६ डिसेंबर १९९२ ला धर्माच्या नावाखाली उसळलेल्या जातीय दंगली व हिंसाचारामुळे, स्त्री-संघटनांनी समान नागरी कायद्याच्या मागणीचा प्रश्न पुन्हा एकदा जोराने धसास लावण्याचा निर्णय ८ मार्चच्या निमित्ताने घेतला आहे. धार्मिक शक्तींनी सामाजिक जीवनावर जर वर्चस्व गाजवले तर त्याचा पहिला बळी ठरणार आहेत स्त्रिया! आणि म्हणूनच धर्माचे समाजातील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने समान नागरी कायद्याच्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा करणे सद्यःपरिस्थितीत महत्त्वाचे ठरते. वास्तविक समान नागरी कायद्याचा प्रश्न आज काही प्रथम चर्चेला आलेला नाही. परंतु तरीही समान नागरी कायदा म्हणजे काय? तो आणणे का जरुरीचे आहे?
पत्रव्यवहार
श्री. संपादक, आजचा सुधारक, यांना स.न. वि मुस्लिम समाजाचे मन वळवण्यासाठी म. गांधींनी अनुसरलेला मार्गच आजही आवश्यक आहे अशी श्री. पळशीकरांची श्रद्धा आहे. ऑगस्ट १९९३ अंक, पृष्ठ १३७ वर त्यांनी काहीशा डौलाने प्रश्न विचारला आहे की, “सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळवण्याचे कोणते प्रयत्न झाले, त्या प्रयत्नांना अपयश का आले, व अपयशाची जबाबदारी सर्वस्वी मुस्लिम समाजावर कशी ?” या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी देत नाही, पण एक अवतरण देतो. नोव्हेंबर – डिसेंबर १९९२ अंक, पृष्ठ २६९, शेवटचा परिच्छेद यात श्री.
पत्रव्यवहार
श्री. प्र. ब. कुळकर्णी यांसी
स.न.वि.वि.
ऑगस्ट १९९३ (आजचा सुधारक) च्या अंकात ‘रक्तपहाट’ ह्या पुस्तकावरील आपले परीक्षण वाचले. ह्यांतील काही उद्धरणे खालीलप्रमाणे आहेत:
तळवलकर म्हणतात, ‘पं. नेहरू वेगळ्या त-हेने (रीतीने) तत्त्वभ्रान्त होते. धर्माच्या प्रेरणेचा प्रभाव पाकिस्तान अव्यवहार्य ठरविण्यासाठी विचारात घेतला नाही. लोकसंख्येची पद्धतशीर अदलाबदल झाली असती तर जिनांना आणखी चार कोटी मुसलमानांचा भार सहन करावा लागला असता. पण नेहरूंनी विरोध का करावा ? त्यांचा पाकिस्तानच्या संबंधातला तत्त्वभ्रान्तपणा या रीतीने पुन्हा एकदा प्रकट झाला. तात्पर्य राजकारण्यांच्या सत्तालोभाने आणि वार्धक्यातील टुबळेपणाने त्यांनी जो उतावळेपणा केला तो केला नसता तर हिंदुमुसलमान प्रजेची प्राणहानि टळली असती.’
पुस्तक-परिचय
मृत्यूनंतर
लेखक: शिवराम कारंत. अनुवादक: केशव महागावकर, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. चौथी आवृत्ती, मूल्य ११.५०
मृत्यूनंतर काय, ही महाजिज्ञासा आहे, नचिकेत्याची होती. माझीही आहे. तुमचीही असावी. मी तिच्यापोटी थोडेबहुत तत्त्वज्ञान पढलो. पण तत्त्वज्ञान हे बरेचसे पांडित्यपूर्ण अज्ञान आहे अशीच माझी समजूत झाली. निदान या असल्या महाप्रश्नांपुरती तरी. शाळकरी वयात वाटे-आपण संस्कृत शिकू, वेद-उपनिपदे वाचू. यम-नचिकेता संवाद मुळातून वाचू. थोडेसे संस्कृत शिकलो. भाष्यकारातें वाट पुसत ठेचाळण्याइतके. पण दुसरे एक अनर्थकारक ज्ञान झाले.ते असे की, शब्द आणि शब्दार्थ, वाक्ये आणि वाक्यार्थ सर्वांसाठी सारखेच नसतात.
शास्त्रीयतेची प्रतिष्ठा फलज्योतिषाला मिळणे अशक्य आहे
सुधारकच्या वाचकवर्गापैकी कुणीही फलज्योतिपावर विश्वास ठेवणारे असतील असे मला वाटत नाही. माझ्या या लेखाचा हेतू कुणाचा भ्रमनिरास करण्याचा नाही. माझा हेतू असा आहे की फलज्योतिषात ज्या अंगभूत (built-in) अंतर्विसंगती आहेत त्यांची ओळख वाचकांना व्हावी.
फलज्योतिपावर आमचा विश्वास नाही ‘ असे म्हणणाऱ्यांना जर असा प्रश्न विचारला की, तुमचा विश्वास का नाही त्याची कारणे सांगाल का, तर अनेक प्रकारची उत्तरे ऐकायला मिळतील. त्यातली कित्येक उत्तरे गैरलागू असतात, कित्येक उत्तरे उथळ असतात, आणि काही तर अगदी चुकीची असतात. फलज्योतिषावरची लोकांची अंधश्रद्धा दूर व्हावी या हेतूने केलेल्या प्रचारात जर असे सदोप युक्तिवाद केलेले असले तर त्या प्रचाराचा परिणाम उलटाच होतो.
