5G वायरलेस तंत्रज्ञान – दुष्परिणाम आणि उपाय – भाग २

5G ला पर्याय फायबर ऑप्टिक केबलचा

बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना, डिसेंबर १९९६ मध्ये अमेरिकेतील कायदेमंडळात ‘टेलिकम्युनिकेशन्स ॲक्ट १९९६’ हा कायदा मंजूर झाला. हा कायदा ‘टेलिकम्युनिकेशन्स ॲक्ट १९३४’ ची सुधारित आवृत्ती आहे. यामुळे दूरसंचार उद्योग आणि एकूणच उद्योग-व्यवसायांमध्ये खूप मोठी उलथापालथ झाली. या कायद्याचे उद्दिष्ट होते, दूरसंचार क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे, नियंत्रणे कमीत कमी ठेवणे, जेणेकरून सेवांचे दर कमी होतील आणि सेवांचा दर्जा सुधारेल. तसेच, दूरसंचार क्षेत्रामधील आधुनिक तंत्रज्ञान वाजवी दरामध्ये सर्वांना उपलब्ध करुन देणे. 

‘टेलिकम्युनिकेशन्स ॲक्ट १९९६’ या कायद्यामध्ये काही त्रुटी होत्या.

पुढे वाचा

न्यायाची सावली आणि त्यामुळे होणारे अनाठायी रद्दीकरण

भारतीय दर्शने सहा. त्यातील न्याय अर्थात logic याच्या अंतर्गत येते कारणमीमांसा. या न्यायाचा न्यायालयातील न्याय-अन्यायाशी रूढ अर्थाने संबंध वाटत नसला तरी तो आहे. जे ग्राह्य ते न्याय्य. ते मानवतेच्या अनुषंगाने असो वा कायद्याच्या.

वेगवेगळ्या समूहांची मानवतेची व्याख्या कधीकधी वेगळी असू शकते. त्यामुळे कधीकधी कायदेदेखील अमानवी ठरू शकतात.  इतक्यातलंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिकेत गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाने आणलेली बंदी.  काहींच्या मते गर्भधारणा झाली की लगेच त्या जीवाला संपूर्ण आयुष्य जगण्याचा हक्क मिळतो. परंतु हे लोक ती गर्भधारणा जबरीने झाली असल्याचे विचारातही घेत नाहीत.

पुढे वाचा

इतिहासाला राजसत्तेच्या परिघातून बाहेर काढता येईल का?

  • इतिहासाचे पुनर्लेखन निसर्ग संवर्धंनासाठी आणि लोकराज्य आणण्यासाठी आवश्यक

सध्या आपल्या देशात आपल्या इतिहासलेखनाच्या इतिहासाचा समाचार घेणे सुरू आहे. राजभक्तांची आणि राष्ट्रभक्तांचीसुद्धा अशी मागणी अनेक वर्षांपासून होती, त्यावर कामही सुरू होते. विशिष्ट समुदायांमध्ये लोकप्रिय असलेल्या दूरचित्रवाणीवरच्या मालिकांमधून निवडक राजघराण्यांच्या इतिहासाला बदलून कशी वळणे दिली पाहिजेत, कसे उदात्तीकरण केले पाहिजे ह्याचे ‘प्रयोग’ करण्याचाही एक प्रघात झाला आहे. ह्या प्रयत्नांना ‘राजाश्रय’सुद्धा मिळाला आहे आणि त्यातून एक नवा उन्माद निर्माण होतो आहे असेही जाणवत होते; पण आता ही प्रक्रिया अधिकृत असल्याचे स्पष्ट संकेत नुकतेच देशाच्या गृहमंत्र्यांनी दिले.

पुढे वाचा

इतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग १

“To the historian, the activities whose history he is studying are not spectacles to be watched, but experiences to be lived through in his own mind; they are objective, or known to him, only because they are also subjective, or activities of his own.” – R.G.Collingwood

(The Idea of History)

इतिहास हा शब्द आपण अनेक भिन्न अर्थांनी वापरतो; पण त्यांपैकी इतिहासाचे दोन अन्वयार्थ विशेष महत्त्वपावले आहेत. इतिहासाचा संबंध काळाशी, विशेषतः भूतकाळाशी असतो आणि गतकाळात घडलेल्या विविध घटना – विवक्षित अवकाश व कालात घडलेल्या – असतात.

पुढे वाचा

मुस्लिम स्थळांच्या वादातून काय साध्य करणार?

देशात सध्या ज्ञानवापी मस्जिदीचे प्रकरण सर्वच प्रसारमाध्यमातून गाजवण्यात येत आहे. ही ज्ञानवापी मस्जिद नसून खरेतर ते शिवालय आहे, असे एका हिंदुत्ववादी गटाचे म्हणणे आहे. याबाबतचे प्रकरण वाराणसीच्या स्थानिक कोर्टात चालू आहे. सदर कोर्टाने या मस्जिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याचे सर्वेक्षण झाले आहे आणि त्याचा अहवालही मा.कोर्टाकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी जो आयोग नेमला होता त्या आयोगातील हिंदुत्ववादी सदस्यांनी या मशिदीतील वजू करण्याचा पाण्याचा साठा असलेल्या तलावामध्ये शिवाचे लिंग आढळले असल्याचा दावा केला आहे. वाराणसी कोर्टाने सदर जागेला ताबडतोब सील करून तेथे कोणीही जाऊ नये व त्या जागेला अथवा लिंगाला नुकसान पोहोचवू नये, असे आदेश दिले आहेत.

