आंध्रमध्ये विजयवाडा या ठिकाणी ‘एथिइस्ट सेंटर’ ही संस्था आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ म्हणून अलिकडेच असा तीन दिवस एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याला आशिया, युरोप आणि अमेरिका या तीन खंडांतून मानवतावादी, निरीश्वरवादी, बुद्धिवादी, बिनसांप्रदायिक, स्वतंत्र विचारांचे पुरस्कर्ते, नास्तिकता समर्थक आणि परिवर्तनवादी चळवळीशी निगडित प्रतिनिधी आले होते. देशातूनही ८०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रा रामचंद्र गोरा आणि त्यांच्या पत्नी सरस्वती गोरा यांनी या वैशिष्टयपूर्ण संस्थेचा ५० वर्षापूर्वी मुदुनुरु या आंध्र प्रदेशामधील कृष्णा जिल्ह्यातील खेड्यात पाया घातला..
विवाह आणि नीती (भाग ९)
मानवी जीवनात प्रेमाचे स्थान
बहुतेक सर्व समाजांची प्रेमविषयक अभिवृत्ती (attitude) दुहेरी राहिली आहे. एका बाजूला प्रेम काव्य, कादंबरी आणि नाटक यांचा प्रमुख विषय आहे; आणि दुसऱ्या बाजूला बहुतेक समाजशास्त्रज्ञांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असते, आणि आर्थिक किंवा सामाजिक सुधारणांच्या योजनांत प्रेमाचा समावेश अभीष्ट उद्देशात केला जात नाही. मला ही अभिवृत्ती समर्थनीय वाटत नाही. प्रेम ही मानवी जीवनातील अति महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे असे मी मानतो, आणि ज्या व्यवस्थेत प्रेमाच्या अनिरुद्ध विकासात विनाकारण अडथळे आणले जातात ती व्यवस्था वाईट असे मी समजतो.
जेव्हा ‘प्रेम’ हा शब्द उचितार्थाने वापरला जातो तेव्हा त्याने स्त्री आणि परुष यांच्यामधील यच्चयावत संबंध निर्दिष्ट होत नाहीत.
विवेकवाद – १०
स्वामी धर्मव्रत यांच्या पत्रास उत्तर
याच अंकात, अन्यत्र, स्वामी धर्मव्रत यांचे पत्र छापले आहे. नवा सुधारकच्या नोव्हेंबर अंकात मी प्रा. श्याम कुलकर्णी यांच्या पत्राला जे उत्तर दिले त्याच्या संदर्भात स्वामी धर्मव्रत यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की मी एक फार मोठी चूक करतो आहे, आणि केवळ मीच नव्हे, तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी आत्मविचाराच्या बाबतीत ती चूक करतात. आमच्या विवेचनात एक प्रचंड घोटाळा आहे. हा घोटाळा काय आहे, आणि आम्ही करीत असलेली चूक कोणती हे समजून घेण्याचा आणि स्वामी धर्मव्रतांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा येथे विचार आहे.
पुस्तक परिचय
हिंदू संस्कृती आणि स्त्री
ले. आ. ह. साळुखे (प्रकाशक: स्त्री उवाच, मुंबई, १९८९ मूल्य रु.३५)
‘स्त्री उवाच ने अलीकडे प्रकाशित केलेले (९ डिसेंबर १९८९) डॉ. आ. ह. साळुखे यांचे हिंदू संस्कृती आणि स्त्री हे पुस्तक वाचनात आले. यात लेखकाने हिंदू संस्कृतीचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोण किती अन्याय्य होता ह्याचे अतिशय संतुलितपणे, कोणताही अभिनिवेश न बाळगता, अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन जवळ जवळ तेवीस ग्रंथांच्या साह्याने केलेले आहे. त्या ग्रंथांची सूची पुस्तकाच्या सुरुवातीला दिली आहे. त्यात मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती इत्यादि स्मृतींबरोबरच इतरही धर्मग्रंथांचा समावेश आहे.
हे विवेचन करीत असतांना डॉ.
पत्रव्यवहार
संपादक, नवा सुधारक’ यांस,
नोव्हेंबरच्या अंकातील औरंगाबादचे प्रा. श्याम कुलकर्णी यांचं पत्र आणि त्या पत्राला तुम्ही दिलेलं ‘काहीसं सविस्तर उत्तर दोन्ही वाचली. ती वाचल्यानंतर न तथा आंदोलिकादंडः यथा ‘बाधति बाधते अशी माझी अवस्था झाली. मी काही कुणी प्रोफेसर नाही. विज्ञानाचाही नाही किंवा तुमच्या त्या तत्त्वज्ञानाचाही नाही. पण तरीसुद्धा माझ्या अल्पमतीला असं वाटतं की तुम्ही एक फार मोठी चूक करीत आहात. आणि कदाचित तुम्ही एकटेच नव्हे तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी ही चूक करीत असावेत. आणि म्हणून हे पत्र लिहीत आहे. कृपया याला उत्तर द्यावं अशी विनंती आहे.
तर्काची मुस्कटदाबी करून भागावयाचे नाही!
