आपला देश कोविद १९ महामारीच्या तीव्र लाटेत वेढला असतांनाच्या काळात केंद्र सरकारने तीन नवी कृषी विधेयके संसदेत घाईघाईने मंजूर करून घेतलीत. त्यामुळे या विधेयकांविरुद्ध देशातील शेतकऱ्यांनी अभूतपूर्व आंदोलनाद्वारे आपला विरोध नोंदविला. या नव्या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा अंतिमत: फायदाच होणार आहे हे जे केंद्रसरकारतर्फे सतत सांगितले जात आहे ते निश्चितच संशयास्पद आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या बदलांची कोणतीही मागणी केलेली नसतांना आणि त्यांना विश्वासात न घेता केंद्रसरकारने हे बदल घडवून आणलेत. शेती हा विषय राज्यसरकारांच्या अधीन असूनही केंद्रातील सरकारला त्यांच्याशी सल्ला मसलतीची गरज भासली नाही.
शेतीचे आणि पर्यायाने आपले भवितव्य
सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. सरकारने बनवलेल्या कायद्यांविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या कायद्यांमध्ये ३-४ मुद्दे आहेत. त्यातील काही मुद्द्यांवर कदाचित विवाद/ चर्चा होऊ शकतात, पण एक मुद्दा असा आहे जो कोणत्याही सुज्ञ माणसाला खटकेल: शेतकऱ्यांनी म्हटले आहे की त्यांना किमान आधारभूत किंमत अर्थात किमान हमीभाव मिळावा. सरकार म्हणत आहे, “तो तसा मिळेलच. आम्ही तसं आश्वासन देतो पण ते लेखी स्वरूपात नाही”. आश्वासन देत असताना ते लेखी स्वरूपात का असू नये न कळे. पण त्यावरून त्यांचा आंतरिक हेतू योग्य नसावा असंच सूचित होतं.
बांध आणि हमीभाव
गावापासून दूर जंगलातल्या
वावराच्या धुऱ्यावर
वावरातला बारीक सारीक गोटा
वावर सप्फा करावा म्हणून
वावरातून वजा होत
जमा होत होत जातो
वावराच्याच बांधावर
गोट्यावर गोटा
एक्कावर एक करून
साल दरसाल
मिर्गाच्या तोंडी
ठेवत गेलं की
त्याचाच कंबरीएवढा बनतो बांध
कळत नकळत
गोट्यावर गोटा
रचलेल्या बांधाच्या भरोशावर
आम्ही काहीसे अस्तो बिनधास्त
कारण
थोडी का होईना
त्यामुळं रोखली जाते
जंगली जनावरांची अतिक्रमणं
दरसाल पाण्यासंग
वाहून जाणारी
वावरातील माती
राहते वावरात बांधामुळे टिकून
बांधाच्या या बांधणीमुळे
मोकाट जनावरं करत असलेलं
पिकांचं नुकसान
किमान नावापुरतं तरी
कमी होत असतेच.
आवाहन
‘आजचा सुधारक’चा जानेवारी २०२१ चा अंक शेतीविषयक
(‘आजचा सुधारक’च्या अंकात लेख, निबंध, कविता, कथा, चित्र, व्यंगचित्र सगळ्याचे स्वागत आहे.)
आवाहन:
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन, नवीन कायद्याला होत असलेला विरोध, त्याविषयी उपस्थित झालेले प्रश्न यांवर भूमिका घेण्याविषयी राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष ह्यांच्यात एक प्रकारचा संभ्रमच दिसून येतो आहे.सरकारने बनवलेले कायदे नेमके कोणाच्या फायद्यासाठी आहेत हे जितके (अ)स्पष्ट आहे तितकेच आपल्या हलाखीच्या परिस्थितीवर नेमक्या उपाययोजना कोणत्या ह्याविषयी शेतकर्यांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत.
आज अल्पभूधारक किंवा शेतमजूरी करणारा शेतकरी एका विचित्र कोंडीत अडकला आहे.
मनोगत
‘आजचा सुधारक’च्या माध्यमातून वेगवेगेळे सामाजिक विषय आपण हाताळत असतो. ह्या सर्वांच्या मुळाशी तर्क आणि विवेकवाद असावा अशी ‘सुधारक’ची आग्रही मागणी असते. एप्रिल २०१० मध्ये ‘आजचा सुधारक’चा ‘अंधश्रद्धा विशेषांक’ प्रकाशित झाला होता. आज तब्बल १० वर्षांनी साधारण त्याच अंगाने जाणारा विषय आपण घेतो आहोत, हे खरेतर मरगळलेल्या समाजाचे लक्षण आहे. तरी असे विषय घेतल्यानेच वाद-संवाद घडतात, विचारचक्र सुरू राहते. अंकाचा मूळ विषय जरी नास्तिकेशी जोडलेला असला तरी त्या अनुषंगाने काही इतर आजूबाजूचे विषय आणि काही वेगळ्या बाजूच्या मतांनासुद्धा ह्यात समाविष्ट केले आहे.
