माझी विचारसरणी

विविध विषयांवर माझे विचार काय आहेत, माझी मते कोणती आहेत ते या लेखात मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे. विविध विषय म्हटले तरी ते देव-धर्म-श्रद्धा-विवेकवाद यांच्याशी संबंधित आहेत. तसेच लेखातील विषय काही एका विशिष्ट क्रमाने मांडले आहेत असे नाही. जसे सुचेल तसे लिहिले आहे. मला जे मन:पूर्वक वाटते तेच लिहिले आहे.

  1. हे विश्व कशातून निर्माण झाले? कसे उत्पन्न झाले? कोणी केले? प्रारंभी काय होते? हे विश्व शून्यातून निर्माण झाले का? याविषयी मला निश्चित असे काही ठाऊक नाही. अजून मतमतांतरे आहेत असे दिसते. महाविस्फोट, बिगबॅंग, हिग्सबोसोन् कण यांसंबंधी प्रसंगपरत्वे वाचतो.
पुढे वाचा

शैक्षणिक गुणवत्ता मानसिकतेत रूजायला हवी !

दोन हजार साली ‘डकार’ येथे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या संदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘गुणवत्ता’ हा शब्द शिक्षणाच्या संदर्भात प्रथम वापरला गेला. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबरच त्यातील गुणवत्ता वाढवणे याचा उल्लेख परिषदेच्या शेवटी जाहीर केलेल्या निवेदनात होता. जे शिक्षण मुलांच्या अध्ययनविषयक गरजा भागवते आणि त्यांचे जीवन समृद्ध बनवते, तेच गुणवत्तापूर्ण शिक्षण अशी व्याख्या त्यावेळेच्या अहवालात केली होती.

‘डकार’ परिषदेच्या नंतर भारतीय केंद्र सरकारने प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील शिक्षणतज्ज्ञांची कॅबेट (CABET) समिती बनवली होती. या समितीची जबाबदारी नवीन ‌शैक्षणिक धोरण, कायदा व आराखडा यांचा दस्तऐवज करणे ही होती.

पुढे वाचा

भारतातील रॅशनॅलिस्ट चळवळ

एका अभ्यासू रॅशनॅलिस्टच्या मते भारत देश हा फक्त धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचाच देश नसून  नीरिश्वरवाद, विवेकवाद, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती, अज्ञेयवाद यांचेही अंश कुठे ना कुठे तरी या देशात प्राचीन काळापासून सापडतात. जेव्हा हे मत आपण धसास लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील खरेपणाविषयी संशय वाटू लागतो. कारण आपल्या आवती भोवती धर्माच्या अतिरेकामुळे विवेक, मानवता यांना पायदळी तुडवलेली उदाहरणं मोठ्या प्रमाणात सापडतात. परंतु डॉ. जॉन (जोहान्नेस) क्वॅक या एडिनबरो विद्यापीठातील प्राध्यापकाला मात्र आपल्या देशातील हा वेगळेपणा चटकन लक्षात येतो. त्यानी यासंबंधी एक प्रबंधच सादर केला असून त्याच प्रबंधाची पुस्तकी आवृत्ती Disenchanting India या नावाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केली आहे.

पुढे वाचा

जगावेगळे

(विदर्भातील तत्त्ववेत्ते व विचारवंत दि.य. देशपांडे ह्यांनी आपल्या विदुषी पत्नी मनू गंगाधर नातू ह्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आजचा सुधारक ह्या विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या मासिकाची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ह्या जगावेगळ्या दांपत्यावरील, लोकमत २०१४ च्या दिवाळी अंका पूर्वप्रकाशित झालेला हा लेख – का.सं.)

गोष्ट खूप जुनी आहे. पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीची म्हणजे जवळजवळ गेल्या जन्माची वाटावी अशी. पण मला अद्यापही तो काळ विसरता येत नाही. लहानशा खेड्यातून मी विदर्भ महाविद्यालयात शिकायला आले होते. शहरात छोटीशी खोली घेऊ न राहात होते आणि सायकलने कॉलेजात येत होते.

पुढे वाचा

अपूर्णाकाचा गुणाकार

आपण एका राष्ट्राचे, समाजाचे, एका समूहाचे एक घटक या दृष्टीने स्वत:कडे पाहावे हा संस्कार आमच्या मनावर नाही. या दृष्टीने आम्ही स्वत:कडे पाहात नाही. एक स्वतंत्र, स्वयंपूर्ण व्यक्ती अशा दृष्टीने आपण स्वत:चा विचार करतो. आपली स्वत:ची उन्नती, परिणती, पूर्णता, मोक्ष ही गोष्ट सर्वस्वी समाजनिरपेक्ष आहे, अशी आमची बाल्यापासून वार्धक्यापर्यंत भावना असते व तद्नुसार आपले वर्तन असते.. आज शेकडो वर्षे आमच्या जीविताचे वळणच असे आहे; त्याची घडणच तशी झालेली आहे. आम्ही स्वकेंद्रित आहो. समाज हा आमच्या अवलोकनाचे केंद्र नाही. त्यामुळे समाज म्हणून जगण्याची विद्या आम्हांला हस्तगत करता येत नाही.

