न्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा…! (एक संक्षिप्त आकलन)

पृथ्वीवरील मानवेतिहासातील आजवरचा सर्वांत भयानक व खतरनाक असा कोरोना व्हायरस नुकताच येऊन गेला आणि तो अजूनही आपले अस्तित्व अधूनमधून दाखवतच असतो. या कोरोना व्हायरसने जगातील असंख्य मानवदेह नष्ट केले असून अजूनही त्याचा हा प्रचंड प्रकोप त्याने पूर्णरूपेण थांबवलेला नाही. अशा या कोरोना व्हायरसपेक्षासुद्धा कितीतरी पटीने भयानक व खतरनाक असा एक व्हायरस गेल्या शतकापासूनच मानवेतिहासात आपले अस्तित्व नोंदवून हळूहळू हातपाय पसरू लागला आहे. एवढेच नव्हे तर तो व्हायरस रोजच्यारोज आणखीन अपायकारक होत जात आहे. दुर्दैवाने बहुतांश मानवजातीला याची अजूनही पुरेपूर जाणीव झाल्याचे दिसून येत नाही.

पुढे वाचा

सार्वकालिकता – एक विचार

सार्वकालिकता अर्थात शाश्वतता ही मानवी जीवनाची एक जमेची बाजू आहे. पण ही जमेची बाजू नेहमीच योग्य असते असे नव्हे. सार्वकालिकतेचा स्पष्ट अर्थ ‘कालसुसंगत’ असा व्यवहारात असता तर सार्वकालिकता या शब्दालाच योग्य अर्थ प्राप्त झाला असता. पण सार्वकालिकता या शब्दाचा बहुतांशी वेळा समाज व्यवहारात अर्थ घेतला जातो तो ‘पारंपरिक’ या अर्थाने. इथे मोठा घोटाळा होतो. कारण परंपरागत चालत आलेली कोणतीही गोष्ट जणू पवित्रच असते आणि त्याच्यामध्ये कदापि बदल करू नये असे समाजमन अर्थात बहुतांशी लोकांचे सांगणे असते. सार्वकालिक या शब्दाला जेव्हा परंपरागत या शब्दाचा अर्थ प्राप्त होतो तेव्हा समाजात अनेक प्रश्न, वाद तयार होतात.

पुढे वाचा

ओॲसीस

मूळं वाळवंटातही रोखून धरतात ओलावा
जीवघेणं ऊन सोसूनही
टिकवून ठेवतात अस्तित्व
मातीशी घट्ट नातं जोडून
शोधू पाहतात ओॲसीस

विस्तारणाऱ्या मुळांना माती नाही अडवत
दोघेही असतात गुंतलेले

आभाळही नाही थांबवत वाढणाऱ्या फांद्यांना
सारं घडतं आपल्याच अवतीभवती
तरी माणसाची नजर खुंटलेलीच…!

जि. वाशिम
मो. 7875173828

कलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व

वकिलीचे शिक्षण घेताना मला प्रकर्षाने असे जाणवायचे की, समोर आलेल्या पुराव्यावरून निकाल तर दिला जातो. पण तो न्याय्य असतोच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. ‘कुसुम मनोहर लेले’सारखी नाटके आपल्या समाजातील स्थितीला दर्शवतात. वास्तवातही कुसुमला न्याय मिळाला नाहीच. नाटकात शेवट गोड करता येतो पण समाजात केवळ ठोस पुराव्याअभावी कितीतरी अपराधी आपल्या आजूबाजूला दिसत असतात. किंवा निरपराध लोक कायद्याच्या चकाट्यात अडकलेले दिसतात. कायदा आहे, तशा त्याला पळवाटाही आहेत आणि सद्य:स्थितीत या पळवाटा अधिराज्य करताना दिसतात. समाजात एखादा गुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी एक प्रकारची भीती बसावी या उद्देशाने शिक्षेचे स्वरूप ठरवलेले असते.

पुढे वाचा

मराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच

लेखक – डॉ. विवेक घोटाळे

मराठा वर्चस्व किती खरे किती आभासी
जात, राजकारण आणि अर्थकारण हा आधुनिक सामाजिक शास्त्रीय संसोधनाचा केंद्रबिंदू नसला तरी महत्त्वपूर्ण बिंदू आहे. मराठा वर्चस्व आणि महाराष्ट्रीय कॉंग्रेस व्यवस्थावर्चस्व या दोन संकल्पना एकध्वनी वाटाव्या अशी परिस्थिती महाराष्ट्रात एकेकाळी होती. आजमितीला कॉंग्रेस व्यवस्थेचे मराठाधारित आर्थिक वर्चस्वाचे प्रतिमान राजकीय सत्तेच्या केंद्रस्थानी नसले तरी राजकीय सत्ताव्यवहाराच्या चौकटीचा तो एक कोन आहे ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाचे संशोधक व पुण्यातील युनिक फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक घोटाळे यांचे ‘मराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच’ हे चिकित्सक पुस्तक प्रकाशित झाले आहे.

