गांधींचे सत्य

श्री. देशपांडे (दि. य.) यांनी गांधीजींच्या तत्त्वज्ञानांतील सत्याच्या संकल्पनेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. प्रयत्नांती परमेश्वर’ गूढ आणि अनाकलनीयच राहिला, त्या ऐवजी तो स्पष्ट व आकलनीय व्हायला हवा होता.
गांधींचा स्वतःचा ‘सत्याचा शोध त्यांच्या आत्मचरित्रांतील अवतरण देऊन, दि.यं.नी त्यावर निराशाजनक असा अभिप्राय दिला आहे.
God is Truth व Truth is God ही दोन वाक्ये ‘ईश्वराचे परिपूर्ण वर्णन’ म्हणून गांधींनी सुचवल्याचे सांगून, दि.य. ती वाक्ये असाधु व निरर्थक ठरवितात. अशी दुर्बोध भाषा वापरणारे लोक अप्रामाणिक असतात असे जरी दि.यं.ना

पुढे वाचा

इतर

मा. संपादक, आजचा सुधारक, यास
सा. न.
आपला एप्रिल १९९४ चा अंक वाचला. त्यातील ललिता गंडभीर यांनी दिलेल्या ‘गीता साने यांच्या पत्रास उत्तर’ मधील काही विचार खटकतात. त्या संदर्भात वे एकूणच स्त्री-मुक्ती चळवळीच्या संदर्भात पुढील विचार मांडावेसे वाटतात
पूर्ण स्त्री-मुक्तीच्या उपरोक्त व्याख्येमधील स्त्रीच्या लैंगिक शुद्धतेला अवास्तव महत्त्व देणे बंद हा मुद्दा खटकतो. यामुळे केवळ एका स्वैराचारी, बेबंद समाजाची निर्मिती होईल अशी भीती वाटते. तेव्हा स्त्रियांच्या लैंगिक शुद्धतेला महत्त्व देणे बंद करण्याऐवजी पुरुषांच्या लैंगिक शुद्धतेबाबत स्त्री-मुक्तिवाद्यांनी व स्त्री-पुरुष समानतावाद्यांनी आग्रह धरावा असे वाटते.

पुढे वाचा

स्वायंभुव मनूची ‘निष्कारण निन्दा?

मनु हा वस्तुतः स्त्रीद्वेष्टा नाही, त्याने स्त्रियांविषयी करू नये ती विधाने केलेली नाहीत, पुरुषाने स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्रीला बंधनात जखडून ठेवले पाहिजे असे मनूचे मत नाही, तरीदेखील त्याच्या वचनांचा विपर्यास करून पुरोगामी अभ्यासक मनूची निंदाकरतात आणि मनुस्मृतीचे सखोल अध्ययन न करताच आपला अभिप्राय वाचकांच्या गळी, वेळोवेळी उतरवितात असे मत डॉ. के. रा. जोशी ह्यांनी ‘संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ ह्याविषयी दोन लेख लिहून प्रतिपादन केले आहे. डॉ. जोशी ह्यांनी ज्या मनुस्मृतीचा कैवार घेतला आहे तिचे वास्तविक स्वरूप आपण आधी पाहू या.

पुढे वाचा

चर्चा : संदर्भ न पाहता लावलेले अर्थ

संपादक आजचा सुधारक यांस,
स.न.वि.वि.
“संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हे, याच नावाने लिहिलेल्या (आजचा सुधारक, मे १९९४) के. रा. जोशी यांच्या लेखातील मजकुराचेच रास्त वर्णन असावे असे वाटते. ‘मनूची निंदा करण्यासाठी ज्या वचनाचा भरमसाठ आधार घेतला जातो. या प्रस्तावासह ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ चा जोशी यांनी दिलेला अर्थ असा की “स्त्रियेला कुठल्याही अवस्थेत संरक्षणासाठी स्वातंत्र्याची (स्वतःवर निर्भर राहण्याची) पाळी येऊ नये.” श्री. जोशी यांच्या मते मनूने या श्लोकाद्वारे स्त्रियांना सामाजिक सुरक्षेचे कवच दिले असून, आजच्या परिस्थितीत (‘मनूला बुरसट मानणार्याो व स्वतःला प्रगत मानणार्याा समाजाच्या संदर्भात) ‘मनूच्या या उपाययोजनेची दखल घेण्यासारखी नाही काय हे प्रत्येकाने निर्मळ मनाने स्वतःशीच ठरवावे असा त्यांनी वाचकास कळकळीचा सल्ला दिला आहे.

पुढे वाचा

दंगली का होतात आणि कशा त्या थांबतील?

‘दंगल’ हा शब्द वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी मी प्रथम ऐकला तो सोलापुरात. मुसलमान समाजाची वस्ती तेथे बर्या च प्रमाणात आहे. १९३० सालाच्या आगेमागे तेथे हिंदू-मुसलमानांचे दंगे वरचेवर होत असत.
‘फोडा आणि निर्वेध राज्य करा हे परकीय ब्रिटिश सत्तेचे धोरण होते. १८५७ सालच्या बंडापासून ब्रिटिश सत्ताधार्यांरनी या दुष्ट राजनीतीचा पाठपुरावा केला होता. त्याला पाने आली होती, आणि प्रतिवर्षी भारतभर ठिकठिकाणी हिंदू-मुसलमानांच्या दंग्यांचे भरघोस पीक ब्रिटिश सत्ताधार्यां च्या पदरात पडत असे.
भारतामधून ब्रिटिश सत्तेची उचलबांगडी झाली, की हिंदू-मुसलमान दंगेदेखील इतिहासात जमा होऊन जातील, या स्वप्नात आम्ही होतो.