नास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता
नास्तिक्य हा काही या लेखाच्या वाचक मंडळीस नवा विषय नसेल याची खात्री आहे. बुद्धिप्रामाण्यवादाच्या निरंतर प्रवासात सापडणारा एक टप्पा म्हणून आपल्याला नास्तिक्य ओळखीचे आहे. माणूस जन्मल्यापासून ते तो स्वतंत्र विचार करू लागेपर्यंत त्याच्यावर जे संस्कार होतात ते बरेचदा तर्कशुद्ध विचारांच्या प्रवाहाने नंतरच्या आयुष्यात धुतले न गेल्याने आपल्याला धार्मिकांची संख्या लक्षणीय दिसत असते. जसजसे तर्कशुद्ध विचारप्रवाह माणसाच्या मनातील कोपऱ्यांना स्पर्श करू लागतात तसतशी ही जळमटे दूर होतात आणि माणूस अधार्मिक, अश्रद्ध आणि मग नास्तिक असा प्रवास करतो. हे घडत असताना सदर बुद्धिप्रामाण्यवादी माणसाला दैनंदिन वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात मात्र नास्तिक नसलेल्या, बुद्धिप्रामाण्यवादी नसलेल्या धर्माचे संमिश्र असलेल्या सांस्कृतिक प्रभावाला आणि काही नैतिक कोड्यांना सामोरे जावे लागते.
‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह
तत्त्वज्ञानाचे धडे गिरवताना संकल्पनांशी बौद्धिक कबड्डी खेळावी लागते. अनेक संकल्पना बुद्धीच्या कचाट्यात आरामात सापडतात. काही संकल्पना मात्र अश्या असतात की त्या काही केल्या सापडत नाहीत. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे, प्रथमदर्शनी अस्तित्वात आहे असे वाटणारी एखादी संकल्पना जवळून ऊहापोह केल्यावर मृगजळाप्रमाणे नाहीशी होऊ शकते. दुसरे म्हणजे, त्या संकल्पनेचे अस्तित्व आपल्याला नाकारता येऊ शकत नाही, पण तिच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकते. म्हणजे एक नव्हे तर अनेक संकल्पना तेथे असू शकतात. अश्या संकल्पना एवढ्या एकसंध नसतील की त्या ‘एक संकल्पना’ म्हणून हातात सापडाव्या, किंवा त्या जरी एकसंध असल्या तरी इतक्या लवचिक असतात की सहजपणे निसटून जाव्यात.
बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन
बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : जगाला प्रभावित करू शकणाऱ्या अलौकिक शक्तीचे, व्यक्तीचे वा वस्तूचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते स्पष्टपणे नाकारणे. परंतु ज्यावेळी आपण ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ठळकपणे उद्धृत करत आहोत त्यावेळी अलौकिक शक्तीसहीत धर्म/पंथ/धम्म/दीन/रिलिजन (religion) अशा धर्माधीष्ठित जीवनपद्धतीसुद्धा नाकारत आहोत आणि म्हणूनच हिंदू-नास्तिक, मुस्लिम-नास्तिक, बौद्ध-नास्तिक, ख्रिश्चन-नास्तिक इत्यादी संभ्रमात टाकणारे शब्द आणि ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ही संज्ञा यातील फरक स्पष्ट करता येईल. धर्माचे अस्तित्व स्वीकारून फक्त ईश्वर नाकारणे हे अपुरे आहे. ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ हे अलौकिक शक्तीपुरते मर्यादित नसून मानवी जीवनातील इतर घटकांनासुद्धा लागू होते अशी पूर्ण आणि स्पष्ट मांडणी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्यात अपेक्षित आहे.
बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग १)
आपण ‘कुणापासून’ तरी निर्माण झालो, आपण आहोत त्याअर्थी आपल्याला आई-वडील आहेत हे सरळ आहे हे गृहीत धरणं जीवउत्पत्तीच्या सध्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर योग्यच आहे. बहुतांश सजीव जन्माला यायला आई-वडील लागतात त्याचप्रमाणे माणूस आणि इतर सजीव पृथ्वीवर यायलादेखील कुणीतरी लागत असणार – अन्यथा आपण कुठून आलो याचं उत्तरच सापडत नाही – हा विचार ‘या सृष्टीचा निर्माता कुणीतरी असणार’ या दृढ झालेल्या धारणेमागे होता/आहे. आपले आई-वडील कोण हे निश्चित करता येतं, त्यांना समोर दाखवता येतं. (अर्थात आई-वडील ही निश्चिती, विशेषतः ‘वडील’ ही निश्चिती, एका टप्प्यावर करता येऊ लागली). सृष्टीनिर्मात्याबाबत हे शक्य नाही. परंतु ती धारणा अत्यंत बळकट झाली असल्याने ‘निर्माता दिसला नाही तरी आहे’ याबाबत बहुसंख्यांच्या मनात संदेह नसतो.
बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग २)
‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ ही या विशेषांकाची मध्यवर्ती कल्पना आहे. ‘बुद्धिप्रामाण्य’ या संज्ञेविषयी पहिल्या लेखात मे. पुं. रेगे यांच्या मांडणीच्या संदर्भाने आपण चर्चा केली. ‘बुद्धिप्रामाण्य’ या शब्दाऐवजी ‘विवेक’ हा शब्द मला अधिक योग्य वाटतो हे मी तिथे मांडलं आहे.
समस्त सृष्टीमध्ये मानव, मानवेतर असंख्य सजीव आणि अर्थातच निर्जीव जग यांचा समावेश होतो. ‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ या विधानाचा अर्थ ‘माणसाने बुद्धिप्रामाण्य स्वीकारणं समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ असा अभिप्रेत आहे. (मानवासह मानवेतर सजीवांनीही बुद्धिप्रामाण्य स्वीकारावं असा एक दुसरा मजेशीर अर्थ या विधानातून निघू शकण्याची शक्यता आहे; पण तो अर्थ अर्थातच गैरलागू आहे.)