फेब्रुवारी ९४च्या दि. १९ व २० या दोन दिवशी सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीने आयोजित केलेले पहिले विचारवेध संमेलन भरले होते. विषय होता ‘धर्म’ आणि संमेलनाचे अध्यक्ष होते प्रा. मे. पुं. रेगे. आपल्या प्रदीर्घ छापील अध्यक्षीय भाषणात प्रा. रेग्यांनी ज्याला ते ‘अतीत’ हे नाव देतात त्यावर एक अतिशय प्रभावी निबंधसादर केला. प्रा. रेग्यांचा तत्त्वज्ञानाचा व्यासंग आणि त्यावरील अधिकार हे दोन्ही अव्वल दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांनी धर्माच्या वतीने दिलेल्या समर्थनाला मोठी प्रतिष्ठा आहे. त्याविषयी मतभेद नोंदवणे ही धाडसाची गोष्ट आहे.
परंतु तरीही मला वाटते की त्यांनी केलेले अतीताचे समर्थन निर्णायक नाही, आणि हे दाखविण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा
सातार्याच्या विचारवेध संमेलनात प्रा. रेग्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातील काही भागाचा हा सारांश. रेग्यांच्या अतीतवादी धर्म आणि नीतीमीमांसेचा प्रतिवाद याच अंकात प्रा. दि. य. देशपांड्यांनी केला आहे. तो वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून हा आढावा उपयोगी पडावा.
विसाव्या शतकातील धर्मचिंतनाकडे वळण्यापूर्वी रेग्यांनी त्याची प्रदीर्घ तत्त्वज्ञानात्मक पार्श्वभूमी कथन केली आहे. तिचा आलेख येथे आहे. पण व्याख्यानाच्या उत्तरार्धातील भारतीय-हिंदू विचाराचा ऊहापोह या सारांशात नाही. तद्वत विसाव्या शतकातील तीन प्रभावी विचारसरणी – मार्क्सवादी, मनोविश्लेषणवादी आणि अस्तित्ववादी – व धर्म यांच्या संबंधाची चर्चाही येथे गाळली आहे.
धार्मिक अनुभव व आचरण यांचा गाभा
इंद्रियांना प्रतीत होणार्या जगापलीकडे अतीत तत्त्व आहे.
बँकॉक परिषदेत जाणवलेले स्त्री-प्रश्नांचे भेदक वास्तव
पुढील लेख लोकसत्ता दैनिकाच्या २७ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे तो आमच्या वाचकांनी आधीच वाचला असेल. तरीसुद्धी आम्ही तो पुनर्मुद्रित करीत आहोत याचे कारण त्या विषयाचे गांभीर्य. स्त्रीपुरुषसमतेच्या आदर्शापासून आपण अजून इतके दूर आहोत कीती जगातील बहुतेक देशात ती औषधालासुद्धा सापडत नाही. या गंभीर विषयाकडे वाचकांचे लक्ष आकृष्ट होऊन त्यांना त्याविषयी काहीतरी करणे अत्यावश्यक आहे याची जाणीव व्हावी हा या पुनर्मुद्रणाचा हेतू. – संपादक
स्थळ : बँकॉक
अफगाणिस्तानमधील दोन स्त्रियांचे मृतदेह समोरच्या व्हिडिओ फिल्मवर दिसत होते. ते पाहून सार्या स्तंभित झाल्या.
कोणती वैवाहिक नीती अधिक चांगली
कोणत्याही देशांतील बहुसंख्य लोकांची अशी पक्की खात्री असते की आपल्या देशातील विवाहसंस्था सोडून अन्य सर्व विवाहसंस्था अनैतिक आहेत, आणि जे लोक असे मानीत नाहीत त्यांना आपल्या स्वैर जीवनाचे समर्थन करावयाचे असते असे ते समजतात. भारतात विधवांचा पुनर्विवाह ही गोष्ट परंपरेने अत्यंत भयंकर मानली गेली आहे. कॅथलिक देशात घटस्फोट पाप मानला जातो, पण वैवाहिक दुर्वर्तन, निदान पुरुपांचे, काही प्रमाणात क्षम्य मानले जाते. अमेरिकेत घटस्फोट सुलभ आहे, पण विवाहबाह्य संबंध फार मोठा दोष मानतात. मुसलमानांना बहुपत्नीकत्व संमत आहे, पण आपण ते निंद्य समजतो.
पत्रव्यवहार
– १ –
स.न.वि. वि.
सीतारामपंत देवधर यांचे ‘माझा जीवनवृत्तांत’ (१९२७) हे आत्मचरित्र वाचण्यात आले. ते आगरकरांचे सुधारक चालविण्यात प्रथमपासूनचे सहकारीआगरकरांच्या निधनानंतरही दीर्घकाल त्यासाठी धडपडणारे. त्या पुस्तकातील पृ. १०५ ते १६७ हा भाग आपल्या पाहण्यात आला नसल्यास आपल्याला कुतूहलाचा वाटेल. या मजकुरातील खूपच भाग ‘आद्य सुधारक या शीर्षकाखाली आपल्याला प्रसिद्धही करता येईल असे वाटते.
वाचताना काही निर्देश आढळले.
(१) सुधारकाचे सर्व अंक उपलब्ध नाहीत (पृ. १५५).
(२) १४ ऑक्टोबर १८९५ चा सुधारकचा अंक. न्या. रानड्यांनी याच्या दहा हजार प्रती काढून वाटल्या होत्या.