पुढे वाचा

देख तेरे संसार की हालत…

‘धर्मापेक्षा मोठे कोणी नाही, मग कोणाच्या जिवाला धोका असला किंवा एखाद्याचा जीव गेला तरी चालेल’ अश्या वृत्तीवर प्रहार करणारा ‘भोंगा’ चित्रपट नुकताच पाहण्यात आला. Hypoxic Ischemic Encephalopathy या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्याची प्रकृती दिवसभरातून पाच वेळा होणाऱ्या मशिदीतील अजानच्या आवाजाने अधिक खालावते. त्या भोंग्याच्या आवाजाचा परिणाम मुलाच्या मेंदूवर आणि मनावर होत असून, “तुम्ही एकतर घर बदला किंवा त्या भोंग्याचा आवाजतरी कमी करा”, असा सल्ला डॉक्टर देतात. सोबत उपचार सुरूच असतात. घर बदलणे शक्य नसल्याने कुटुंबीय, गावातील सुजाण नागरिक भोंग्याचा आवाज कमी करण्यासाठी संबंधितांकडे विनवणी करतात.

पुढे वाचा

आवाहन

स्नेह

अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाचा गर्भपातावर बंदी घालण्याचा निर्णय असो की बिल्किस बानो प्रकरणातून गुन्हेगारांना शिक्षेत मिळालेली माफी आणि बाहेर आल्यावर त्यांचे झालेले स्वागत असो, सामाजिक व्यवहारांमध्ये न्याय, अन्याय, नीति यांची संगती समजून घेणे गरजेचे झाले आहे.

नीतिनियम आपल्याला वाईटापासून परावृत्त करतात. तर न्याय किंवा कायदे वाईटासाठी शिक्षा देतात. पण शिक्षा भोगल्यावर माणूस खरोखर अन्तर्मुख होतो का? शिक्षांमुळे गुन्ह्यांच्या संख्येत फरक पडतो का? प्रत्यक्षात खरोखर ‘न्याय’ दिला किंवा केला जाऊ शकतो का? की न्याय म्हणून आकारलेल्या नुकसानभरपाईला किंवा ‘जशास तसे’ अश्या प्रकारच्या शिक्षेलाच न्याय म्हणायचे?

पुढे वाचा

मनोगत

इतिहासाकडे व्यक्तिनिष्ठ दृष्टीतून न बघता वस्तुनिष्ठ/सत्यनिष्ठ दृष्टीतून बघता यायला हवे. तसेच मुळात इतिहासाविषयीचा स्वीकार आला तरच बदलत्या सामाजिक मापदंडानुसार जे वाईट ते टाळण्याकडे आपोआपच आपला कल जाईल. यादृष्टीने ‘आजचा सुधारक’च्या जुलै अंकासाठी काही साहित्य यावे असे आवाहन आम्ही केले होते. या अंकातील लेखांमधून याविषयीचे विविध विचार वाचकांसमोर आम्हाला मांडता आले आहेत. या लेखांवर आणिक चर्चा व्हावी आणि यानिमित्ताने अनेक विवेकी विचारधारा सातत्याने समोर याव्या यासाठी सुधारक प्रयत्नरत आहेच. 

लेखांवरील संक्षिप्त प्रतिसाद वाचकांकडून वेळोवेळी येतातच. परंतु लेखाच्या प्रतिसादात अधिक विस्तृत आणि प्रतिवाद करणारे काही लेख आले तर विचारांची देवाणघेवाण अधिक प्रभावी होईल.

पुढे वाचा

5G वायरलेस तंत्रज्ञान – दुष्परिणाम आणि उपाय – भाग ४

भारतात फायबरायझेशनची अंमलबजावणी : निरीक्षणे – निष्कर्ष – मागण्या

१) संपूर्ण देशात प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत आणि ग्रामपंचायतीच्या प्रत्येक घरापर्यंत सरकारने फायबर ऑप्टिक केबलचे जाळे पसरविणे गरजेचे आहे. त्यावर नियंत्रण आणि मालकी हक्क हा सरकारचाच पर्यायाने जनतेचाच असला पाहिजे. त्याची देखभाल करण्यासाठी खाजगी कंपन्यांची नेमणूक करण्यास हरकत नाही. [१]

सरकारने इंटरनेट, ब्रॉडबॅंड यांविषयक सेवा वाजवी दरात जनतेस उपलब्ध करून द्याव्यात. या फायबर ऑप्टिक केबलच्या सेवेची दैनंदिन देखभाल खाजगी कंपन्यांनी करावी. परंतु त्यावर आर्थिक व्यवहारासंबंधीचे नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांचेच असले पाहिजे. 

फायबरायझेशनसंबंधी एक पथ्य कायम लक्षात घेतले पाहिजे.

पुढे वाचा

5G वायरलेस तंत्रज्ञान – दुष्परिणाम आणि उपाय – भाग ३

भारतातील फायबर ऑप्टिक केबलचे जाळे : उद्दिष्ट आणि वस्तुस्थिती

जगाच्या तुलनेत भारत – युनायटेड अरब एमिरेट्स येथे ९५.७% घरांपर्यंत फायबर ऑप्टिक केबल पोहोचलेली आहे![१] त्यानंतर इतर देश आहेत. जसे, कतार ९४.५%, सिंगापूर ९२%, चीन ७७.९%, दक्षिण कोरिया ७६%, हॉंगकॉंग ७३.७%, जपान ७०.२% घरांपर्यंत, इमारतींपर्यंत फायबर ऑप्टिक केबल पोहोचलेली आहे. हे सर्व आशियाई देश आहेत हे विशेष! या यादीमध्ये अमेरिकेचा ४१ वा क्रमांक लागतो. तर भारताचा १३४ वा क्रमांक लागतो.[२] 

ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) जुलै २०२१ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात,[३]
अ) वायरलेस मोबाईल सेवेचे ग्राहक ११७.६८ कोटी आहेत.

पुढे वाचा