पुढे वाचा

अमेरिकन शिक्षण : दशा आणि दिशा

सार्वजनिक शाळांचा जनक म्हणून गणला जाणारा होरेस मॅन हा १८३० च्या एका भाषणात म्हणाला होता, ‘शिक्षण हाच सामाजिक समतेचा पाया आहे. १६३५ ते १८०० पर्यंत येथील बहुसंख्य विश्वविद्यालये व प्राथमिक माध्यमिक शाळा खाजगी मालकीच्याहोत्या. शिक्षण हे पैसेवाल्यांच्या हातातील खेळणे होऊन बसले होते. मध्यमवर्ग व तळागाळाची जनता ही शिक्षणापासून जवळजवळ वंचित झाली होती. पण अशी ‘स्फोटक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती ही उगवत्या लोकशाहीला मारक ठरेल हे लक्षात घेऊन होरेस मॅन, हेन्री बर्नार्ड व चार्ल्स वाइलीसारख्या शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या जिवाचे रान करून धर्म-जात ह्यांच्या मर्यादा उल्लंघून सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रचंड मोहीम अंगीकारली व १८५० च्या सुमारास ‘सार्वजनिक (पब्लिक) शाळांचा पाया घालून अमेरिकन लोकशाहीचा पाया मजबूत केला.

पुढे वाचा

अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म

साधना साप्ताहिकाच्या १ मे १९९४ रोजी प्रसिद्ध झालेल्या ना. ग. गोरे प्रथम स्मृतिदिन विशेषांकात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या लेखात एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात की ‘आगरकरांचा अपवाद सोडला तर सर्व समाजसुधारकांनी धर्मसुधारणेची चळवळ चालविली ही त्यांची वैचारिक मर्यादा होती की प्रगल्भता? डॉ.आंबेडकर, गाडगेमहाराज यांच्यानंतरच्या जवळपासच्या गेल्या अर्धशतकात महाराष्ट्रात धर्मभावनेविषयी जनसामान्यांच्या मनाशी होणारा संवाद थांबला, कृतिकार्यक्रम तर दूरचराहिला, हे परिवर्तनवादी शक्तींच्या दृष्टीने इष्ट की अनिष्ट?… नानासाहेब व त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्या, ज्या सर्वांच्यापासून आम्ही वैचारिक मार्गदर्शन घेतले, ते सर्वजण याबाबत निःसंदेह होते.

पुढे वाचा

शिक्षणातील स्वातंत्र्य

शिक्षणातील स्वातंत्र्याला अनेक बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे शिकावे की न शिकावे ह्याचे स्वातंत्र्य. नंतर काय शिकावे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य. आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणात मताचे स्वातंत्र्य. शिकावे की न शिकावे ह्याचे स्वातंत्र्य बाल्यावस्थेत अंशतःच देता येईल. जे मूढमती नाहीत अशा सर्वांना लिहितावाचता आले पाहिजे. हे केवळ संधी दिल्याने कितपत साध्य होईल हे अनुभवानेच कळेल; परंतु केवळ संधी दिल्यानेच भागते असे दिसले तरी संधी मुलांवर लादाव्या लागतील; कारण बहुतेक मुले खेळणेच पसंत करतील आणि त्यात त्या संधी असणार नाहीत. त्यानंतरच्या जीवनात काय करायचे, उदा.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

प्रा. दि. य. देशपांडे यांस,
स. न. वि. वि.
आपले दिनांक १२ एप्रिल, ९४ चे पत्र आणि त्यासोबतचे देवदत्त दाभोलकर यांचे पत्र मिळाले. प्रा. दाभोलकरांचे पत्र आजचा सुधारक या मासिकाच्या ताज्या अंकातही प्रकाशित झालेले आहे. आपल्या पत्रास ताबडतोब उत्तर पाठवू शकलो नाही याबद्दल क्षमस्व.
(१) “सुधारकाचे सर्व अंक उपलब्ध नाहीत हे सीतारामपंत देवधर यांचे म्हणणे खरे आहे.
(२) ३० मे १८९२ ते १८९५ पर्यन्तचे साप्ताहिक सुधारकाचे अंक दिल्लीत तीन मूर्ती या जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी स्मृती ग्रंथालय आहे तेथे उपलब्ध आहेत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि.
श्री. के. रा. जोशींचा “संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हा लेख संभ्रमात टाकणारा आहेच, शिवाय त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय निर्माण करणारा आहे. पहिल्या भागात त्यांनी केलेले “शौच” चे आंतर-बाह्य स्वच्छता हे भाषांतर मनुस्मृतीतीलआशौच” या शब्दापासून बरेच दूरचे आहे. आशौच ही धार्मिक (religious) क्रिया असून त्याचा शिवाशिवाशी (स्पर्शजन्य विटाळ) संबंध आहे. अभ्यासूंनी मनुस्मृतीतील पाचवा अध्याय वाचल्यास याचा बोध होतो. ‘अस्पृश्यता’ येथूनच उगम पावते.
त्यांच्या दुसर्या’ भागातील भाषांतरात व वि. वा. बापटांच्या भाषांतरात खूप अंतर आहे.

पुढे वाचा