काही वर्षांपूर्वी मी एक बातमी वाचली होती, एका १२ वर्षाच्या मुलाची. एका लग्नाच्या वरातीतील गाडीने त्याच्या सायकलचे नुकसान केले. जेव्हा त्याने आपले चाक दुरुस्त करण्यासाठी भरपाई मागितली तेव्हा काय झाले? वरातीतील लोकांना तो त्यांचा अपमान वाटला, त्या मुलाला मारहाण झाली आणि जवळच असलेल्या शेतात त्याला जाळून ठार मारले. ही कहाणी तेथील प्रादेशिक वर्तमानपत्रात फक्त उल्लेखण्यात आली, पण सार्वजनिक उद्रेक अजिबात दिसला नाही. त्यानंतर काही दिवसांनंतर, बोअरवेलमध्ये अडकलेल्या एका दोन वर्षांच्या मुलाची एक कहाणी, जी सर्वांनी अगदी अति महत्त्वाच्या घटनेप्रमाणे उचलून धरली.
शाळा ते लोकशाळा- एक विचार
महात्मा ज्योतिबा फुले यांनी १९व्या शतकात समाजातील वंचितांची विद्येविना कशी स्थिती झाली याविषयी लिहिले होते,
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ अविद्येने केले
महिला, अस्पृश्य व मागासवर्गीय यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी सनातनी लोकाचा विरोध, शिव्याशाप, बहिष्कार सहन केले व हजारो वंचितांना मुक्तीचा मार्ग दाखविला.
त्यानंतरच्या काळात नामदार गोखले, महर्षी कर्वे, शाहू महाराज, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून व्यक्तिच्या व समाजाच्या विकासासाठी शिक्षण कसे असावे यावर विचारमंथन व प्रयोग केले, शिक्षणसंस्था उभ्या केल्या.
महिला नाहीत अबला… पण केव्हा?
Image by Wokandapix from Pixabay
निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की दूषित होते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, समाजातील रूढी-परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहेत व आतल्या आत सडत आहेत. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. तेव्हा या सर्व संस्थांमध्ये, रूढी-परंपरांमध्ये बदल करून त्यांना बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत, प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुषी वर्चस्व झुगारण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप सर्वसामान्यांनी घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे.
आवाहन
स्नेह.
कोरोनाच्या नव्या लाटेत शाळा-कॉलेजेस बंद होऊ नयेत यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न झाले आणि त्यांना अपेक्षित यशही मिळाले.खरेतर, असे प्रयत्न करणाऱ्यांचेदेखील सध्याच्या शिक्षणव्यवस्थेविषयी फार अनुकूल मत असेलच असे नाही. पण पर्यायी व्यवस्थेच्या अभावी’आहे ते किमान सुरू तरी असावे’ एवढा विचार त्यामागे नक्कीच असणार.
शिक्षणव्यवस्थेतील बदलांविषयी बोलताना अध्यापनशास्त्र, अभ्यासक्रम, मूल्यांकन यांवरच बोलले जाते. यासाठीच शाळेसारख्या रचना तयार झाल्या. शिक्षणविभाग आला. अभ्यासक्रम समिती तयार झाली. अभ्यासक्रमानुसार पुस्तकं आली. शाळेत मूल्यांकन आले. त्यासाठी परीक्षेसारखे माध्यम आले. शिकण्यासाठी आर्थिक मदत हवी तर वित्तीय संस्थांकडे जाणे आले. त्यासाठी कागदपत्रांची गरज भासू लागली. ही घट्ट भिनलेली/मुरत चाललेली रचना आपण तोडू शकत नाही कारण आपण काही मूलगामी विचार करायलाच घाबरतो आहोत.
मनोगत
‘आजचा सुधारक’चा लेखकवर्ग आणि वाचकवर्ग यांचे प्रतिसाद सुधारकच्या टीमसाठी एकंदरीतच अतिशय उत्साहपूर्ण ठरत आहेत. ऑनलाईन स्वरूपात सुरू केला तेव्हा सुधारकचा आवाका विस्तारावा अशी इच्छा असली तर ते इतक्या अल्प वेळात साध्य होईल अशी कल्पना नव्हती. आज सुधारकच्या लेखांवर येणारे प्रतिसाद नवनव्या विषयांवर साधकबाधक चर्चा होत आहे याचेच द्योतक आहेत.
वैचारिक चर्चेमध्ये सर्वांत आवश्यक घटक असतो, तो प्रश्न उपस्थित करण्याचा असे आम्ही मानतो. सुधारकच्या लेखांच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण तर होत आहेच; सोबतच वाचकांच्या मनात प्रश्न उपस्थित करण्यातही सुधारक यशस्वी ठरत आहे.
असे प्रश्न विचारांना चालना देतात. नवे
मॉबी डिक
लढाई ही जशी माणसा-माणसातील असते तशीच ती माणूस आणि प्राणी अशीही असते. तरबेज लेखक अशी गोष्ट सांगता सांगता ‘माणूस’ समजावून सांगतो. ‘मला ईशमाइल म्हणा’ या तीन शब्दांनी सुरू होणारी मॉबी डिक ही अशीच एक गाजलेली आणि गाजणारी जुनी (१८५१) इंग्लिश कादंबरी. लेखक: हरमन मेलव्हिल.
