एखादी हानिकारक गोष्ट उत्पन्न झाली तरी ती फार वेळ टिकून रहात नाही हे उत्क्रांतीच्या अभ्यासाने आपल्याला दाखवून दिले आहे. मानवी मेंदू हा सध्याच्या स्वरुपात काही लक्ष वर्षे टिकून आहे पण तो अशा अनेक गोष्टी निर्माण करतो ज्या तर्काच्या चाळणीत टिकत नाहीत. तरीही लिखित आणि मौखिक इतिहास असे सांगतो की या क्रिया, सवयी आणि परम्परा हजारो वर्षे अस्तित्वात आहेत. जगभर आहेत. कोणताही मानवी समूह – भाषा , धर्म, भौगोलिक जागा याने इतरांपेक्षा वेगळा पडला असला तरीही – या नियमाला अपवाद नाही.
जी गोष्ट हजारो वर्ष टिकून आहे ती काहीतरी उपयोगाची असावी असाही निसर्गनियम आहे.