पुढे वाचा

सांस्कृतिक गंड आणि गंडांतर

दोन जूनच्या द इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात काही दिवसांपूर्वी टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाताना अपघातात मृत्यू पावलेल्या १८ वर्षीय विश्व दीनदयालम या होतकरू क्रीडापटूंच्या वडिलांची कैफियत मांडण्यात आली होती. त्यांचे असे म्हणणे होते की, भारतीय क्रीडा प्राधिकरण या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेने विश्वच्या आयुर्विमासंदर्भात त्यांच्या त्याआधी तीन आठवड्यांपुर्वी पाठवलेल्या पत्राला साधे उत्तरही दिले नाही.

हे वाचून मला २००९ मधील माझ्या एका पत्रव्यवहाराची आठवण झाली. तेव्हा मी द इंडियन एक्स्प्रेसचा पत्रकार म्हणून कृषीविषयक एका वृतांकनासाठी अमेरिकेला गेलो होतो.

पुढे वाचा

इतिहास – डावं.. उजवं..

इतिहास हा माणसाला शहाणपण शिकवणारा विषय आहे असे एका युरोपीयन विचारवंताने नोंदवले आहे. हे वाक्य जसेच्या तसे केवळ तेव्हाच लागू होऊ शकते जेव्हा इतिहास हा विषय वैयक्तिक आणि तत्संबंधित हितसंबंधापासून दूर ठेवण्याचे किमान शहाणपण लोकांच्या अंगवळणी पडेल. हे सहजासहजी घडून येणारच नाही. याचे स्पष्ट कारण म्हणजे इतिहास हा देशभरातील आणि जगभरातील बहुतेक लोकांच्या हितसंबंधाचा मुद्दा बनून राहिला आहे. त्यासंबंधित आवश्यक अशा सर्व रचना आणि प्रणाली जमवत हा हितसंबंधी समूह सतत जागता राहत असतो. कोणत्याही प्रकारे आपले हितसंबंध धोक्यात येणार नाहीत याची दक्षता अगदी काटेकोरपणे वाहत हा समूह ऐतिहासिक सत्यांची मोडतोड करत समाजातील आपले वर्चस्व राखत असतो.

पुढे वाचा

तू हसत रहा….

तू हसत रहा
क्रांतीच्या विचारांवर 
मी पेटवत जातो
एक एक रान 

तू ओढत जा 
तुझ्या कुजल्या विचारांची 
एक एक रेघ आडवी 
नवनिर्माणाच्या स्वच्छ फळ्यावर 
मी पुसत जातो 
ती हर एक रेघ आडवी

तू बोल छाती फुगवून 
आम्ही करोडोंमध्ये आहोत 
मी ढोल लावून 
एक एक जमवीत जाईन

तू करत जा चर्चा 
आमच्यावरील खोट्या आरोपांची 
मी चिरत जाईन 
तुझ्या  वाफाळ शब्दांच्या 
तुफानी वादळांना 

तू फवारत जा 
विष फुटीरतेचं 
मी सावरत जातो 
पडत चाललेल्या 
प्रत्येक  खिंडारीला

तू मारत जा 
एका एका बिनीच्या शिलेदाराला 
तोंडावर काळे बुरखे घालून 
मी वावरत जाईन 
असाच निधड्या छातीने 
तुझ्या कुजक्या परंपरेला तोडण्यासाठी 

रावतभाटा, राजस्थान.

ठिणगी

ए.सी.चे तिकीट न मिळाल्यामुळे मृदुलाला साधे स्लीपरचेच तिकीट काढावे लागले होते. रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी घरी जाऊन सगळे आवरायचे आणि पुन्हा ऑफिस गाठायचे. ए.सी.चे तिकीट मिळाले असते तर एवढा शीण नसता जाणवला. तरीपण ट्रेनमध्ये बसल्यावर तिला जरा निवांत वाटले. दोन दिवस सारखी लोकांची, पाहुण्यांची ये-जा. आईला बरे नव्हते म्हणून दोन दिवस ती आईला भेटायला आली होती. आजच सकाळी आईला डिस्चार्ज मिळाला म्हणून तिला निघता आले. आईला काही दिवस तरी मुंबईला आपल्याकडे घेऊन यायची तिची खूप इच्छा होती, पण आपले मुंबईचे एकंदरीत आयुष्य बघता ती गोष्ट किती अशक्य आहे हेही तिला कळत होते.

पुढे वाचा

संवैधानिक, सांस्कृतिक राष्ट्रीयत्व आणि भारताची अखंडता

काही दिवसांपूर्वी एका प्रमुख राजकीय पक्षाच्या शीर्षस्थ नेत्याने भारताच्या ‘राष्ट्र’ म्हणून अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ या घोषणा काही भारतीय विद्यापीठात पूर्वीही दिल्या गेल्या आहेत. तारुण्यसुलभ बंडखोरीतून केलेली बालिश बडबड समजून विद्यार्थ्यांच्या घोषणांकडे दुर्लक्ष करणे शक्य असते. पण प्रस्तुत वक्तव्य ज्या नेत्याने केले आहे, त्याच्या पक्षाने भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व केले होते आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्र-उभारणीतही मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याच्या वक्तव्याकडे तितक्या सहज दुर्लक्ष करणे योग्य ठरत नाही. 

भारताचे तुकडे करण्यात परकीय शक्तींचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात.

पुढे वाचा