धारणाद्धर्म इत्याहुः।
आजचा सुधारक च्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात उपरोक्त विषयावरील माझ्या आधीच्या लेखांवर टीका करणारा श्री वसंत पळशीकर यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी आधीच्या सर्व अंकांतील तत्संबंधीचे सर्व लेख सलगपणे वाचून काढले; परंतु त्यांत त्यांना आक्षेप घेण्यासारखे बहुधा काही न आढळल्यामुळे वेगळ्या दिशेने मुद्दयाला भिडायला हवे असे त्यांनी ठरवून हा लेख लिहिलेला दिसतो.
. त्यांचा लेख वाचल्यानंतर मला असे दिसून आले की धर्मविषयक माझ्या प्रतिपादनाला त्यांची हरकत नाही; परंतु त्याबद्दलच्या तपशिलाचा आग्रह धरून ‘तत्त्व मान्य, तपशील अमान्य’ अशी व्यूहरचना करून माझ्या प्रतिपादनाला उखडून लावावयाचा प्रयत्न करावयाचा, असे हे त्यांचे वेगळ्या दिशेने मुद्दयाला भिडणे होय.
धर्म व राजकारण: फारकतीचे उद्दिष्ट स्पष्ट हवे
धर्म आणि राजकारण यांची फारकत झाली पाहिजे, असे आपण गेली ४०-४५ वर्षे बोलत आलो आहोत. तरीही अशी फारकत आपण करू शकलेलो नाही. लोकसभेत नुकत्याच मांडण्यात आलेल्या विधेयकाने एका अर्थी आपण हीच वस्तुस्थिती मान्य केली आहे. या विधेयकाच्या निमित्ताने या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली असली, तरी धार्मिक वृत्ती-प्रवृत्तींशी तडजोडी आणि मतांचे राजकारण करण्याची धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांची व त्यांच्या नेत्यांची जुनी परंपरा अजूनही अस्तित्वात आहे. त्याबरोबरच धर्माधिष्ठित समाजव्यवस्थेचे समर्थन करण्याची तथाकथित पुरोगामी विचारवंतांची प्रवृत्तीही अजून शाबूत असल्यामुळे, धर्म आणि राजकारण यांच्या फारकतीचा घोळ संपेल, असे वाटत नाही.
तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ७)
निगामी व्यवस्था (Deductive Systems)
इ.स. पूर्वी चौथ्या शतकात यूक्लिड या ग्रीक गणितज्ञाने भूमितीची मांडणी निगामी व्यवस्थेच्या रूपात केल्यापासून शास्त्रीय ज्ञानाच्या जगतात निगामी व्यवस्था हा ज्ञानाचा आदर्श मानला गेला आहे आणि तेव्हापासून तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक दोघांचीही आपल्या विषयाची मांडणी निगामी व्यवस्थेत करण्याची धडपड सुरू आहे. Deduction किंवा निगमन म्हणजे काय हे आपण स्थूलरूपाने पाहिले आहे. निगामी अनुमान म्हणजे असे अनुमान की ज्याची साधके (म्हणजे साधक विधाने किंवा premises) सत्य असल्यास त्याचा निष्कर्प असत्य असू शकत नाही. निगमन हा सत्यतासंरक्षक अनुमानप्रकार आहे; म्हणजे त्यात साधकांची सत्यता निष्कर्षापर्यंत सुरक्षितपणे पोचविली जाते.
श्रुति-प्रामाण्य
श्रुति-प्रामाण्य
आपले पूर्वज अशा काही ऋषिमुनींनी जीव आणि जगताच्या बाबतीत–’हे कसे ? हेच सत्य, हीच चरमवाणी’ असे लिहून ठेवले आहे. यांना तुम्ही वाटल्यास वेद उपनिषद म्हणा, अथवा तपश्चर्येने समजून घेतलेल्या गोष्टी म्हणा किंवा देवांनीच हे सर्व कानात सांगितले असे म्हणा; मला मात्र एक संशय आहे. हे विश्व, ही चराचर सृष्टी यांच्याबाबतीत अल्पस्वरूप वाचनाने मी काही ज्ञान मिळविले आहे. जीवनाने या यात्रेला केव्हा आरंभ केला, ही जीवनयात्रा कुठे चालली आहे, प्रवासाला आरंभ केल्यावर बऱ्याच काळपर्यंत वाटेतील स्टेशनावर गाडीत चढणाऱ्या उतारूप्रमाणे माणूस नावाचा प्राणी आत प्रवेश करून काही वेळ बसून उतरूनही जातो, पण जीवनाचा प्रवास तर अजून पुढेच जात असतो.
पडद्यातला देश
गावी शेजारच्या देवकरण भटजींना ज्योतिष चांगले समजत असे. एकदा माझा हात पाहून ते म्हणाले, ‘याला विद्या नाही. हे भविष्य ऐकून माझी माय कष्टी झाली. पण ते भविष्य तिच्या अंदाजाबाहेर मी खोटे ठरविले. दुसरे, शेंदुर्णीकरांचे भविष्य : ‘तुम्हाला वाहनयोग (चारचाकी) आहे.’ तेही मी आतापर्यंत तरी खोटे ठरवले आहे. परदेशप्रवास घडेल असे मात्र माझ्या हातावर कोणालाच दिसले नव्हते. तो घडला. आणि मुळातील भविष्यावर माझा अविश्वास अधिक पक्का झाला.
मात्र परदेशप्रवासातही एक प्रकारची वर्णव्यवस्था आहे. युरप-अमेरिका अव्वल दर्जाचे, दुबई-आफ्रिका त्या मानाने दुय्यम, सिंगापूर-हाँगकाँग यांना शूद्र म्हटले तर नेपाळ अतिशूद्रात गणले जाईल.