सातार्याचे विचारवेध संमेलन
साताऱ्याला जायची फार दिवसांची इच्छा होती. परवा अचानक योग आला. ‘विचार करू शकणाच्या माणसांची मतं बनविण्याची प्रक्रिया निर्दोष व्हावी, यासाठी सातार्याला चार मित्रांनी एक धडपड सुरू केली आहे. समाजपरिवर्तनाचे काम ‘यद्यपि शुद्धं लोकविरुद्धम्’ या कोटीचे असते. या मित्रांनी त्या कामासाठी एक मंडळ स्थापन केले. त्याला ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी’ असे नाव दिले. विसाव्या शतकातील वैचारिक घडामोडींचा वेध अकादमीने घ्यायचे ठरवले. त्यातून हे विचारवेध संमेलन आकाराला आले. विषयधर्मजिज्ञासा. या शतकात आपल्या देशात धर्माच्या नावावर मोठमोठे उत्पात घडले. देश दुभंगला. लक्षावधींचे प्राण, वित्त आणि अब्रू लुटली गेली.
नवीन आर्थिक धोरणाच्या संदर्भात कर्मचारी संघटनांकडे दृष्टिक्षेप
नवीन आर्थिक धोरणांच्या संदर्भात भारतीय कर्मचार्यांच्या संघटनांचे धोरण विरोधी व स्वार्थी आहे. उदाहरणार्थ भारतातील ५४,००० (यांपैकी केवळ १०० शाखा बंद झाल्या तरी) ५३,९०० राष्ट्रीयीकृत बँक शाखांतील अवाढव्य (बहुधा २० लाख) कर्मचारीवर्ग थोडेसे अपवाद वगळता, रा. स्व. संघ व भा.ज.प. मनोवृत्तीचा आहे व त्यांच्या संघटनाही त्याच मनोवृत्तीच्या असतात. ह्या कर्मचार्यांची वृत्ती कशाप्रकारची आहे? रशियात सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण होत आहे म्हणून टाळ्या पिटायच्या व भारतातील खाजगीकरणाविरुद्ध प्राणपणाने लढा देण्याची भाषा करायची! बँक कर्मचारी व त्यांच्या संघटनांप्रमाणेच, त्यांचेच सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायबंधू व त्यांच्या संघटना उदाहरणार्थ आयुर्विमा, राज्य परिवहन, विद्युत मंडळ, इत्यादि बँक कर्मचार्यांचाच कित्ता गिरवतात.
डॉ. भीमराव गस्ती – एक व्रतस्थ जीवन
‘चोर-दरवडेखोर’ अशी मुद्रा धारण करणार्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशातील बेरड-रामोशी जमातीत जन्माला आलेला एक कर्तृत्ववान माणूस – भीमराव गस्ती. उच्चभ्रू सभ्य समाजाच्या कुत्सित निंदेचे विषारी बाण सहन करीत केवळ जिद्द आणि कष्ट यांच्या भरंवशावर अत्युच्च शिक्षण घेऊन एक उच्च विद्याविभूषित शास्त्रवेत्ता झाला, केमिस्ट्रीत पीएच्.डी. ही अत्युच्च पदवी मिळविली. मनात आणले असते तर इतर विद्याविभूषितांसारखेच डॉ. गस्तींनाही सुखासमाधानाचे पांढरपेशी जीवन जगता आले असते. पण आपली आरामाची सरकारी नोकरी सोडून देऊन आपल्या बेरड-रामोशी जमातीच्या उद्धारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला येणारा छळ, निंदा, मनस्ताप वगैरे सर्व निमूटपणे सहन करून डॉ.
गांधींचे ‘सत्य’
सत्य आणि अहिंसा हे गांधींच्या तत्त्वज्ञानाचे प्रमुख आधारस्तंभ होते ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांपैकी अहिंसा म्हणजे काय? ‘अहिंसा’ या शब्दाने त्यांना नेमके काय अभिप्रेत होते? या प्रश्नाला बरेच निश्चित उत्तर त्यांच्या लिखाणात सापडते. परंतु ‘सत्य’ म्हणजे काय? हे मात्र मोठ्या प्रमाणात गूढच राहते. त्यांचे लिखाण काळजीपूर्वक वाचूनही त्यांना अभिप्रेत असलेली सत्याची संकल्पना अनाकलनीयच राहते. या लेखात या संकल्पनेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.
सत्य, सत् आणि साधु
‘सत्य’ या संस्कृत शब्दाचे, आणि तसेच आपल्या इंग्रजी लिखाणात गांधींनी वापरलेल्या ‘Truth’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
पत्रव्यवहार
संपादक आजचा सुधारक यांस, स. न. वि. वि.
श्री. प्रमोद सहस्रबुद्धे यांनी ‘मनस्मृती व विवेक’ (आजचा सुधारक, फेब्रु. ९४) या लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे मनुस्मृतीचा त्याग करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच तिचा विसर न पडू देणे हेही महत्त्वाचे, कारण तिच्यासंबधीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पुनरुज्जीवनवादी शक्ती तिच्या समर्थनार्थ पुढे येत राहतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याकडे बऱ्याच सुधारणावादी लोकांचे पुरेसे लक्ष जात नाही. हिटलरच्या जर्मनीचा विसर पडू न देण्याचा इझराएल व अनेक यहुदी संस्था यांचा जसा सारखा प्रयत्न असतो तसा काही प्रमाणात तरी आपणही मनुस्मृतीबाबत दृष्टिकोन ठेवायला हरकत नाही.