संत आणि चातुर्वण्र्य

चातुर्वण्याविरुद्ध आजवर अनेक बंडे झाली. त्यांत महाराष्ट्रातील भागवतधर्मी साधुसंतांचे बंड़ प्रमुख होय. पण या बंडातील लढा अगदी निराळा होता. मानवी ब्राह्मण श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ असा तो लढा होता. ब्राह्मण मानव श्रेष्ठ की शुद्र मानव श्रेष्ठ हा प्रश्न सोडविण्याच्या भरीस साधुसंत पडले नाहीत. या बंडात साधुसंतांचा जय झाला व भक्तांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावे लागले. तरीसुद्धा या बंडाचा चातुर्वण्र्यविध्वंसनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. असे म्हणता येईल की तुमचे चातुर्वण्र्य तुम्ही ठेवा, आम्ही भक्त होऊ व तुमच्यातील श्रेष्ठ गणल्या गेलेल्या ब्राह्मणांना लाजवू, अशी अहंमान्यता धरून संतांनी चातुर्वण्र्याला मुळीच धक्का लावला नाही.

पुढे वाचा

समतावाद्यांचे ध्येय

समतावाद्यांचे ध्येय सर्वांना समतेने वागविणे हे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे. हे ध्येय साधताना सर्वाना समतेने वागवून चालणे शक्य नाही. जेथे सर्व व्यक्ती समान आहेत तेथे काही लोकांना असमानतेने वागविल्यास विषमता उत्पन्न होईल. पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारख्या लेखून चालणे म्हणजे समताप्रस्थापनाच्या ध्येयाला विरोध करणे होय. ह्या बाबतीत रोगी माणसाचे उदाहरण बरोबर लागू पडते. सुदृढ माणसाला जोडेभरडे अन्न चालते. पण सुदृढ माणूस व रोगी माणूस हे दोघेही सारखे मानून जर एखादा वेडगळ समतावादी’ ते जाडेभरडे अन्न रोग्याला देईल तर तो रोग्याचा प्राणदाता होण्याऐवजी प्राणहर्ता होईल.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षता: काही प्रश्न

मार्च १९९१ च्या ‘आजचा सुधारक’च्या संपादकीयात जाहीर केल्याप्रमाणे त्यात उल्लेखिलेल्या दोन विषयापैकी धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) ह्या विषयावरील परिसंवादाची रुपरेषा दाखवणारी प्रश्नावली खाली देत आहोत. तिच्यावरुन विषयाच्या अपेक्षित व्याप्तीची कल्पना येइल. ही प्रश्नावली आमचे मित्र डॉ. भा. ल. भोळे व श्री. वसन्त पळशीकर यांनी ‘आजचा सुधारक’साठी तयार केली आहे. त्याचे आम्ही आभारी आहोत. पुढील अंकामध्ये ‘मार्क्सवादाचे भवितव्य’ ह्या विषयावरील परिसंवादाची अपेक्षित व्याप्ती दाखविणारी प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात येईल. ह्या विषयांवरील चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही काही विचारवंताना मुद्दाम आमंत्रित करीत आहोत. त्यांचे लेख वेळोवेळी प्रसिद्ध होतीलच.

पुढे वाचा

विवेकवादाच्या मर्यादा

[गेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रा. मेघश्याम पुंडलीक रेगे यांनी नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयात ‘भारतीयांचा पुरुषार्थविचार’ व ‘विवेकवादाच्या मर्यादा’ या दोन विषयांवर दोन व्याख्याने दिली. प्रा. रेगे यांची गणना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखिल भारतीय अग्रगण्य विद्वानांत केली जाते ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांचा पाश्चात्य आणि भारतीय दोन्ही तत्त्वज्ञानाचा व्यासंग अतिशय विस्तृत आणि सखोल असून व्याख्यानांच्या विषयांवरील त्याचा अधिकार निर्विवाद आहे. त्यांनी केलेले विवेकवाद आणि त्याच्या मर्यादा यांचे विवेचन ‘आजचा सुधारक’च्या वाचकांना उद्बोधक वाटेल, म्हणून ते व्याख्यान येथे उद्धृत करीत आहोत.
-संपादक]

रॅशनॅलिझमचे (rationalism) ‘विवेकवाद’ हे भाषांतर आहे अशी कल्पना मी करतो.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ११)

वेश्यावृत्ती जोपर्यंत प्रतिष्ठित स्त्रियांचे पातिव्रत्य ही गोष्ट महत्त्वाची मानली जाते तोपर्यंत विवाहसंस्थेला आणखी एका पूरक संस्थेची जोड द्यावी लागते, किंबहुना ही पूरक संस्था विवाहसंस्थेचाच भाग मानावा लागेल. मला अभिप्रेत असलेली संस्था म्हणजे वेश्यासंस्था होय. लेकी ज्या परिच्छेदात वेश्यावृत्ती गृहाच्या पावित्र्याची आणि पत्न्या आणि कन्या यांच्या शुचितेची रक्षक आहे असे म्हणतो तो प्रसिद्ध आहे. त्यात व्यक्त झालेली भावना व्हिक्टोरियाकालीन आहे, आणि तिच्या अभिव्यक्तीची तन्हा जुन्या वळणाची आहे; पण त्यात वणलेली वस्तुस्थिती मात्र नाकारण्यासारखी नाही. नीतिमार्तडांनी लेकीचा धिक्कार केला आहे. कारण त्यांना त्याचा भयानक संताप आला, पण का ते त्यांना सांगता येत नव्हते; आणि त्याचे म्हणणे खोटे आहे हे ते दाखवू शकले नाहीत.

