरणी सुस्पष्ट असते. निरीक्षण-परीक्षण-प्रत्यक्ष प्रयोग-गणितीय पडताळणी ह्या वैज्ञानिक प्रक्रियेतून निष्पन्न झालेले सत्य विवेकाच्या प्रकाशात स्पष्ट दिसत असल्यामुळे नास्तिकांच्या मनात कुठलाही संदेह नसतो. आस्तिकांजवळ मात्र काल्पनिक गृहीतकांशिवाय कोणतेच साधन नसते. निराधार परंपरांवर डोळे मिटून श्रद्धा ठेवीत ते अंधारात चाचपडत असतात. कुठलीही प्रायोगिक सिद्धता न लाभलेल्या गूढ, गहन, अनाकलनीय, धूसर अशा गोष्टींचे आस्तिकांना विलक्षण आकर्षण असते. सुबोधतेपेक्षा दुर्बोधतेकडे ओढा असणे, स्पष्टतेपेक्षा धूसरता अधिक आवडणे, प्रकाशापेक्षा अंधार बरा वाटणे, ज्ञानाऐवजी अज्ञानात सुख वाटणे , आकारापेक्षा निराकारात रमावेसे वाटणे हा वैचारिक जगतातील मोठा विरोधाभास आहे.

पुढे वाचा

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!

पी साईनाथ यांच्या वार्तांकनातुन ग्रामीण, दुर्लक्षीत, पिडीत समाजाची परिस्थीती मुख्य इंग्रजी दैनिकातुन दिसु लागली. हाच वारसा सांगणारे, इंग्रजीतुन वार्तांकन करणारे जयदीप हर्डीकर यांनी A Village Awaits Doomsday(Penguin Books) हे पुस्तक लिहीले आहे.

सृष्टिक्रम

जातिसंस्थेच्या उपपत्तीविषयी मी जी मांडणी केली आहे, ती अपुरी आहे असे माझ्या वाचकांशिवाय मलाही वाटत होते. माझ्या मित्रांचा माझ्या लिखाणावर आणखी एक आक्षेप आहे; तो आक्षेप असा की मी ब्राह्मणांना झुकते माप दिले आहे. त्यांनी जो अन्य जातींवर पिढ्यान् पिढ्या अन्याय केला आहे त्याची जबाबदारी त्यांच्यावर न टाकता मी सृष्टिक्रमावर किंवा कालचक्रावर टाकीत आहे. त्यामुळे आता ब्राह्मणांना कुठलेही प्रायश्चित्त घेण्याची गरज उरली नाही व हे माझे करणे योग्य नाही.

भारतात उच्चवर्णीयांनी अन्य जातींवर अन्याय केला, हे खरेच आहे. ते मी मुळीच नाकारत नाही.

पुढे वाचा

हे प्रेतांचे कारखाने थांबवा!

माणूस भोवतालचे जग बदलू शकतो, घडवू शकतो अन् या व्यवहारातूनच स्वतःलाही घडवत जातो. ही माणसाची व्याख्या मानली तर शिक्षणाने माणूस हा माणूस होतो. प्राण्यांच्या पिल्लांना न शिकविता ती अन्न मिळवू शकतात, मोठी होऊ शकतात. पण माणसासारखे जगणे मुळातच शक्य करायला शिक्षण आवश्यक आहे. समाजात वाढताना अनेक मार्गांनी हे शिक्षण आपण शोषत असतो, पण शाळा कॉलेजातल्या शिक्षणाचा त्यात सर्वांत मोठा व महत्त्वाचा वाटा असतो हे उघड आहे. खरे शिक्षण नेहमी दुहेरी असते. माणूस बाहेरच्या जगाचा एक भाग आहेच, पण तो या जगाचा पूर्ण गुलाम नाही.

पुढे वाचा

बुरुज ढासळत आहेत… सावध

आजचं चंद्रपूर तेव्हा चांदा होतं. माझ्या बालपणी चांदा हे नाव रूढ होतं. नव्हे मनात तेच नाव घर करून होतं. चांद्याबद्दल अनेक आख्यायिका ऐकवल्या जात. चांदा फार मोठं आहे असं वाटायचं. बीएनआर या झुकझुक गाडीनं चांद्याला यायचो. गडिसुर्ला हे मूल तालुक्यातलं माझं गाव. गावच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरावर चढलं की दूरवर मूल दिसायचं. लहान लहान बंगले दिसायचे. डोंगराच्या पायथ्याशी आसोलामेंढाचा पाट वाहताना मनोवेधक वाटायचा. आंबराईत रांगेने उभी असलेली झाडी हिरवी गच्च वाटे. डोंगरावरून पूर्वेला नजर टाकली तर वाहणारी वैनगंगा नदी दिसायची. मार्कंड्याचं मंदिर दिसायचं.

पुढे वाचा

मन केले ग्वाही (भाग १)

खिळखिळी लोकशाही

आजचा सुधारक या मासिकाचे प्रकाशन सुरू झाल्याला लवकरच पंचवीस वर्षे होतील. एप्रिल एकोणीसशे नव्वद ते मार्च दोन हजार पंधरा या काळात जगात मोठाले बदल झाले. काही बदल पातळीचे, quantitative होते, तर काही गुणात्मक, qualitative होते. काही मात्र या दोन्ही वर्गांपैक्षा मूलभूत होते, आलोक-बदल किंवा paradigm shift दर्जाचे. या बदलांबद्दलचे माझे आकलन तपासायचा हा एक प्रयत्न आहे, विस्कळीत, अपूर्ण, असमाधानकारकही. पण असे प्रयत्न करणे आवश्यकही वाटते. शीतयुद्ध आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या आधीची पंचेचाळीस वर्षे सर्व जग शीतयुद्धाच्या छायेत होते. ताबडतोब आधीची पंधरा वर्षे ब्रिटनमध्ये (यूनायटेड किंग्ड) स्थितिवादी हुजूर पक्ष सत्तेत होता.

