गांधीजींची माझी पहिली आठवण ३० जानेवारीची आहे. वर्ष १९८८. मी शाळेत होतो. प्राथमिक चौथीचा वर्ग. आईनं शाळेत जाण्यापूर्वी सांगितलं, “आज हुतात्मा दिन आहे. सकाळी अकरा वाजता भोंगा वाजेल. रस्त्यावर, जिथे कुठे असशील तिथे तसाच उभा राहा.” “कशासाठी?” मी विचारलं. “गांधीजींची स्मृती म्हणून,” तिनं सांगितलं. अकरा वाजता भोंगा वाजला. मी होतो तिथे रस्त्यात उभा राहिलो. ही गांधीजींची पहिली आठवण. गांधीजी यानंतर लवकर भेटले नाहीत. आता तीस जानेवारीला अकरा वाजता भोंगा वाजतो का? माहीत नाही. बऱ्याच वर्षांत ऐकला नाही. गांधीजी नाहीत. आईही नाही.
नीतीचे मूळ
नीतीचे मूळ हे कुठल्याही गृहीतकाशिवाय सिद्ध करता येते असे माझे मत आहे. हा अर्थात तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा विषय. पूर्वी यास ईश्वरी वा पारलौकिक गृहीतकांचा आधार लागतो असे कित्येकांना वाटायचे. पण हळूहळू तसा आधार न घेता नीतिनियमांची मांडणी करता येणे कसे शक्य आहे यावर विचार सुरू झाला. यावर ‘आजचा सुधारका’त अतिशय उत्तम लेखमाला प्रकाशित झाली होती. https://www.sudharak.in/2003/03/3320/
प्रत्येक जीवित प्राण्याला काही तरी स्वाभाविक प्रवृत्ती असतात. स्वतःचे संरक्षण करणे ही एक मूलभूत प्रवृत्ती! यात खाणे, तहान भागवणे, संरक्षित ठिकाणी राहणे इत्यादि प्रवृत्ती अंतर्भूत आहेत.
मनोगत – आपले नंदाकाका
अनंत यशवंत उर्फ नंदा खरे उर्फ नंदाकाका ह्यांचे, दि. 22 जुलै 2022 ला, दीर्घ आजारानंतर, पुण्यात निधन झाले.
मुळात स्थापत्यअभियंता असलेले नंदाकाका, सुरुवातीला ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात, आणि नंतर अनेक वर्षे ‘सुधारक’चे संपादक होते.
ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा चौफेर वावर होता. इतिहासापासून जीवशास्त्रापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून भूगर्भशास्त्रापर्यंत सर्वच विषयांत त्यांना रस आणि गती होती. त्यांनी जशी विविध विषयांवर पुस्तके लिहिली तशीच अनेक महत्त्वाची पुस्तके भाषांतरित करून मराठीत आणली. अनेकजणांना त्यांनी लिहिते केले. आणि स्वतः त्यांचेही लिखाण आयुष्याच्या अगदी अखेरपर्यंत अव्याहत सुरू होते.
नंदाकाकांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर अगदी ‘सुधारक’चे संपादक असतानादेखील ते एक ठेकेदार माणूसच होते.
नीतिविचार
आधुनिकपूर्व काळातील नीतीचे स्वरूप
सामान्य बोलचालीत (Common Parlance) नीती म्हणजे ढोबळमानाने व्यक्तीच्या समाजव्यवहारातील वर्तणुकीचे नियम किंवा धारणा (Social Judgements) होय. त्या त्या संस्कृतीमध्ये वर्तणुकीचे ठराविक संकेत असतात. त्यांना त्या त्या समाजाची केवळ मान्यताच असते असे नाही; तर तसे वागण्यासाठी व्यक्तीला प्रोत्साहन दिले जाते, आणि न वागण्याबद्दल तिच्या वाट्याला निंदा येते. या संकेतांचा उगम रूढी, परंपरा, प्रथा किंवा धर्म यांत असतो. हे सामाजिक संकेत काळानुसार, तसेच संस्कृतीनुसार बदलत असतात. यालाच तत्कालीन नीती म्हटले जाते.
आदिम काळात माणूस सर्वार्थाने स्वतंत्र होता. श्रेष्ठ-कनिष्ठतेचे कोणतेही मानवनिर्मित निकष असण्याचा तो काळ नसावा.
नीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत?
‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी केलेल्या आवाहनात नीतिविषयक मुख्यत्वे तीन विधाने केली आहेत:
१. विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोक हा विषय विज्ञानात बसत नाही म्हणून वैयक्तिक किंवा फारतर कौटुंबिक स्वार्थ साधणे एवढ्या मर्यादित निकषावर नीती-अनीतीचा निर्णय करू बघतात.
२. बहुतांश लोकांचा धार्मिकता किंवा विशिष्ट विचारधारेशी संलग्नता म्हणजेच नैतिकता असा समज झालेला/करून दिला गेलेला आहे.
३. काही लोक वाहतुकीचे नियम पाळण्याइतपत नैतिकतेला महत्त्व देतात.
वरील तिन्ही विधाने एका मर्यादेपर्यंत स्वतंत्रपणे खरी आहेत. पण सीमारेषेवर त्या कल्पना एकमेकींत मिसळतात. त्यामुळे काही प्रसंगी ‘सीमासंघर्ष’ही होताना दिसतो.