तर्कापलीकडील जे पारलौकिकादि विषय आपल्या इकडे मानले आहेत, त्यांसंबंधीदेखील माझे तरी असे मत आहे की तर्काशिवाय दुसरे एखादे ज्ञानसाधन – वेद, श्रद्धा, सहृदयत्व, intuition, योगमार्गातील समाधी वगैरे वगैरेंपैकी एखादे ज्ञानसाधन – असले तर ते मानावे, पण एवढे लक्षात ठेवावे की या साधनाने होणारे ज्ञान आणि तर्काने होणारे ज्ञान यांची एकवाक्यता केल्याशिवाय ते ज्ञान खरे व टिकाऊ समाधान देऊ शकणार नाही. दुसरे असे की जोपर्यंत अशी एकवाक्यता झालेली नाही तोपर्यंत तर्काची मुस्कटदाबी करून भागावयाचे नाही.
ह्या विशेषांकाविषयी
नवा सुधारकाचा हा वा.म. जोशी विशेषांक वाचकांच्या हाती देताना आमची मनोवस्था काही संमिश्र अशी झाली आहे. जुलै ९० च्या अंकात आम्ही हा अंक काढणार असल्याचे जाहीर केले तेव्हा विशेषांक प्रकाशित करणे किती दुरापास्त असते याची आम्हाला कल्पना होती. साहित्य वेळेवर मिळणे कठीण असते, हे एक तर खरेच; पण त्याचा आम्हाला फारसा प्रतिकूल अनुभव आला नाही. ज्यांनी लेख देण्याचे मान्य केले त्यांनी बहुतेकांनी वेळेवर लेख पाठविले. पण त्यात दुसरी एक अडचण आली. जुलै अंकात या संकल्पित अंकास कल्पना देताना आम्ही असे म्हणालो होतो की वा.
वामन मल्हारांची सत्यमीमांसा
वा.म. जोशी हे मानवी जीवनाचे एक थोर भाष्यकार म्हणून ओळखले जातात. त्यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटीस’ म्हणण्याचा प्रघात आहे. सॉक्रेटीसप्रमाणेच जीवनाचा अर्थ, त्याचे प्रयोजन आणि साफल्य शोधणे या गोष्टींभोवती त्यांचे तत्त्वचिंतन घोटाळत राहाते. सॉक्रेटिसाच्या संवादांचे भाषांतर ही त्यांची पहिली वाङ्यकृती असावी ही गोष्ट पुरेशी सूचक आहे. जीवनाचे मार्गदर्शक तत्त्वज्ञान म्हणून त्यांनी ‘सत्य, सौजन्य आणि सौंदर्य’ या त्रयीचा निरंतर पुरस्कार केलेला आहे. या तत्त्वत्रयीतील ‘सत्य’ ह्या संकल्पनेचा वामनरावांनी केलेला विचार प्रस्तुत निबंधाचा चर्चाविषय आहे.
वा.मं. च्या नीतिशास्त्र-प्रवेश या बृहद्रंथात दहा परिशिष्टे जोडली आहेत. त्यांतील ‘सत्य हे साधन की साध्य?’
वामन मल्हार जोशी
वामन मल्हारांचा जन्म २१ जानेवारी १८८२ रोजी झाला, आणि सुमारे ६१ वर्षाचे कृतार्थ जीवन जगून २० जुलै १९४३ या दिवशी मुंबईला त्यांचा अंत झाला. या घटनेलाही जवळ जवळ अर्धशतक लोटले आहे. वामनरावांची साहित्यातील कामगिरी तशी मोलाचीच. परंतु तत्त्वचिकित्सा – विशेषतः नैतिक तत्त्वज्ञान आणि एकूणच चौफेर तत्त्वविवेचन करणारे ते मराठीतले पहिले आधुनिक लेखक आहेत असे म्हणता येईल. त्यांच्या जीवनाचा पुढील संक्षिप्त आलेख नव्या पिढीतील सामान्य वाचकांना उपयुक्त होईल असे वाटते.
वामन मल्हार तत्त्वज्ञान हा विषय घेऊन १९०६ साली एम.ए. झाले. १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनाला ते गेले असता त्यांची प्रोफेसर विजापूरकरांशी गाठ पडली.
वा.म. जोशी यांची वाङ्मयविषयक भूमिका
वामन मल्हार जोशी यांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी प्रस्तुत लेखात केलेली नाही. त्यांच्या वाड्मयविचाराची अशा प्रकारची मांडणी व चिकित्सा वा.ल. कुळकर्णी व अन्य काही ज्येष्ठ समीक्षकांनी यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळेच वामन मल्हारांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी करण्यापेक्षा त्यांचा वाड्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण कोणता आहे, म्हणजेच त्यांची वाड़मयविषयक भूमिका कोणती आहे, ती कोणत्या तत्त्वांवर, सूत्रांवर आधारलेली आहे. तिची वैशिष्टये कोणती आहेत, याची चर्चा -चिकित्सा प्रस्तुत लेखात केली आहे.
वामन मल्हारांनी फार मोठ्या प्रमाणात वाङ्मयविषयक लेखन केले आहे असे दिसत नाही. ‘विचारसौंदर्य’ हा वाङ्मयविषयक लेखसंग्रह व अन्य काही ग्रंथनिविष्ट वा असंगृहीत वाङ्मयविषयक लेख वा परीक्षणे हे त्यांचे या प्रकारचे लेखन आहे.