सध्या महाराष्ट्रात तरी वृक्षप्रेमाच्या भावनेचा महापूर आला आहे. भारतीय मनोवृत्ती मुळातच भावनेच्या आहारी जाऊन प्रत्यक्ष फायदा- तोटा यांचा विवेक हरवून बसण्याची आहे. त्यात विविध प्रसारमाध्यमांची भर पडल्यामुळे सर्व समाजाला वृक्षप्रेमाचा ज्वर चढला आहे. त्यामुळे अवास्तव खर्च, वाया जाणारे श्रम, वाढती गैरसोय, भूगर्भातील पाणी कमी होणे व काही वेळा हकनाक मृत्यु हे सर्व दोष निर्माण होत आहेत. त्यापैकी काही पैलूंकडे ह्या लेखात लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.
झाडे व पाऊस
झाडांमुळे, जंगलामुळे पाऊस वाढतो अशी एक समजूत समाजमनात घर करून आहे. पण ह्या समजुतीला काहीही शास्त्रीय आधार नाही!