घटनेत मूलभूत बदल करणे शक्य आहे का – भाग २

घटनेत मुलभूत बदल करावयाचे असतील तर काय करावे लागेल?

धार्मिक भावनांचा उपयोग करणे

भाजप सरकारला घटना बदलायचीच आहे, असे निश्चित विधान करता येणार नाही. पण तसे करावयाचे असल्यास, वरील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सत्ताधाऱ्यांना कोणती पाऊले उचलायला लागतील, याची कल्पना आपण करू शकतो. भारतीय जनता सामान्यत: धार्मिक वृत्तीची आहे. जनतेच्या या वृत्तीचा आधार घेऊन जनतेत हिंदुधर्माचा आधार असलेल्या हिंदुत्ववादाचा प्रसार करून जनमत प्रभावित करता येऊ शकते. पुरोगामी, उदारमतवादी आणि आंबेडकरवादी सोडले तर बहुजन समाजाच्या भावना घटनाबदलाविषयी फारशा आक्रमक असण्याची शक्यता नाही.

पुढे वाचा

आवाहन

लेखाजोखा सरकारचा – नागरिक मूल्यमापन विशेषांक

आपल्या प्रातिनिधिक लोकशाहीत दर पाच वर्षांनी आपणच लोकप्रतिनिधी निवडून देत असल्यामुळे त्यांची कामे लोककेंद्रित असणे अपेक्षित असते. यासाठी सत्ताधारी पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांपैकी किती कामे केलीत वा किती केली नाहीत ह्याचा आढावा वेळोवेळी घेत राहणारी सक्रिय यंत्रणा असायला हवी. माध्यमांची भूमिका खरे तर इथे महत्त्वाची ठरते. परंतु सद्य:स्थितीत हे चित्र फारसे आशादायी राहिलेले नाही. निवडणुकीच्या दिवशी ‘मतदाता’ तर इतर वेळी ‘व्यवस्थेचे समीक्षक’ ह्या निष्पक्ष भूमिकेत आपल्याला जाता आले तरच लोकप्रतिनिधींवर मूल्यमापनाचा अंकुश राहू शकेल.

विकासाची सध्याची व्याख्या पायाभूत सुविधांपुरती (Infrastructure) आक्रसली गेली आहे यात दुमत नसावे.

पुढे वाचा

मनोगत


चित्र : तनुल विकमशी

आपल्या समाजात नास्तिकांची संख्या किती या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळणे कठीणच! याचे एक कारण म्हणजे याच्या नोंदणीची कुठे सोय नाही. आणि दुसरे म्हणजे नास्तिक असणारे अनेकजण उघडपणे आपली अशी ओळख देऊ इच्छित/धजावत नाहीत.

खरे तर संशयवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांतून सुरू होणारा प्रवास स्वाभाविकपणे नास्तिकतेकडे जातो. विज्ञान, तंत्रज्ञान यांतून मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग सगळे जण उचलतात. पण तरीही विज्ञानाने साध्य केलेल्या अनेक छोट्या-मोठ्या शोधांचे श्रेय शेवटी देवाला देण्याकडेच आस्तिकांचा कल जातो. आणि म्हणूनच आस्तिक असणाऱ्यांचा आस्तिक नसणाऱ्यांसोबतचा संवाद उदार नसतो.

पुढे वाचा

सांगली नास्तिक परिषद – का? व कशासाठी? 

ब्राईट्स सोसायटीतर्फे गेली १० वर्षे आपण अनेक उपक्रम राबवतो आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांमध्ये साहचर्य, सुसंवाद निर्माण करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे इत्यादी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ब्राईट्स सोसायटीची स्थापना करण्यात आली. २०१४ पासून ब्राईट्स सोसायटीने सभा, नास्तिक संमेलने, भाषणे, चर्चासत्रे आणि चर्चा आयोजित केल्या आहेत. या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो. निमंत्रित वक्त्यांमध्ये समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्वे, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, लेखक, संपादक, स्तंभलेखक, कायदेतज्ज्ञ, राजकारणी, अभ्यासक, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते इत्यादिंचा समावेश होतो. ब्राईट्स सोसायटीने मराठीत एक पुस्तकही प्रकाशित केलेले आहे.

पुढे वाचा

कुचंबणा होत असेल तर त्यातून बाहेर काढणे हे उद्दिष्ट

आपल्या ब्राईट्स संस्थेच्या उद्दिष्टांचा जो छापील, कायदेशीर असा एक कागद माझ्याकडे आहे, त्याच्यात साधारण दहा बारा उद्दिष्टं लिहिलेली आहेत. त्यातलं एक मुख्य उद्दिष्ट आहे की, आपण ज्या समाजात राहतो तिथे काहीतरी लोकशिक्षण आपण केलं पाहिजे. २०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला त्यावेळेला विचारांची जी एक घुसळण झाली त्या घुसळणीतून ब्राईट्स संस्थेची स्थापना झाली. आज त्याला दहा वर्षं झाली. त्यावेळी एक उद्दिष्ट असंही होतं की, कुठल्याही नास्तिक माणसाला मी “नास्तिक” आहे याची लाज न बाळगता सांगता आलं पाहिजे. 

