‘क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे?’ चारशे वर्षांपूर्वी नामदेवांनी हा प्रश्न विचारला होता. ‘शब्दवेध’ संस्थेच्या ‘अमृतगाथा’मधून चित्रकार, गायक व लेखक माधुरी पुरंदरे यांनी या प्रश्नातील काकुळती त्यांच्या आर्त स्वरातून महाराष्ट्रभर पोहोचवली होती. नामदेवांच्या या प्रश्नाची तीव्रता अद्यापि वाढतेच आहे. आज करोनामुळे संपूर्ण जगाला स्वत:च्याच घरात राहण्याची सक्ती झाली आहे. अशाच काळात अशा प्रश्नांना आपण सामोरं गेलं पाहिजे. ‘मी, माझं सदन आणि माझं बाहेरचं जग’ यासंबंधीचे प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजेत. त्यादृष्टीने आपत्ती ही एक संधी असते. आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या व बाजूला पडलेल्या प्रश्नांना भिडा असंच नामदेव सुचवत होते.
विषाणूंच्या अगम्य गमती – आशिष महाबळ
२०१९च्या डिसेंबरच्या शेवटी पहिल्यांदा सापडलेल्या इवल्याशा एका विषाणूने मानवजातीच्या नाकी नऊ आणले आहेत. तो चीन देशातील वुहान प्रांतातील wet market मध्ये कसा सापडला येथपासून ते सोशल डिस्टंसिंग का आणि कसे करायचे ते आता सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे कोणाचे कोणते निर्णय चुकले आणि कोणाचे कोणते आडाखे आणि कोणती भाकीते चुकू शकतात याचीपण आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये मी खगोलशास्त्राच्या डेटाव्यतिरीक्त कॅन्सर आणि इतर वैद्यकीय डेटा याचे ज्ञानात रूपांतर करण्याच्या प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. साहजिकच या नव्या संकटाशी दोन हात करण्याच्या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलायचा माझाही प्रयत्न सुरु झाला.
व्हायरस असाही तसाही – प्राची माहूरकर
( ऑक्टोबर २०१९ च्या अंकात डॉ. सुभाष आठले ह्यांच्या ‘मेकॉले, जी एम फूड्स आणि कॅन्सर एक्सप्रेस’ ह्या लेखावरील प्रतिक्रिया)
फार पूर्वी शेतीवर झालेल्या भयानक संक्रमणाचा कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने आढावा
ऑक्टोबर २०१९ च्या अंकात डॉ. सुभाष आठले ह्यांनी लिहिलेला ‘मेकॉले, जी एम फूड्स आणि कॅन्सर एक्सप्रेस’ ह्या शीर्षकाचा एक अतिशय एकांगी असा लेख वाचनात आला. त्यात त्यांनी मेकॉले ह्यांच्या नावावर फिरत असलेल्या एका भाषणाचा उल्लेख करून, हे भाषण मेकॉले ह्यांचे नाही व तरीही त्यांच्या नावानिशी फिरत असल्याचा उल्लेख करताना हा अफवांचा व्हायरस भारतभर पसरला असे म्हटले आहे.
ही तर लखलखती सोनेरी संधी…! – प्रशांत पोळ
अफझलखानाचं स्वराज्यावरील आक्रमण हे स्वराज्यावरचं फार मोठं संकट होतं. उणे पुरे दहा – बारा वर्ष तर झाले होते, शिवाजीराजांना स्वराज्य स्थापून! हाताशी असलेले थोडेफार किल्ले. आजच्या भाषेत दोन तीन जिल्ह्यांपुरतं सुद्धा नव्हतं हे राज्य.
अन् ह्या अश्या राज्याला चिरडण्यासाठी क्रूरकर्मा, महाभयंकर अफझलखान तीस – पस्तीस हजारांचं चतुरंग सैन्य घेऊन निघाला होता. स्वराज्याजवळ होते, सर्व मिळून अवघे सहा हजार सैनिक! आदिलशाहीचा तर विश्वास होताच, शिवाजीचं राज्य संपणार म्हणून. पण मोंगल, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, वलंदेज… या सार्यांचाही ठाम विश्वास होता की शिवाजी संपणार आणि त्याचं राज्य उध्वस्त होणार.
सामाजिक अंतर नव्हे…. (गणेश देवी आणि कपिल पाटील
Social Distancing नका म्हणू, त्याचा इतिहास भयकारी आहे.
