बाक्र्लीचा आयडियलिझम
गेल्या लेखांकात आपण idea’ या शब्दाचे दोन अगदी भिन्न आणि स्वतंत्र अर्थ पाहिले. आधुनिक भाषाशास्त्रज्ञांच्या मताने idea’ हा शब्द एक नसून दोन आहेत. एक, प्लेटोचा ‘आकार’ या अर्थाचा ग्रीक शब्द, आणि दुसरा, अर्वाचीन तत्त्वज्ञानात रूढ असलेला ‘कल्पना या अर्थाचा इंग्लिश शब्द. त्यामुळे idealism’ या शब्दालाही दोन अगदी भिन्न आणि स्वतंत्र अर्थ आहेत. एक, प्लेटोच्या idea’पासून आलेला आदर्शवाद किंवा ध्येयवाद, आणि दुसरा इंग्लिश idea’ पासून आलेला कल्पनावाद. बार्लीला हा दुसरा idealism अभिप्रेत होता. या मतानुसार विश्वात फक्त दोनच प्रकारचे पदार्थ आहेत, आत्मे किंवा मने आणि त्यांच्या कल्पना.