पुढे वाचा

मुक्त मानवाची पूजा

[‘A Free Man’s Worship’ हा बरट्रॅंड रसेलच्या अत्युत्प्ट लिखागांपैकी एक निबंध. तो त्याने १९०२ साली म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिला. हा निबंध म्हणजे एक तसदर काव्य हे झार तसेच ते विश्वाचे आणि मानव जीवनाचे अतिशय मार्मिक दर्शनही आहे. हे विश्व निर्हेतुक आहे, निष्प्रयोजन आहे, त्यात मानवाची उत्पत्तीही तशीच अर्थहीन, प्रयोजनहीन आहे, हे विश्व मानवाच्या झाकांक्षाविषयी पूर्णपणे उदासीन आहे – या विज्ञानाच्या निर्णयाच्या संदर्भात मानवाने आपल्या ध्येयांची आदराची उपासना कशी करावी या प्रश्नाला रसेलने दिलेले हे उत्तर, साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवलेल्या एका भाषाप्रभूच्या राज्याचा अनुवाद करणे महाकठीण काम आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
स, न. वि. वि.
फेब्रुवारी १९९१ च्या अंकात आपण वसंत कानेटकरांचे पत्र छापले आहे. पुण्यात झालेल्या स्त्रीवादी समीक्षेवरील परिसंवादाचे वेळी घडलेल्या एका घटनेचा त्यात उल्लेख आहे. त्या परिसंवादात मी सहभागी होतो. ‘परमिसिव सोसायटी’ची भलावण केल्याबद्दल प्रा. के. ज. पुरोहित यांचा निषेध परिसंवादात सहभागी झालेल्या काही स्त्री-पुरुषांनी केला ही वस्तुस्थिती नाही. घडले ते असेः
पश्चिमी देशांमध्ये आढळणाच्या सापेक्षतः पुष्कळच दिल्या स्त्रीपुरुष लैंगिक संबंधाविषयी बोलत असताना ‘मला स्वतःला नाना बायकांचा उपभोग घ्यायला आवडेलच, पण आता माझे वय असा उपभोग घेण्याच्या दृष्टीने राहिले नाही याची खंत वाटते’ अशा आशयाचे उद्गार सत्राच्या चर्चेला अध्यक्षीय समारोप करताना प्रा.

पुढे वाचा

आगरकरांचे अग्रेसरत्व

गोपाळ गणेश आगरकर हे कर्ते सुधारक होतेच. पण त्यांनी संतति-नियमनाचा पुरस्कार केला होता हे किती जणांना माहिती आहे? ‘केसरी’ च्या १८८२ च्या १५. व्या अंकात आगरकरांनी ‘स्त्रीदास्य-विमोचन’ हा लेख लिहिला होता. त्यावर त्यांचे नाव नसले तरी त्या लेखातील विचारसरणी आणि लेखनशैली यावरून तो लेख आगरकरांचाच आहे याविषयी शंका राहात नाही. त्या लेखात प्रारंभीच त्यांनी, नवे विचार आले की नवे शब्द बनवावे लागतात, असे सांगून स्त्रीदास्य-विमोचन’ हा शब्द आपण बनवीत आहो, असे सांगितले आहे. यावरून ‘स्त्रीदास्य-विमोचन ‘ हा शब्द प्रथम आगरकरांनी प्रचारात आणला हे दिसून येते.

पुढे वाचा

संपादकीय मागे वळून पाहताना

‘नवा सुधारका’चा पहिल्या वर्षाचा हा शेवटचा अंक. आज नवा ‘आजचा सुधारक’ एक वर्षाचा झाला. त्याची एक वर्षातील वाटचाल कशी झाली याकडे मागे वळून पाहणे उपयुक्त होईल असे वाटल्यावरून त्यांकडे टाकलेला हा दृष्टिक्षेप.

चोहोबाजूंनी होणाऱ्या अंधश्रद्धा, शब्दप्रामाण्य आणि बुवाबाजी यांच्या आक्रमणापुढे हतबल झालेल्या आपल्या समाजाला जागे करण्याकरिता, आणि त्याला योग्य मार्ग दाखविण्याकरिता आगरकरांनी सुरू केलेले कार्य त्यांच्या अकाली निधनाने अपुरेच राहिले. ते यथाशक्ति पुढे चालविण्याकरिता विवेकवादाचे कंकण बांधलेले हे मासिकपत्र आम्ही काढले आणि गेले सबंध वर्ष ते काम पार पाडण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय, चार्वाकदर्शन

द्वितीयावृत्तीत ( १९८७ ) पदार्पण केलेले ‘चार्वाकदर्शन’ हे डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे उपलब्ध ग्रंथांच्या मदतीने चार्वाकमताचे विवेचन करण्याचा प्रयत्न होय. चार्वाकदर्शन हे एक नास्तिक दर्शन, वैदिक परंपरेची चाकोरी सोडून अनुभव व त्यावर आधारलेली विचारप्रणाली निर्भीडपणे मांडणारे. त्यामुळे इतर दर्शनांच्या तुलनेत त्याचे वेगळेपण जाणवते. दुर्दैवाने भारतात या दर्शनाची सदैव उपेक्षाच झाली. जडवादाचा पुरस्कार करणारे हे दर्शन खऱ्या अर्थाने ‘दर्शन’ (तत्त्वज्ञान) नाहीच, हे दर्शन लिहिणाऱ्या व्यक्ती व त्यांचे अनुयायी अगदीच यथातथा बौद्धिक कुवत असलेल्या व्यक्ती असून हे अत्यंत हास्यास्पद असे दर्शन आहे, अशी याच्याविषयीची अन्य दार्शनिकांची व विद्वानांची भूमिका आहे.

पुढे वाचा