एका व्हेल-मारी जहाजावर, ‘पेक्वोड’वर, घडणारी ही गोष्ट. अहाब हा तिचा कप्तान. एका पायाने लंगडा. त्याचा तो पाय मॉबी डिक नावाच्या व्हेलनेच तोडला आहे. हा मॉबी डिक खुनशी, पिसळलेला आणि डूख धरणारा म्हणून साऱ्या दर्यावर्दींना माहीत आहे. या असल्या मॉबी डिकचा सूड घेण्याच्या इराद्याने अहाब उभा पेटला आहे.
बहुमूल्यी विश्व
“इंडिया विरुद्ध भारत हा झगडा नवा नाही. कित्येक वर्षांपासून तो सुरू आहे. शहरी विरुद्ध ग्रामीण, आहे-रे विरुद्ध नाही-रे, संधी असणारे विरुद्ध संधी नसणारे, उच्चवर्गीय/वर्णीय विरुद्ध इतर असा सगळा हा झगडा आहे. वेगवेगळ्या जाती, समूह, त्यांचे प्रयोजन, त्यांचे परस्परसंबंध, त्यांची गरज, त्यांतील तरल किंवा स्पष्ट भेद या सगळ्यांविषयी आपल्याला बोलावे लागणार आहे.”
‘आजचा सुधारक’च्या अंकाची ही थीम हातात पडली त्यावेळी नुकतेच २०२१ चे अ.भा.मराठी साहित्यसंमेलनाचे सूप वाजले होते नि त्यामुळे अध्यक्षीय भाषणाचा हॅंगओव्हर होता. म्हटलं, त्यावर लिहू का? आणि संपादकांनी “हो, तोही महत्त्वाचा विषय आहेच” असा प्रतिसाद दिला. मात्र लिहायला घेतल्यावर अंकाची थीम डोक्यात घोळायला लागली नि मनातल्या त्या विचाराची हीच बाजू जास्त प्रकर्षाने दिसायला लागली. अर्थात
मानवी प्राण्यातील जाणीव भान (उत्तरार्ध)
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जाणीव
वैज्ञानिक कथा-कादंबऱ्यावरून तयार केलेल्या चित्रपटात, टीव्ही मालिकेत एखादा स्मार्ट रोबो कचरा गोळा करताना, शहाण्यासारखा वागताना दिसतो. तेव्हा आपण टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करतो. कदाचित प्रत्येकाच्या मनात माणूस बुद्धिमान रोबो बनवू शकतो अशी एक अतृप्त आशा घर करून बसलेली असावी. जाणिवेचा अभ्यास करताना कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आतापर्यंतच्या संशोधनाचा नक्कीच उपयोग होईल असे तज्ज्ञांना वाटते. जाणीव समजून घ्यायची असल्यास जाणीव असलेले मशीन तयार करा असे विधान एका तज्ज्ञाने केले आहे. हे विधान गंमतीचे वाटत असले तरी ७०च्या दशकात मशीन्सना भाषा शिकवण्याची शिकस्त केली गेली हे आपण विसरू शकत नाही. ध्वनीचे
शून्याला समजून घेताना
परंपरांचे ओझे
ससा आणि कासव ह्यांच्या शर्यतीची गोष्ट सगळ्यांनीच ऐकलेली असावी. ससा वेगाने पळतो. कासव हळूहळू चालत जाते. ससा वाटेत झोपतो. कासव त्याला ओलांडून पुढे जाते आणि शर्यत जिंकते. गोष्टीवरून घ्यायचा बोध असा की वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचे. बोध अगदी खरा आहे; पण मुळात असमान क्षमता असलेल्यांना एकाच स्पर्धेत उतरवणे कितपत न्याय्य आहे? तर तसे नाही; आणि म्हणूनच कथेतल्या कासवाला जिंकवण्यासाठी सश्याला झोपवावे लागते.
आयुष्यात कितीदातरी अश्या अतार्किक स्पर्धांचे आपण बळी पडतो किंवा पाडले जातो. येथूनच गरज पडते ती प्रत्येकाच्या शून्याला किंवा आरंभबिंदूला समजून घेण्याची.
सहज भेटायला म्हणून आलेल्या त्या दोघा-तिघा तरूणांपैकी एक जण अंध होता. ऑफिसच्या
हिंदू, हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही
आज हिंदुधर्म अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. नुकतेच भारताच्या एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने इसिस (दाएश) आणि बोकोहराम या दहशतवादी संघटनांशी हिंदुत्वाची तुलना केली आहे. महिन्याभरापूर्वी अमेरिकेत हिंदुत्वाच्या उच्चाटनावर विचार करण्यासाठी एक जागतिक परिषदही आयोजित केली होती. त्यामध्ये हिंदुधर्म आणि हिंदुत्व वेगळे करता येणार नाहीत या मुद्द्यावर आम-सहमती झाली होती. उलटपक्षी सर्वसामान्य सुशिक्षित हिंदूला त्याच्या धर्मासंबंधी अथवा संस्कृतीसंबंधी जुजबी माहितीही नसते असा वरचेवर अनुभव येतो. आय.आय.टी. कानपूरमध्ये असताना एका एम.टेक. करणाऱ्या विद्यार्थ्याने एकदा मला रावणाचा भाऊ भीमसेन होता असे छातीठोकपणे सांगितले होते. Bibhishan आणि Bhimsen यात अनेक अक्षरे समान असल्याने कॉन्व्हेंट-स्कूलमध्ये शिकणाऱ्याचा असा घोटाळा होणे स्वाभाविक होते. बरे