दुष्काळ – चांगल्या कामांचाही

दुष्काळ, राजस्थान, पारंपरिक जलव्यवस्थापन
—————————————————————————–
कमी पाऊस म्हणजे दुष्काळ हे समीकरण खोडून काढणारा, सामूहिकता, पारंपरिक शहाणपण व बंधुभाव म्हणजे काय हे समजावून सांगणारा स्वानुभव.
—————————————————————————–

आज टेलिव्हिजन कुठे नाही? आमच्याकडेही आहे. आमच्याकडे म्हणजे जैसलमेरपासून सुमारे शंभर किमी पश्चिमेला पाकिस्तानच्या सीमेवर. आता हेही सांगून टाकतो की आमच्याकडे देशातील सर्वात कमी पाऊस पडतो. कधीकधी तर पडतच नाही. तशी लोकसंख्या कमी आहे म्हणा, पण तेवढ्या लोकांनाही जरूरीपुरते पाणी तर लागतेच. त्यातूनही येथे शेती कमी व पशुपालन अधिक आहे. येथील लाखो बकऱ्या, गाई, उंटांसाठीही पाणी पाहिजे.

पुढे वाचा

गांधी, मार्क्स, आंबेडकर: परस्परपूरकता शोधू या

गांधी, मार्क्स, आंबेडकर, परस्परपूरकता
—————————————————————————–
मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखून आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे कसे आवश्यक आहे ह्याची अभिनिवेशहीन मांडणी
—————————————————————————–

गांधी-आंबेडकर-मार्क्स हे त्रांगडे अजून काही सुटत नाही. उलट ते अधिकच तीव्र होते आहे की काय, असे वाटावे, असे पुरोगामी चळवळीतले सध्याचे वातावरण आहे. रोहित-कन्हैया प्रकरणाने तर आंबेडकर-मार्क्स वादाला नवी फोडणी बसली. या सगळ्या चळवळीकडे सजगपणे पाहणारा व त्यात सक्रिय सहभाग घेणारा एक कार्यकर्ता म्हणून या वादाकडे पाहताना मला काही केल्या कळत नाही की, आजच्या टप्प्यावर या वादाचे प्रयोजन काय?

पुढे वाचा

मिल्ग्रम प्रयोग – विघातक आज्ञाधारकपणा

आपण सर्वजण विघातक आज्ञाधारकतेचे बळी ठरण्याची  शक्यता आहे. व आपल्याला त्याबद्दल खूपच कमी जाण आहे हे भान जागविणारा सामाजिक मानसशास्त्रातील एका महत्त्वाच्या पैलूची ओळख करून देणारा लेख

—————————————————————————-

जाहीर सूचना

एका तासासाठी डॉलर कमावण्याची संधीस्मरणशक्तीच्या अभ्यासासाठी लोक हवे आहेत.

*   आम्हाला स्मरणशक्ती आणि शिक्षणासंदर्भातील वैज्ञानिक अभ्यासासाठी न्यु हॅवन येथील पाचशे पुरुषांची मदत हवी आहे. हा अभ्यास येल विद्यापीठात करण्यात येणार आहे.

*   सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस साधारण एका तासासाठी डॉलर (अधिक कारभत्त्यापोटी ५० सेंटस) दिले जातील.

पुढे वाचा

सुरांचा धर्म (२)

भारतीय संगीतपरंपरा, सूफी, हिंदू-मुस्लीम संबंध
—————————————————————————–
धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मीयांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणाऱ्या, मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी भारतीय संगीताला नेमके काय योगदान दिले हे साधार नमूद करणाऱ्या करणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध –
—————————————————————————–

इब्राहिम आदिलशाह अकबर बादशहाचा समकालीन होता. अकबर शेख सलीम चिश्तीचा भक्त होता. पुढे तो सूर्यपूजक झाला. फक्त वीस वर्षांचे असताना अकबराने रीवा संस्थानचे राजे रामचंद्रांच्या पदरी असलेल्या तानसेनाला मोगल-दरबारात आणले. तानसेनाला त्याने `कण्ठाभरणवाणीविलास’ ही उपाधी देऊन त्याचा सन्मान केला.

पुढे वाचा

असलेपण – नसलेपण

रा. स्व. संघ, डावा विचार, गांधी
——————————————————————————–
अलिकडे डावे-उजवे ह्यांच्यातील वैचारिक संघर्ष हातघाईवर आला आहे. अशा वेळी स्वतःला ‘डावा’ समजणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याने स्वतःशी व विरोधी विचारांशी संवाद करून आपली जडणघडण तसेच भारतीय समाजाची मानसिकता ह्यांचा शोध घेण्याचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न––
——————————————————————————–

मी अलीकडे पुष्कळच विचार करतो. म्हणजे मी नक्की कसा आहे? माझ्याशी मतभेद असणारा नक्की कसा आहे? मी जे आग्रह धरतो ते आग्रह धरणं योग्य आहे का? ‘मला हे पटतं’ म्हणजे काय? ‘पटत नाही’ म्हणजे काय? मुळात योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे या ‘डेंजर’ प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं आहे का?

