महाकवी पीयूष मिश्रा आणि एक रविवार

एकाच दिवशीच्या वृत्तपत्री थळ्यांनी इतकं अस्वस्थ व्हावं? लढाईचे दिवस नाहीत, बॉम्बवर्षाव नाही, त्सुनामी, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक नाही……सारं कसं शांत शांत! मग नेहेमीच्या मध्यमवर्गी स्वस्थतेचा आज मागमूसही का नाही? गुरु लोक म्हणतात तसा आपल्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तर नाही? असेल बाबा!

माझ्या गावाजवळचं, माझ्या ओळखीतलं गाव अमरावती. भारत स्वतंत्र व्हायच्या सत्तावीस वर्षे आधी ऑलिम्पिकला प्रतिनिधी पाठवणाऱ्या हनुमान आखाड्याचं गाव. श्रीकृष्णरुक्मिणीच्या प्रेमकथेचं गाव. दादासाहेब खापर्डे, सुदामकाका देशमुख, मोरोपंत जोशी, के.

पुढे वाचा

गांधीजींची जमीन, बाबासाहेबांचा किल्ला!

भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठेपणा याबद्दल वाद असण्याचं कारण नाही. बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात काही मतभेद जरूर होते. मात्र त्यामागे त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. देशाचं आणि समाजाचं कल्याण हाच दोघांचाही ध्यास होता! दोघांनाही एकमेकांच्या असण्याची किंमत आणि महत्त्व माहीत होतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी दोघांनाही दोन पावलं मागं यावं लागलं असेल, तर ते त्यांनी मान्य केलं. पुणेकरार हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. दोघंही आपापल्या ठिकाणी बरोबर होते.

पुढे वाचा

इंडिया विरुद्ध भारत

डिसेंबर १९७७ मध्ये जी.आर.भटकळ स्मृती व्याख्यानमालेत ‘भारतीय समाजातील वर्ग संघर्षाचे स्वरूप’ या विषयावर प्राध्यापक वि.म.दांडेकर यांनी आपले विचार मांडले. त्यांच्या या भाषणाची पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे. १९७५ साली जून महिन्यात श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जारी करून देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि कामगारांच्या पुढाऱ्यांना तुरुंगात डांबले. यामुळे स्वाभाविकपणे लोकांचे व खास करून कामगारांचे लढे थंडावले. त्यामुळे आणीबाणी संपून विरोधी पक्षाचे नेते व कामगाराचे पुढारी मुक्त होताच देशात अस्वस्थ लोक आणि कामगार यांचे लढे सुरू झाले. याच काळात डॉक्टर दत्ता सामंत याचे लढाऊ नेतृत्व मुंबई व ठाणे परिसरच नव्हे तर थेट औरंगाबादपर्यंत बंडाचे निशाण फडकावू लागले. याच

पुढे वाचा

जीवनव्यवहारातील स्त्रीवाद

आजकाल आपले आयुष्य इतके समस्याप्रधान झालेले आहे व कितीतरी प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहेत. त्यातलाच एक फार गंभीर प्रश्न म्हणजे ‘लैंगिक विषमता’. ह्या प्रश्नावरचा अगदी रामबाण उपाय म्हणजे सर्वांनी आपल्या जीवनव्यवहारात स्त्रीवादाचा अवलंब करणे.

कोणतीही विचारसरणी अंगीकारायची झाल्यास आपल्याला त्या विचारसरणीच्या अगदी मुळापर्यंत जावे लागते. म्हणजेच ‘काय’, ‘का’ आणि ‘कसे’ ह्या तीन प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतात. तेव्हाच आपण त्या विचारसरणीचा अवलंब करू शकतो. स्त्रीवादाच्या मुळापर्यंत जाण्यासाठीदेखील तीन प्रश्नांची उत्तरे सर्वात आधी आपल्याला शोधावी लागतात.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ७

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“हां, तर कुठे होतो आपण राजन्?” 

“तू त्या झाडाच्या फांदीवर उलटा लोम्बकळत होतास; मी तिकडून, काट्याकुटयांनी भरलेल्या पायवाटेने येऊन तुला फांदीवरून कसंबसं उतरवून खांद्यावर घेतलं आणि आता  स्मशानाच्या दिशेने निघालो आहे.” 

“तसं नाही रे बाबा, मी म्हणत होतो की गेल्या खेपेस, दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आपण कुठवर आलो होतो?”

“ओह्ह…. विसरला असशील तर बरंच आहे.”

पुढे वाचा

महाग पडलेली मोदीवर्षे

  • नोव्हें २०१६ च्या डिमॉनेटायझशन नंतर काळा पैसा, खोट्या नोटा आणि दहशतवाद कमी झाला का? 
  • मेक-इन-इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, आणि इतर योजनांनी रोजगारनिर्मितीला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळाली का?
  • स्वच्छ भारत योजनेपरिणामी उघड्यावर शौच करणे बंद होऊन भारतीयांचे स्वास्थ्य सुधारले का?
  • मोदीकाळात भ्रष्टाचाराला रोख लागून शासनव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम झाली का?
  • जगभरच्या नेत्यांना मिठ्या मारणारे आणि स्वतःचे मित्र म्हणवणारे मोदी भारताचे जगातील स्थान उंचावण्यात यशस्वी झाले आहेत का?
  • निवडणुकांमध्ये दोनदा संपूर्ण बहुमताने निवडून आलेले मोदीसरकार लोकशाही पाळत आहे का?

