मुस्लिम निधर्मवाद्यांचे आंदोलन

जामिया मिलिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेतील एक प्राध्यापक श्री. मुशिरुल हसन यांनी आपल्याला होणार्‍या विरोधाला न जुमानता कामावर रुजू होण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खरोखरीच अभिनंदनास पात्र आहे. आपल्या कडव्या जातीयवादी विरोधकांशी झुंज घेताना अनेक वेळा त्यांना जी ससेहोलपट सोसावी लागली त्यामुळे थकून जाऊन, एकाकी पडल्याने आणि विशेषतः १९९२ च्या डिसेंबरमध्ये त्यांच्यावर जो शारीरिक हल्ला करण्यात आला त्यामुळे धास्तावून, सलमान रश्दीच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाबद्दल दोन वर्षांपूर्वी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केलेली विधाने आणि लोकशाहीमध्ये मतभिन्नता असतानाही प्रत्येकाला मतस्वातंत्र्य असावे याबद्दलचा धरलेला आग्रह यांच्यापासून ते परावृत्त होतील अशी त्यांच्या विरोधकांची अपेक्षा होती ती त्यांनी धुळीला मिळविली आहे.

पुढे वाचा

बोहरा जमात आणि परिवर्तनवादी चळवळ

[‘दाऊदी बोहरा जमात आणि मानवी अधिकार’ या नावाच्या श्री. असगरअली इंजनिअर यांचा लेख मेनस्ट्रीम या नियतकालिकाच्या ५ मार्चच्या अंकात आला आहे. त्यावर ताहिर पूनावाला यांची पुढील प्रतिक्रिया मननीय आहे. त्यांच्या मते मानवी अधिकार या गोंडस नावाखाली सूक्ष्म धर्मनिष्ठेचा प्रसार होत आहे. आणि हे प्रथमच होत आहे असेही नाही.]
सय्यदना हे सर्वोच्च धर्मगुरु असून ते ‘दाई’ म्हणवले जातात. ही दाई-(दावत) संस्था सुमारे ८ शे वर्षांपूर्वी इमाम तय्यब यांनी स्थापन केली. धर्मसत्तेच्या द्वारे राजसत्ता हस्तगत करण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात प्रतिस्पर्ध्यांकडून जिवाला धोका उत्पन्न झाला असता इमामांना अज्ञातवासी होणे भाग पडले.

पुढे वाचा

संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ (भाग ३)

मनू हा स्त्रीद्वेष्टा आहे, त्याने स्त्रियांविषयी करू नये ती विधाने केलेली आहेत. पुरुषाने स्वतःच्या स्वार्थासाठी ‘स्त्री’ला बंधनात जखडून ठेवले पाहिजे, असे मनूचे मत आहे, अशी मनुस्मृतीच्या अनेक पुरोगामी अभ्यासकांची समजूत असून याविषयी वेळोवेळी ते सतत लिहून मनूविषयी आपला निंदाव्यंजक अभिप्राय वाचकांच्या गळी उतरविण्याची अविश्रांत खटपट चालू ठेवतात. मनूविषयीचे आपले हे मत मनुस्मृतीच्या सखोल अभ्यासावर आधारलेले आहे असेही ते सुचवितात. या विचारात मनूच्या स्त्रीविषयक विचारावर लिहिताना ‘पिता रक्षति कौमारे’ यानंतर पुढे १०-१५ श्लोक जरी वाचले तरी तेवढ्यावरूनही पुरुषांनी स्त्रियांना बंधनात जखडून ठेवावे, स्त्रिया त्यांच्या स्वभावामुळे केव्हा व्यभिचारिणी होतील, याचा भरवसा नसल्यामुळे त्यांच्यावर जागता पहारा ठेवावा, कोणतीही सवड किंवा सवलत त्यांना देऊ नये, असे मनूचे म्हणणे असल्याचे आपले मत झाल्याचे ते मांडत असतात.

पुढे वाचा

श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार

मानवाला जे ज्ञान प्राप्त होते ते फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी होते. या प्रमाणांच्या पलीकडे साक्षात्कार नावाचे एक प्रमाण आहे, त्याने होणारे ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान यांनी होणार्‍या ज्ञानापेक्षा अधिक प्रमाण आहे, म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान यांनी झालेले ज्ञान साक्षात्काराने झालेल्या ज्ञानाच्या विरुद्ध असेल तर प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी झालेले ज्ञान खोटे मानावे; शिवाय साक्षात्काराने अशा काही विषयांचे ज्ञान होते की जे प्रत्यक्ष व अनुमान यांनी होऊच शकत नाही असे एक मत प्रचलित आहे. ईश्वर, परलोक वगैरेंचे ज्ञान साक्षात्काराने होते व म्हणून साक्षात्काराच्या विरुद्ध प्रत्यक्ष व अनुमान यांची साक्ष अप्रमाण आहे असे साक्षात्कारवाद्यांचे म्हणणे आहे.

पुढे वाचा

देव ताओवादी आहे का?

देव ताओवादी आहे का?

