साम्यवादी जगातील घडामोडी : काही निरीक्षणे

रशियात गोर्बाचेव्ह यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू केलेल्या ग्लासनोस्त व पेरिस्रोयको नामक परिवर्तनपर्वाने आता चांगलेच मूळ धरले असून जगात सर्वत्र खळबळ गाजवली आहे. ‘सर्वत्र’ हा शब्द इथे मुद्दामच वापरला आहे कारण त्याचे परिणाम आता साम्यवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून कथित लोकशाही व अलिप्ततावादी या सर्वांना आज नव्याने विचार करण्याची गरज भासू लागली आहे. नुकतीच जेव्हा रशियात साम्यवादी पक्षाच्या सामुदायिक नेतृत्वाची परिसमाप्ती होऊन समावेशक सत्तांचा धारक राष्ट्राध्यक्ष म्हणून गोर्बाचेव्हविरोधकांचे पारडे जड होऊन समजा गोर्बाचेव्ह उद्या सत्ताभ्रष्ट झाले तरी एक गोष्ट वादातीत राहील की त्यांनी केलेली कामगिरी युगप्रवर्तक आहे आणि ते या शतकाचे नायक आहेत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक नवा सुधारक यांस स. न. वि. वि.

पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न घोळत आहे. त्याबाबतीत आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती. आपणांस इष्ट वाटेल तर ह्या प्रश्नांची आपण आपल्या नवीन मासिकातून प्रकट चर्चा करावी. त्यामुळे कदाचित इतर जिज्ञासूंनासुद्धा लाभ होईल. प्रश्न हिन्दू म्हणून माझी कर्तव्ये काय असा आहे.

मी जन्मतः वा परंपरेने हिन्दू आहे. हे हिन्दुत्व मी जसे विधिपूर्वक स्वीकारले नाही तसेच मी त्याचा विधिवत.त्यागही केलेला नाही; तसेच मी केवळ वेदोक्त धर्माचे पालन करणारा स्वामी दयानन्दानुयायी आर्यसमाजीही नाही. त्यामुळे माझ्या मनात जास्त संभ्रम आहे.

पुढे वाचा