पुढे वाचा

अंधश्रद्धानिर्मूलनाची एक गोष्ट

घराची बरीच दुर्दशा झालेली असताना दुरुस्ती व देखभालीचे काम काढायचे ठरले. ठेकेदार मिश्रीलाल ह्यांना ठेका देण्यात आला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी, दोन लेबर बाजूच्या सर्वंट क्वार्टरमध्ये आणून ठेवतो असे आम्हाला सांगितले व त्याबरोबरच हेही बजावले, की त्या लेबर लोकांना काहीही द्यावयाचे नाही. ते स्वतःची व्यवस्था करून घेतील. तुम्हाला कटकट नको म्हणून आधीच सांगतो.

किशोर, ललिता व त्यांचे एक वर्षाचे बाळ दुसऱ्या दिवशीच आले. झोपलेल्या बाळाला खाटेवर टाकून ललिताबाईने आपला संसार थाटण्यास सुरुवात केली. एका तासाच्या आतच त्या गचाळ सर्वेंट्स् क्वार्टरचा कायापालट झाला व तीन दगडांच्या चुलीवर भात मांडला गेला.

पुढे वाचा

नवा पर्यावरणवाद

नवा पर्यावरणवाद गेल्या काही दशकांत पर्यावरणीय जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या असून मानवी-सामाजिक जीवनाचा अधिक परिपूर्ण रीतीने विचार त्यातून पुढे आला आहे. शुद्ध हवा, पाण्याचे शुद्ध व निरंतर स्रोत, स्वच्छ सूर्यप्रकाश, नितळ आकाश वा चांदणे, या सृष्टीबद्दल वा इतर जीवांबद्दल प्रेम-कुतूहल, समृद्ध सांस्कृतिक- सामाजिक जीवन, जंगल-झाडे, प्राणी-पक्षी यांचे अस्तित्व या गोष्टी अधिक समृद्ध जीवनासाठी आवश्यक असतात. आदिवासी, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठीतर अधिकच. त्यांच्या जीवनाचा तो सहज भाग असतो. जीवनाची गुणवत्ता व सौंदर्य हा सर्वांचाच अधिकार आहे. कष्टकरी वर्गाचा देखील. पर्यावरणीय व सांस्कृतिक उन्नयनाचा त्यांच्याशी संबंध नाही असे म्हणणे हे भांडवलशाही राजकारणाचा भाग आहे.

पुढे वाचा

सम्यक जीवनशैली

या सर्वांना जोडून सामाजिक व व्यक्तिगत जीवनशैलीबद्दल आखणी करणे व धोरण असणे आवश्यक बनले आहे. जीवनशैलीचा मुद्दा उपभोगाशी, वस्तू व साधनसंपदेच्या वापराशी निगडित आहे. उपभोगवाद किंवा चंगळवाद हा मुद्दा व्यक्तिवादी नैतिकतेबरोबरच सामाजिक नीतीचा (सोशल मॉरॅलिटी), आपल्याशिवाय इतरांच्या लोकशाही हक्कांचा व साधनसंपत्तीविषयक धोरणांचा आहे. प्रत्येकाने किती पाणी, वीज, जंगल, नैसर्गिक साधनसपंत्ती वापरावी, इथपासून किती धन व वस्तूसंग्रह करावा येथपर्यंत अनेक बाबी वापरण्यावर कमाल मर्यादा येतील. अमेरिका-युरोपप्रमाणे दरमाणशी वीजवापराचे व अन्य उपभोगाचे उद्दिष्ट प्रमाण मानले तर भारतातल्या सर्व नद्यांवर अगडबंब धरणे बांधून सर्व जंगले, जमीन, पैसा वापरूनही त्याची पूर्तता होणार नाही.

पुढे वाचा

दुष्काळ – पाण्याचा की विचारांचा?

(थोर पर्यावरणतज्ज्ञ अनुपम मिश्र ह्यांचा हा लेख काश्मीरमधील प्रलयाच्या पार्श्वभूमीवर ह्या अंकात प्रकाशित करीत आहोत. डॉ राजेन्द्रप्रसाद ह्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे विचार प्रथम आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले होते. प्रस्तुत लेखात, समुद्रकिनाऱ्यावरील खारफुटीची जंगले नष्ट केल्यामुळे त्या प्रदेशात किंवा मुद्दाम उंचावरून रस्ते काढल्यामुळे सखल प्रदेशात पूर आल्याची उदाहरणे देऊन त्यांनी एक महत्त्वाचा सिध्दान्त मांडला आहे, तो असा की दुष्काळ किंवा पुरासारख्या आपत्ती अचानक कधीच येत नाहीत. त्यांच्या आधी चांगल्या विचारांचा दुष्काळ आलेला असतो. ‘ज्ञानोदय’ मासिकाच्या जून २०१४ च्या अंकातून अनुवादित, संपादित, साभार.

पुढे वाचा