पुढे वाचा

संपादकीय

दिवस चर्चांचे आहेत. शेकडो माध्यमांतून हजारो विषयांवर चर्चा झडत आहेत व लाखो लोक त्यांत हिरीरीने भाग घेतानाही दिसत आहेत. पण त्यातील बहुतेक चर्चा त्याच त्या रिंगणात अडकल्याचे आपल्याला जाणवते. दुष्काळासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर बोलतानाही मुळात अवर्षण आणि दुष्काळ यांचा संबंध, माती व पाण्याचे नियोजन, समाजातील विविध घटकांचे परस्परसहकार्य व समन्वयन, पीकपद्धतीत बदल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे चर्चा सरकत नाही. लातूरला पाण्याची ट्रेन नेली जाते ह्याचे माध्यमांतून प्रचंड कौतुक केले जाते. पण अशी ट्रेन आपण किती ठिकाणी नेऊ शकतो, किती काळ असे पाणी पुरवू शकतो, कानाकोपऱ्यांत विखुरलेल्या खेड्यापाड्यांत पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठीच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था कशी करायची ह्या प्रश्नांची चर्चा घडतच नाही.

पुढे वाचा

दुखऱ्या मूळांपर्यंत

सकाळ झालीय
फुलझाडांच्या झुंजूमुंजू उजेडात एक
हिंस्र जनावर काठीने
फुलांवर हल्ले करीत आहे.

बघता बघता
सगळ्या झाडांचे विविध आविष्कार
परडीत जमा होतील आणि
जनावर देवपूजेला बसेल तेव्हा
इथल्या झाडांना
फुलेच येत नाहीत अशी वदंता
झाडांच्या
दुखऱ्या मूळांपर्यंत पोहचली असेल
***

अकल्पित, गजबंधन सोसायटी
सी के पी हॉलसमोर, राम गणेश गडकरी पथ

अनुभव: कलमा

आंतरधर्मीय विवाह, मानवी नातेसंबंध, कलमा
________________________________________________________
मुस्लीम मुलगा व ख्रिश्चन मुलगी ह्यांचा विवाह, तोही आजच्या ३५ वर्षांपूर्वी.सुनबाई तर हवीशी आहे, पण तिचा धर्म न बदलता तिला स्वीकारले, तर लोक काय म्हणतील ह्या पेचात सापडलेले सासरे व प्रेमाने माने जिंकण्यावर विश्वास असणारी सून ह्यांच्या नात्याची हृद्य कहाणी, मुलाच्या दृष्टीकोनातून —
________________________________________________________
आमच्या लग्नाला कोणाचा विरोध नव्हता. आशाबद्दल तक्रार नव्हती. आमचे वडील तिच्या गुणांचे कौतुक करायचे. परंतु तिने मुसलमान व्हावे एवढीच त्यांची अट होती. आम्ही एकमेकाला व्यक्ती म्हणून पसंत केले होते. धर्मांतराचा विषयच नव्हता.

पुढे वाचा

माहितीपट -परीक्षण अ पिंच ऑफ स्किन: ती बोलते तेव्हा

अ पिंच ऑफ स्किन, प्रिया गोस्वामी, शिश्निकाविच्छेदन
—————————————————————————–
भारतातील एका संपन्न, सुशिक्षित समाजात कित्येक पिढ्या चालत असलेल्या एका रानटी, स्त्री-विरोधी प्रथेबद्दल असणारे मौन तोडून अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न सामोरे आणणाऱ्या माहितीपटाचा एका संवेदनशील तरुण मनाने घेतलेला वेध
———————————————————————-
“मी सहा वर्षांची होते. अम्मी म्हणाली – तुला वाढदिवसालाबोलावलंय. मी छान कपडे घातले, केस विंचरले. अम्मीसोबत निघाले. पण जिथे गेलेतिथे ना फुगे होते ना केक. मला एका अंधाऱ्या खोलीत नेलं. तिथे एक बाईहोत्या. मला कपडे काढायला लावले. त्या बाईंच्या हाती ब्लेड होतं. मला काहीकळायच्या आत दोन पायांमधल्या जागी त्यांनी कापलं.

पुढे वाचा

सुरांचा धर्म (१)

भारतीय संगीतपरंपरा, सूफी, हिंदू-मुस्लीम संबंध
—————————————————————————–
धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मियांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणारा हा लेख. भारतीय संगीताला मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी नेमके काय योगदान दिले व सूफी परंपरेने भक्ती संप्रदायाशी नाते जोडीत कर्मठ धर्मपरंपरेविरुद्ध कसे बंड पुकारले हा इतिहास विषद करणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध –
—————————————————————————–

गुजरातमधल्या हिंसाचाराच्या गोंधळात एका गोष्टीकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. बडोद्यात मुस्लिमविरोधी हिंसाचारादरम्यान उस्ताद फैयाज खानांच्याकबरीची मोडतोड झाली. अहमदाबादेत अनेक दंगे या धर्मपिसाटांनीभुईसपाट केले. त्यापूर्वी अनेक वर्षांपासून कधी गुलामअलीच्या गाण्याच्या कार्यक्रमात गोंधळ, मेंहदी हसनला कार्यक्रम करण्यापासून रोखणे असे अनेक प्रकार झाले.

पुढे वाचा