कॉम टॉईबिन या आयरिश लेखकाची थॉमस मान याच्या चरित्राचा व वाङ्मयाचा वेध घेणारी ‘द मॅजिशियन’ ही कादंबरी नुकतीच वाचली. नोबेल पारितोषिक विजेत्या थॉमस मान या जर्मन लेखकाने लिहिलेले काहीही मी वाचलेले नाही तरीही ही कादंबरी मला अतिशय आवडली हे विशेष. मला ते ललित-चरित्र आहे असे म्हणावेसे वाटते. एका बहुप्रसवू लेखकाने कल्पनेच्या, अभ्यासाच्या आणि उपलब्ध सर्व साहित्याच्या साहाय्याने दुसऱ्या लेखकाच्या अंतरंगात शिरून ते वाचकांना उलगडून दाखवावे असा अनुभव देणारे हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे.
मान जर्मनीमध्ये जन्मला. वडील श्रीमंत व्यापारी आणि सिनेटर.