न्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य
या लेखाला मुख्य संदर्भ भारतातील गेल्या दशकातील घडामोडींचा आहे. साधारणपणे याच विषयावर एक लेख मी २०२२ जानेवारीच्या ‘आजच्या सुधारक’मध्ये लिहिला होता. त्या लेखात सांगितल्यानुसार न्याय ही सारभूत संकल्पना आहे; तर नीती ही न्यायाच्या दिशेने जाऊ पहाणारी नियमबद्ध प्रक्रिया. न्याय सापेक्ष (relative) असतो आणि त्याच कारणाने न्यायाची प्रक्रिया (नीती) सुद्धा सापेक्ष असते. याचा अर्थ न्याय-अन्याय या संकल्पना निरर्थक आहेत असे नव्हे. त्यामध्ये अधिक अन्याय्य आणि कमी अन्याय्य (किंवा कमी न्याय्य आणि अधिक न्याय्य) असा तरतमभाव करता येतो. हा तरतमभाव वापरून जेव्हा न्यायिक प्रक्रिया एका विशिष्ट संदर्भात पूर्त (पूर्ण) होते तेव्हा आपण न्याय झाला असे म्हणतो.
न्यायाच्या दाराशी
एक रस्ता.. आणि त्या रस्त्यावरून एक चिमणी उडत आली.. तिला माहीत आहे की हा रस्ता न्यायाचा रस्ता आहे.. तिने खूप ऐकले होते या रस्त्याबाबत, खूप अवघड वाटचाल असते म्हणे त्याची. आज मनाचा हिय्या करून चिमणी निघाली त्या रस्त्यावर..
पण हे काय? थोडेच अंतर कापून झाले, रस्ता सरळसरळ आलेला. मात्र आता समोर वळण दिसत आहे आणि नेमके त्याच ठिकाणी एक चेक पोस्ट.. एक रखवालदार कावळा तिथं बॅरिकेड्स लावून आणि हातात काठी घेऊन बसलेला. काळा कोट घातलेला, धारदार चोच असलेला कावळा..
चिमणी उडत बागडत बॅरिकेड्स जवळ येते..
मनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध
मूळ लेखक : एड्रिजा रॉयचौधरी
वैवाहिक जोडीदार ठरविण्याची विवाहव्यवस्था जातीची शुद्धता टिकवून ठेवण्याच्या कल्पनेमधून आली आहे, याबद्दल अनेक समाजशास्त्रज्ञ सहमत आहेत. त्याचवेळी ठरवून केलेल्या विवाहाची संकल्पनासुद्धा राजकीय आणि आर्थिक गरजांमध्ये खोलवर रुजलेली होती.
(भारतीय विवाहाची संकल्पना, विशेषतः ठरवून केलेल्या लग्नाची संकल्पना, ही पश्चिमेकडील देशांमधील लोकांसाठी खूपच आकर्षणाची बाब आहे.)
काही वर्षांपूर्वी मी अमेरिकेत एक तरुण विद्यार्थी म्हणून राहत असताना भारतातील एकमेवाद्वितीय सामाजिक-सांस्कृतिक आचरणपद्धतीने वा परंपरांनी भुललेल्या जिज्ञासू परकियांना वारंवार भेटायचो. सर्वसामान्य अमेरिकन व्यक्तीला भारतीय आहार ते चित्रपट आणि कुटुंब अशा अनेक भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक परिदृश्यांबद्दल प्रचंड मोठे आकर्षण आहे.
न्यायासाठी संवाद आवश्यक
काही दिवसांपूर्वी क्षमावाणी दिवस होता. दरवर्षी या दिवशी जैन लोक त्यांनी कळत नकळत केलेल्या दुष्कृत्यांबद्दल क्षमायाचना करतात. कॉलेजच्या वेळेच्या मित्रमैत्रिणींच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर त्यादिवशी क्षमायाचनेचा असा एक संदेश एका जैन मैत्रिणीकडून आला. आम्ही सर्व गेल्या काही दशकांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. यातील बहुतांश भारतात आहेत. अधूनमधून थट्टामस्करी, सठी-सहामाशी भेटीगाठी होत असतात. तो संदेश दिसल्यावर अनेक लोकांचे जोडलेल्या हातांचे ईमोजी आले. एकाने मिच्छामी दुक्क्डम हा त्या दिवसाशी संबंधित प्राकृत वाक्यांश लिहिला. मी लिहिले ‘यु आर फरगिव्हन’. आता मागितली कोणी क्षमा तर आपणही करावं ना मन मोठं.
विवाहबाह्य संबंध
सर्वांत प्रसिद्ध असं उच्चवर्गीयातलं विवाहबाह्य प्रेमप्रकरण होतं, अमिताभ व रेखा यांचं. पण अखेरीस त्यांनाही थांबावं लागलंच … कुटुंबासाठी, समाजासाठी.
नियम कितीही केले तरी माणूस हा चुकतमाकतच जगत असतो. मोहमाया त्याला जाळ्यात ओढायचं काम करत असते. त्यात तो नकळतही सापडू शकतो.
आवडता पदार्थ नाही का जरा जास्तच खाल्ला जातो आणि मग अपचनावरचं औषध घ्यावं लागतं. तसं कधीतरी एखादी परस्त्री किंवा परपुरुष आवडतो. योगायोगाने तिकडून सिग्नल मिळालाच तर सुरू होतो भेटीगाठींचा सिलसिला. संबंध पुढे जातात, वाढतात, प्रेमाची पूर्तता होते.
ती झाली तरी चोरटेपणाचे अपराधगंड निर्माण होऊ शकतात.