स्टॉक मार्केट उच्चांक पाहून “सब चंगा सी” म्हणणाऱ्या उच्च मध्यमवर्गासाठी, हिंदी-इंग्लिश-मराठी टीव्ही चॅनेल्सवरच्या झुंजींना बातम्या असे समजणाऱ्या, किंवा सोशल मीडियावरून माहिती मिळवणाऱ्या सर्वांसाठी वरील बहुतांश प्रश्नांचे उत्तर “होय, नक्कीच” असे आहे.

पुढे वाचा

आजची युगनिष्ठा

‘ऐहिक निष्ठा ही आजची युगनिष्ठा आहे.’, असे आज ढोबळमानाने म्हणता येईल. ढोबळमानाने याकरिता कारण, मानवाच्या एकमूलकतेचे गृहितक हे आता मानवशास्त्राने टाकून दिले आहे. त्यामुळे, मानवी समाजाची आणि म्हणून सर्व व्यक्तींची (individuals) मूल्यनिष्ठा सर्वत्र एकसारखीच आहे, असे मानण्यातील तर्कदोष उघड आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, ती तशी कधी होती का? असे विचारल्यास, त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते. उलट, ती किती वैविध्यपूर्ण आणि समृद्ध होती, याला बरेचसे अनुकूल पुरावे मिळू शकतील. भारतीय सामाजिक-धार्मिक परंपरेचा परिपोष हा जसा आत्मवाद, ईश्वरवाद, अद्वैतवाद यांतून झाला, तसाच तो अनात्मवाद, निरिश्वरवाद, द्वैतवाद, संशयवाद आणि अज्ञेयवादातूनही झालेला आढळून येईल.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यावर संक्रांत

(२०१६ साली जलिकट्टू शर्यतींवर बंदी आली होती. त्या विषयावरील निखिल जोशी यांचा लेख ‘बिगुल’ ह्या मराठी ऑनलाईल पोर्टलवर जानेवारी २०१७ सालीं प्रकाशित झाला होता. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठविली असल्याच्या पार्श्वभूमीवर ह्या लेखाचे औचित्य वाटल्याने हा लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत.)

गेल्यावर्षी दहीहंडीवर न्यायालयाने निर्बंध घातले होते. लहान मुलांना धोकादायक परिस्थितीत टाकण्याविरुद्ध आणि सार्वजनिक जागा व्यापून सण साजरे करण्याविरुद्ध आक्षेप घेणे अर्थातच योग्य असले तरीही, प्रौढांनी किती धोका पत्करावा त्याविषयीही सरकारने आणि न्यायालयाने अतार्किक निर्बंध लादले होते. प्रस्थापित पुरोगामी विचारवंतांनी अर्थातच या निर्णयाचे धर्मनिरपेक्षता म्हणून स्वागत केले होते आणि धर्मप्रेमींनी मात्र त्या निर्बंधांना धर्मविरोधी ठरवून बंदीला न जुमानता परंपरा साजर्‍या केल्या होत्या. यावर्षीही

पुढे वाचा

तीन कविता

१. तुला डॉलच बनून रहायचे असेल तर 

तुला डॉलच बनून रहायचे असेल तर 
पाठवत राहा शुभेच्छा 
महिला दिनाच्या.. 
बस कुरवाळत 
तुझ्या सहनशीलतेच्या दागिन्याला 

तसेच, आयुष्यभर पुन्हा 
सहन करण्यासाठी… 
करत रहा अभिमान 
तुझ्या स्वत्वाच्या त्यागाचा 

दिवसाढवळ्या पाहिलेल्या स्वप्नाला
गुलाबी रंगाचा डोहात 
बुडवून मारण्यासाठी …
भरत रहा ऊर 

‘कशी तारेवरची कसरत करते’ 
हे ऐकून 
तुझ्या मनावर कोरलेल्या 
भूमिकेला न्याय देत 
घराचा ‘तोल’ तुझ्या मूकपणाच्या 
पायावर सांभाळण्यासाठी… 
टाकत राहा 
मनगटात बांगड्यांचे थर

नेसत राहा 
नवरात्रीच्या नऊ साड्या 
करत रहा 
मेंदूला गहाण ठेवणारे उपवास 
भरत रहा 
टिकल्यांचा ठिपका 
तुझ्या प्रशस्त कपाळाच्या  
स्वातंत्र्याच्या चंद्रावर 
ग्रहणासारखा

तुला डॉलच बनून राहायचे असेल तर….

पुढे वाचा

मानवी प्राण्यातील जाणीव भान (पूर्वार्ध)

मेंदूतील क्रिया–प्रक्रियांचे निरीक्षण
जगाच्या रहाटगाडग्यात वावरत असताना प्रत्येकाला हजारो समस्यांचा सामना करावा लागतो, प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. काही प्रश्न अगदीच क्षुल्लक असतात; परंतु आपणच त्यांना मोठे समजून आपला श्रम आणि वेळ वाया घालवत असतो. काही वेळा प्रश्न गंभीर असला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळे गोत्यात सापडतो. काही समस्या मात्र खरोखरच गुंतागुंतीच्या असल्यामुळे त्यांची उत्तरं शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. काही समस्यांना उत्तरं सापडतात, काहींना अर्धवट अवस्थेत सोडून द्यावे लागते, व इतर कांहींच्या बाबतीत उत्तर नाही म्हणून गप्प बसावे लागते.

पुढे वाचा