रेमंड स्मल्यन (Raymond Smullyan) याच्या ‘द ताओ इज सायलंट’ ह्या पुस्तकातील ‘इज गॉड अ ताओइस्ट?’ हा संवाद हाफस्टाटर आणि डेनेट यांनी संपादित केलेल्या The Mind’s I या पुस्तकात उद्धृत केला आहे. या संवादाचे हे स्वैर व बोली भाषेतील मराठी रूपांतर आहे.
मानव : म्हणून म्हणतो, परमेश्वरा, तू जर खरोखरच कृपाळू असशील तर मला इच्छास्वातंत्र्याच्या शक्तीतून मुक्त कर.
देव : काय, मी दिलेली सर्वात मोठी देणगी तू नाकारतोस?
मानव : जबरदस्तीने दिलेली ‘देणगी’ कशी होईल? मला इच्छास्वातंत्र्य आहे, पण माझ्या इच्छेमुळे नव्हे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक
आजचा सुधारक ह्यांस,
आपल्या मार्च ९४ च्या अंकांतील प्रा. प्र. ब. कुळकर्णी ह्यांनी लिहिलेला ‘गोमंतकातील रथोत्सव’ हा लेख वाचून एक-दोन गोष्टी सहज लक्षात आल्या.
(१) मराठी माणसे (व-हाडातली काय, पश्चिम महाराष्ट्रातील काय) मराठीसाहित्याभिमुख झाली आहेत किंवा होत आहेत हा कुळकर्ण्यांचा आशावादी विश्वास फार मोहवणारा आहे ह्यात शंका नाही. वर्हामडाचे मला काही सांगता यायचे नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात तरी मराठीची दुर्दशा लक्षात घेतली तर पन्नास-साठ शेवाळकरांनी कुळकर्णी म्हणतात तसे कार्य पन्नाससाठ वर्षे केले तर कदाचित थोडी धुगधुगी निर्माण होईल. एरवी राष्ट्रवाद्यांमुळे हिंदी व आंतरराष्ट्रीयवाद्यांमुळे इंग्रजी ह्या दोन भाषांचाच विकास व्हायचा हे स्वच्छ दिसते.

पुढे वाचा

प्रतिक्रिया

‘संदर्भ न पाहता लावलेले अर्थ’ या शीर्षकांतर्गत डॉ. के. रा. जोशी ह्यांची दोन टिपणे आजचा सुधारक (मे, १९९४) च्या अंकात प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील दुसऱ्या टिपणासंबंधीची माझी प्रतिक्रिया नोंदवीत आहे.

डॉ. के. रा. जोशी हे माझे शिक्षक. ते गंभीरपणे करीत असलेल्या ज्ञानसाधनेविषयी पूर्ण आदर बाळगून मी मतभेदाचे मुद्दे नमूद करू इच्छिते.

दुसऱ्या टिपणाच्या शेवटच्या चार ओळीत सरांनी एका दगडात बुद्धिवादी, पुरोगामी, स्त्रीमुक्तिवादी असे अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मी स्वतः स्त्रीमुक्तीच्या विचारांना मानणारी व त्यानुसार आचरण करणारी एक व्यक्ती आहे.

पुढे वाचा

निसर्गाकडे परत चला!

आपल्या परिचयाच्या गोष्टी आहेत. परंतु यांत नवीन काही नाही. कन्फ्यूशिअसपूर्वी इ. पू. सहाव्या शतकात होऊन गेलेल्या लाओत्सेनेही आधुनिक यंत्रांनी केलेल्या प्राचीन सौंदर्याच्या नाशाबद्दल रस्किनइतक्याच तळमळीने तक्रारी केल्या आहेत. रस्ते, पूल आणि बोटी या अनैसर्गिक असल्यामुळे त्याला भयावह वाटत. आजचे उच्चभ्रू लोक ज्या भाषेत सिनेमाविषयी बोलतात त्या भाषेत तो संगीताविषयी बोले. आधुनिक जीवनातील घाई चिंतनशील वृत्तीला मारक आहे असे त्याला वाटे. मनुष्याने निसर्गानुसार जगावे असे त्यांचे मत होते. हे मत सर्व युगांत वारंवार व्यक्त झाले आहे; मात्र त्याचा आशय दरवेळी वेगळा असे.

पुढे वाचा

निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी

मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले.

पुढे वाचा

संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ – (भाग १, भाग २)

– १ –

‘धारणाद्धर्म इत्याहुः’ हे प्रसिद्ध वचन अनेकवार वापरले जाते. त्याचा संदर्भ पाहिल्यावर ‘धर्म’ शब्द वापरणार्‍यांच्या मनात काय अर्थ होता; तसेच धर्म वापरणारे भारतीय तो मुख्य कोणत्या अर्थाने वापरतात हे स्पष्ट व्हायला काही आडकाठी नाही. पण हे काहीही न करता या ना त्या रूपाने धर्मकल्पनेवर उठविली जाणारी झोड न्याय्य दिसत नाही. प्रस्तुत वचन हे महाभारतात दोन ठिकाणी आले आहे. शांतिपर्वात भीष्म युधिष्ठिराला धर्माचे स्वरूप समजावून सांगताना म्हणतात
धारणाद्धर्म इत्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।।
यः स्याद्धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ।।
(अध्याय १०.११)
दुसरे स्थळ कर्णपर्वात आहे.

पुढे वाचा