करोनाच्या लाटांवर लाटा फुटत आहेत. या साथीने आपल्या आरोग्यव्यवस्थेतल्या अनेक त्रुटी उघड्या पाडल्या आहेत. यातील काही आपल्याला आधीच माहीत होत्या. लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांची कमतरता ही त्यातली एक.
पण ज्या साथीमुळे ही कमतरता ठसठशीत झाली, त्याच साथीदरम्यान, साथीसारख्याच पसरलेल्या तंत्रज्ञानाने, यावर मात करणे शक्य आहे. इंटरनेट आणि आभासी उपस्थितीतील शिक्षण आता अचानक पुढ्यात आले आहे. ह्याचे तोटे आहेत तसे फायदेही आहेत.
आपल्याकडे फॅमिली डॉक्टरांची कमतरता आहे यामागील कारण अर्थातच आर्थिक आहे. एक एमबीबीएस डॉक्टर निर्माण करण्यासाठी प्रचंड पायाभूत सुविधा आणि भरपूर संसाधने लागतात. याला अवाच्यासवा खर्च येतो. तो सरकारला परवडत नाही. यावर