खूप वर्षांपूर्वी मी एक सर्व्हे घेतला होता.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्ष नहीं, हमें धर्मविहिन बनना है

मेरी सबसे जो अच्छी पहचान करवानी है, वो फिल्म में ही हुई है। फिल्म वालों को मुझसे शायद कुछ दुश्मनी है, इसलिए वो लोग हमेशा फिल्मों में मेरी पोल-खोल करते रहते हैं। Gandhi my father नाम की एक फिल्म आयी थी, जो मेरे दोस्त फिरोज अब्बास खान ने बनाई थी। बापू और उनके बड़े बेटे हरिलाल के बीच में जो संघर्ष हुआ था उसपर वो फिल्म बनी थी। उसके एक सीन में अक्षय खन्ना जिसने हरिलाल का पात्र निभाया था, वो दारू के नशे में धूत रात को अपने मोहल्ले में पहुँचता है। जिन्दगी भर सब लोगों की फटकारे पड़ती रहने के कारण वो उब चुका होता है और उस सीन में वो बहुत डिस्टर्ब्ड होकर, एक्साइट होकर रात के अंधेरे में शोर मचाता है। एक डाइलोग उसमें लिखा था, “हां, मैं गांधी की बिगडी हुई संतान हूं।” फिरोज अब्बास खान ने रिलीज के पहले मुझे बुलाया की, “आकर देख लो ये फिल्म ठीक लगती है या नहीं?”

पुढे वाचा

मैं और मेरी नास्तिकता

मैँ बहुत आभारी हूं कि आप लोगों ने मुझे यहां, इस जलसे में बुलाया. यहां आकर मुझे बहुत खुशी है कि इतने अंधेरे में भी लोग दीये जलाये हुए हैं.  और गम इस बात का है कि २१वीं सदी में नास्तिकता पर चर्चा हो रही है. एक ऐसा विषय जिसका फैसला १८वीं सदी में ही हो जाना चाहिए था. सच्ची बात तो यह है कि नास्तिकता तो ऐसी होनी चाहिए थी, जैसे ऑक्सीजन. हम सांस लेते हैं, तो सोचते थोड़े हैं कि हम सांस में ऑक्सीजन ले रहे हैं.

पुढे वाचा

परिसंवाद – नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा

डॉ. प्रदीप पाटील : नास्तिकतेची मर्यादा आणि सामर्थ्य या विषयाचा परिसंवाद आपण इथे घेतला. प्रसारमाध्यमं, समाज आणि राजकारण या अंगांनी आपण मर्यादा काय आहेत आणि ताकद काय आहे ते जाणून घेतलं. हा परिसंवाद घेण्यामागचं कारण हे होतं की नास्तिकता ही नकारात्मक आहे असं नेहमी म्हटलं जातं. न आणि अस्तित्व – अस्तित्व न मानणारा – असं ते नास्तिकत्व असतं. तुम्ही जर सगळ्या गोष्टींना नकारच देणार असाल तर तुमच्याकडे काय आहे? प्रश्न आहे हा, परत एकदा ऐका. जर तुम्ही नकारच देणार असाल तर तुमच्याकडे फक्त नकारच आहे का?

पुढे वाचा

नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा आणि प्रसारमाध्यमांतील नास्तिक्याची भूमिका

शिवप्रसाद महाजन : नास्तिक कायमच गंभीर असतो असा आपल्याकडे साधारणपणे बऱ्याचजणांचा समज असतो. किंवा बरेचजण तसे जाहीरपणे बोलतदेखील असतात. आपले सकाळपासूनचे कार्यक्रम बघितले तर त्यामध्ये चर्चासत्रं झालीत, परिसंवाद होतोय, काही गाण्यांचे कार्यक्रम झाले, नंतर एकांकिका आहे, रात्री पुन्हा गाण्याचे कार्यक्रम आहेत. तर असं काही नसतं की नास्तिक नेहमी गंभीरच असतो. तो सर्व क्षेत्रात आपापल्या परीनं आपापली भूमिका बजावत असतो. बरेचजण त्यापैकी यशस्वीपण झालेले आहेत. नास्तिक यशस्वी झालेला आहे असं म्हटलं की समोरून एक प्रश्न हमखास येतो, त्यांची नावे सांगा. आणि मग इथे आपली जरा पंचाईत होते.

पुढे वाचा

चिथावणीला बळी पडू नका

नमस्कार. मला प्रथम माझी एक आठवण सांगायची आहे. आमच्याकडे एकदा पाहुणे येणार होते. तर त्यांना चहाबरोबर काहीतरी खायला द्यावे लागणार! संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे कशासोबत हे सांगायची गरज नाहीये. काहीतरी मागवायचं होतं खायला. तर आईने मला सांगितलं, “अरे, घरातले काजू आणि बदाम संपले आहेत तर पटकन् जाऊन घेऊन ये.” मी गेलो तर दुकानात काजू-बदाम नव्हते, संपले होते. मी तिथून फोन केला माझ्या भावाला आणि म्हणालो, “आईला विचार की तिथे काजू-बदाम नाहीयेत. तर काय करू?” आईने झटकन् सांगितलं, “दाणे असतील तर दाणे तरी घेऊन ये.”

पुढे वाचा