स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दोन दशकांपर्यंत भारतातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहत होती. शेतीव्यवस्था, गावगाडा बऱ्यापैकी चालला होता. मोठी शहरेसुद्धा शांत आणि लोकसंख्या मर्यादित असल्याने राहायला सुखाची होती. सोईसुविधा होत्या तेवढ्या पुरेशा होत्या. बरीचशी अर्थव्यवस्था भोवतालच्या परिसरावर अवलंबून होती. लोकांच्या गरजा मर्यादित होत्या, धनलालसा आजच्याएवढी वाढली नव्हती तेव्हा ग्रामीण भागातली कुटुंबव्यवस्था स्थिर होती, कुटुंबातला एखादा मुलगा फारच हुशार असला तर शिकायला शहरापर्यंत पोचत होता. अन्यथा गावातले शिक्षण दैनंदिन व्यवहार पार पाडायला पुरेसे होते.
७० च्या दशकानंतर कारखानदारी वाढू लागली. त्यांना कुशल कामगारांची गरज भासू लागली.