पुढे वाचा

मन केले ग्वाही (भाग ३)

पिठामिठाचे दिवस

एकोणीसशे पासष्ट-सहासष्टमध्ये अनेक भारतीय लोक एक सेक्युलर उपास करू लागले. तृणधान्यांची गरज आणि उत्पादन यांत साताठ टक्के तूट दिसत होती. पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी सुचवले, की सर्वांनी जर आठवड्यात एक जेवण तृणधान्यरहित केले तर तृणधान्ये आयात करावी लागणार नाहीत. हे म्हणणे बहुतांश भारतीयांना पटले, आणि ‘शास्त्री सोमवारा’चे व्रत सुरू झाले. आजही अनेक जण करतात, म्हणे.

त्याकाळी, आणि अगदी १९८० पर्यंत भारतीय अन्नोत्पादनावर बराच जाहीर खल केला जात असे. टीका, त्रागा, विनोद, अनेक अंगांनी चर्चा होत असे; उदा. ‘पावसाळा बरा आहे.

पुढे वाचा

‘त्यांच्या’ बायका, ‘त्यांची’ इभ्रत!

बायकांसंबंधीचे लेख सहसा 8 मार्चच्या निमित्ताने लिहिण्याची आपली प्रथा आहे. कारण त्या दिवशी (हल्लीच्या) भारतात बायकांचा बैलपोळा साजरा केला जातो. त्या दिवशी स्त्रियांच्या सक्षमीकरणाची, त्यांच्या आत्मनिर्भरतेची, त्यागाची, हक्कांची, मातृहृदयाची, जिद्दीची, समंजसपणाची इतकी चर्चा केली जाते की त्या उमाळ्यांनी आपले सामुदायिक सांस्कृतिक रांजण भरून वाहायला लागते. आपल्या एकंदर सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाचे उथळ व्यापारीकरण आणि माध्यमीकरण झाल्याने अलीकडे तर स्त्रियांना 8 मार्चचा दिवस म्हणजे ‘नको त्या जाहिराती आणि सवलती’ असे वाटले नाही तरच नवल! परंतु 8 मार्चचे हे उमाळे अजून एप्रिलही सरत नाही तोच पुरते आटून आता स्त्रियांचे सक्षमीकरण तर सोडाच, पण त्यांना सार्वजनिक जीवनातून देखील हद्दपार करण्याची तयारी आपण चालवली आहे आणि त्या हद्दपारीचे नाना परीने गौरवीकरणही घडते आहे.

पुढे वाचा

स्त्रीच्या दुःखाचा शोध घेणाऱ्या समाजव्यवस्थेची मीमांसा

‘संदर्भासहित स्त्रीवाद’ हा सुमारे ५८० पृष्ठांचा बृहत् -ग्रंथ प्रकाशित होणे ही एक अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. हा ग्रंथ ‘विद्या बाळ कार्यगौरव ग्रंथ’ आहे आणि याची आखणी, यात समाविष्ट लेखांची मौलिकता आणि दर्जा, याने कवेत घेतलेले चर्चाविश्व यासाठी प्रथम या ग्रंथाच्या संपादकत्रयींचे मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे. ‘मिळून साऱ्याजणी’च्या संस्थापक आणि स्त्रीप्रश्नांचा सार्वत्रिक वेध घेत चळवळीला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सर्वदूर घेऊन जात व्यापक दिशा देणाऱ्या विद्याताईंच्या कार्याचा हा नुसता गौरवच नाही, तर स्त्रीप्रश्नांची सर्वागीण मांडणी, त्यासंबंधी सुरू असणारे अनेक पातळ्यांवरील काम यासंबंधीची माहिती यांचे तपशीलवार दस्तावेजीकरण या ग्रंथात झालेले असल्यामुळे एखाद्या मूल्यवान संदर्भग्रंथाचे स्वरूप या ग्रंथाला प्राप्त झालेले आहे.

पुढे वाचा

`हैदर’ आणि `डॉ. प्रकाश बाबा आमटे’

सुप्रसिध्द दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांचा `हैदर’ आणि `समृद्धी’ पोरे यांचा `डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे चित्रपट आपल्या समाजापुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पुढे आणतात. जरी या चित्रपटांचा हेतू वेगळा असला तरी या चित्रपटांतून या विषयांची मांडणी अतिशय समर्थपणे पुढे येते. एक विषय काश्मीरमधील दहशतवादाचा, जो हैदरमध्ये हाताळला आहे. तर दुसरा नक्षलवादाचा, जो डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात हाताळला आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे विषय या चित्रपटांचे मूळ विषय नाहीत. पण चित्रपटाच्या मुख्य विषयांच्या अनुषंगाने हे विषय अपरिहार्यपणे या चित्रपटात दाखल झाले आहेत आणि या प्रश्नांमुळेच या चित्रपटांना गांभीर्य आणि खोली प्राप्त झालेली आहे.

पुढे वाचा

प्रश्न शिक्षणाच्या गुणवत्तेचा!

शालेय शिक्षणाची गुणवत्ता म्हणजे नेमके काय या बाबत बरीच मतमतांतरे असली तरी, सध्या ती फारशी बरी नाही, याबाबत तज्ज्ञ आणि सामान्य या दोघांतही एकवाक्यता असल्याचे दिसते. गेल्या काही दशकांत राज्यातली शाळांची यंत्रणा फार वेगाने विस्तारली आहे. काही अतिदुर्गम भागांचा अपवाद वगळला तर जवळ शाळा नाही म्हणून शिक्षण मिळत नाही अशी स्थिती नक्कीच नाही. ग्रामीण भागात शिक्षक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तरही बऱ्याच वेळा एका शिक्षकामागे तीस पस्तीस मुले, म्हणजे आदर्श म्हणावे, असे असते. एकूणच शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आपण बरीच मजल मारली आहे.

पुढे वाचा