गणेश देवी आणि कपिल पाटील यांचे PM मोदी यांना पत्र
आयुष्य वाचवण्याची किंमत काय? – एक मर्मभेदी प्रश्न – चेतन भगत
चेतन भगत यांचा वर्तमानपत्रीय लेख
मनोगत
जगातील आजची परिस्थिती अभूतपूर्व म्हणावी लागेल. ह्याचा अर्थ असा नव्हे की आजवर साथीचे रोग आलेच नाहीत. आले, परंतु त्यावरील उपाय म्हणून जागतिक संचारबंदी लादावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. अश्या संचारबंदीचे परिणाम काय होत आहेत आणि काय होणार आहेत, ह्यांचा विचार सर्वप्रथम करणे क्रमप्राप्त आहे.
अगदी अलीकडेपर्यंत सुरू असलेले जातीय, धार्मिक, राजकीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न ह्या एकाच समस्येमुळे तूर्तास कालबाह्य झाले आहेत. सरकार पूर्ण शक्तीनिशी ह्या समस्येशी झुंजण्यात लागले आहे. हा विषाणू चीनमधून भारतात संक्रमित होण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरात प्रवास करणारे उच्चवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय प्रवासी.
COVID-19 विषयी
साधारण नोव्हेंबर २०१९ पासून मार्च २०२० पर्यंत म्हणजे फक्त साडेचार-पाच महिन्यांत संपूर्ण जगामधील मानवी आयुष्य एका छोट्याशा विषाणूने विस्कळीत केले आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या साधारण हजारपट लहान, इतक्या छोट्या असलेल्या या विषाणूमुळे आपले रोजचे सामाजिक, आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. आज मार्च २०२० महिन्याच्या शेवटी संपूर्ण जग फक्त या विषाणूची लागण कशी थांबवता येईल आणि ते करताना आपल्या मूलभूत जीवनावश्यक गरजा कशा भागवता येतील हे सोडून इतर काहीही विचार करू शकत नाही आहे. Corona/SARS-CoV2/COVID-19 अशा विविध नावांनी आज कुप्रसिद्ध झालेला हा विषाणू कुठून आला, कसा पसरला, या विषाणूमुळे पुढे नेमके काय काय होईल आणि यावर उपाय कधी येणार असे अनेक प्रश्न पडलेले आहेत.
घोटभर अवकाश आणि एक विचित्र पेच
इंदौरच्या `नई दुनिया’ दैनिकामध्ये २३ मार्च २०२० रोजी प्रकाशित सोपान जोशी ह्यांच्या हिन्दी लेखाचा अनुवाद
अगदी सामान्य भारतीय नागरिकापासून ते ज्येष्ठ-श्रेष्ठ वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनाच पाण्याविषयी एक महत्त्वाचे तथ्य माहिती आहे – पाणी निर्माण करता येत नाही. आधुनिक विज्ञानाने आज कल्पनातीत प्रगती केली आहे. रेणू ज्यापासून बनलेला असतो त्या सूक्ष्म अणूला भेदून त्यातील ऊर्जादेखील आपण काढू शकतो. अनेक नवनवीन रसायनांचा शोध तर लागलेला आहे, निसर्गात न आढळणारी मूलद्रव्येसुद्धा प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहेत. आणि तरीही, पाण्याची निर्मिती काही आपण करू शकत नाही.
पाण्याचे रासायनिक सूत्र अगदी मुलांनासुद्धा ठाऊक आहे.
सिनेमाकडे पाहण्याची निर्मम दृष्टी देणारा ‘सिनेमा पाहणारा माणूस’
अशोक राणे हे नाव चित्रपटशौकिनांच्या चांगल्या परिचयाचं आहे. गेली चार दशके ते सातत्याने लेखन करीत आले आहेत. विविध दैनिकांतून त्यांनी चित्रपटसमीक्षा लिहिली आहे. याच काळात त्यांनी चित्रपट माध्यम केंद्रस्थानी ठेवून ग्रंथलेखनही केले आहे. त्यांच्या ग्रंथांना राष्ट्रपती पुरस्कारही लाभले आहेत.
चित्रपटजगतातला त्यांचा संचार हा केवळ लेखनापुरता मर्यादित नाही. फिल्म सोसायटी चळवळीत एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यातून त्यांची कारकीर्द वेगळ्या दिशेने घडत गेली. विविध देशांतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक (ज्युरी) म्हणून जाण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक व्यापक आणि विशाल असे परिमाण प्राप्त झाले.