तुम्हाला धर्म हवा की नको? ह्या प्रश्नाचे एका शब्दात नेमके उत्तर द्या, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. धर्म की धर्मापलीकडे? हा प्रश्नही काहीसा याच स्वरूपाचा आहे. समाजामध्ये ‘धर्म हवा’ असे म्हणणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात असतो, तर ‘धर्म नको’ असे म्हणून या वर्गाला विरोध करणारा दुसरा एक छोटा वर्गही आढळतो. या दोन वर्गांमध्ये आढळणार्या विरोधाचे स्वरूप समजावून घेण्यासाठी या विरोधाचे ‘शाब्दिक’ अणि ‘वास्तव’ असे दोन प्रकार ध्यानात घेतले पाहिजेत.
शाब्दिक विरोध
शाब्दिक विरोधाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते. ‘धर्म’ या संज्ञेचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे, याविषयी प्रत्येक व्यक्तीच्या धारणा वेगवेगळ्या असतात.