कोणाचेहि वास्तविक दोष काढून दाखविणे म्हटले म्हणजे मोठे कठीण काम होय. जरी आपण त्यांचे हित इच्छून प्रीतीने उपेदश केला तरी तो त्यांस कडू लागेलच. तथापि परस्परांस सन्मार्गास लावण्यास प्रयत्न करीतच असावें; हा आपला धर्म आहे, असें जाणून कोणाची भीड न धरितां आपलें काम बजवावें. या मुंबईत गुजराथी लोकांचे गुरु जांस साधारण शब्दकरून महाराज असी संज्ञा आहे, त्यांचे महात्म फार वाढले आहे. युरोप खंडांत रोमन क्याथोलीक पंथाचा मुख्य गुरु जो पोप त्याचप्रमाणे एथें चारपांच पोप आहेत. यांचा लोकांचे मन, बुद्धी, विचार, आत्मा यांवर इतका अधिकार आहे, की ते सर्वस्वी त्यांचे दासानुदास किंकर होऊन बसले आहेत.
इमान
पाकिस्तानात १९५३ साली अहमदिया पंथाविरुद्ध धर्मवादी गटाने आंदोलन केले. या आंदोलनाचे पर्यवसान लाहोर येथे अहमदियाविरोधी क्रूर दंगली होण्यात झाले. या दंगलींची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने न्या.मू. महंमद मुनीर आणि न्या.मू. कयानी यांची नियुक्ती केली. पाकिस्तानातील धार्मिक नेत्यांना श्री. मुनीर यांनी भारतीय मुसलमानांसंबंधी एक प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर भारतीय मुसलमानांनी कसे वागावे ? सर्वांनी भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या हिताच्या विरुद्ध वागता कामा नये असे उत्तर दिलेले आहे. मौ. मौदुदी म्हणाले, भारतीय मुसलमानांनी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या विरुद्ध वर्तन करता कामा नये. त्यांची निष्ठा पाकिस्तानलाच असली पाहिजे.
पत्रचर्चा
कार्यकारणभाव
श्री देवीदास तुळजापूरकर (आसु जून २००७) यांनी दाखवून दिले आहे की कर्ज-ठेवी प्रमाण मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण या भागात ५७ ते ६४% आहे. ते असेही दाखवून देतात की महानगरे व शहरे यांत शाखा व कर्जे केंद्रित होत आहेत. असे होण्याच्या कारणांची चिकित्सा न करता त्यांनी हेत्वारोप व दोषारोप केले आहेत. उदा. वित्तव्यवस्था गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या जीवनाला स्पर्श करीत नाही ही अत्यंत क्रूर चेष्टा आहे, नवीन आर्थिक धोरणामुळे १९९१ ९२ सालानंतर ही ‘विकृती’ अधिकच वाढली आहे, हा जागतिक व्यूहरचनेचा भाग आहे काय ?
संपादकीय
प्रिय वाचक
पुनश्च हरि:ओम्
हे टिळकांनी म्हणणे ठीक आहे, पण सुधारकाला ही शब्दावली घेण्याचा अधिकार आहे का, असा विचार क्षणभर मनात चमकून गेला. सुधारकाला ‘श्री’वरही हक्क नाही असे बऱ्याच मंडळींना वाटते. ते पत्राच्या अग्रभागी ‘श्री’कार घालत नाहीत. पण लिखाणात ‘अथश्री’, ‘इतिश्री’चा प्रयोग वा मानत नसतील अशी आशा आहे.
‘भाषा बहता नीर है’ हा मुखपृष्ठावरचा विचार कसा वाटतो?
श्री. नंदा खरे ह्यांना काही एका अत्यावश्यक कामासाठी निदान वर्षभर सुटी हवी आहे त्यामुळे मला पुनश्च हरि:ओम् म्हणावे लागले आहे.
संपादकाच्या व्यक्तित्वातले उणेअधिक नियतकालिक उतरणे स्वाभाविक आहे.
ठिकऱ्याः एक प्रतिक्रिया
[लेखक भारतीय राजस्व सेवा (खठड)च्या १९९४ च्या बॅचचा अधिकारी आहे आणि सध्या धारवाड, कर्नाटक येथे Joint Commission of Incom Tax म्हणून काम करतो.]
आ.सु.च्या फेब्रुवारी २००७ च्या अंकातील “ठिकऱ्याः बदलती जातिव्यवस्था’ या नावाचा सत्यजित भटकळ आणि नॅन्सी फर्नाडिस यांच्या पुस्तकाचा सुलभीकृत संक्षेप वाचला. जातिव्यवस्थेबद्दल मुळातून आणि सविस्तर चर्चा त्यात आढळली. लेखावर प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:
१.एकंदर मांडणी; जातिव्यवस्था हा least count गृहीत धरून केलेली दिसते. त्यामुळे अनेक दुखण्यांचे मूळ जातिव्यवस्थेमध्ये शोधलेले दिसते. तसेच उपायही जातिव्यवस्थेभोवती फिरताना दिसतात. लेखकाचे ‘जातिव्यवस्था ही सभ्यता आहे आणि हिंदूंची शास्त्रे आणि मिथ्यकथांबद्दलच्या श्रद्धा ह्या जातिसंस्थेचा परिणाम आहेत’ हे विधानही न पटणारे आहे.
पुस्तक परीक्षण – कोऽहम्
कादंबऱ्या सामाजिक असतात. ऐतिहासिक-राजकीय पौराणिक अशा विषयांवरून त्यांचे आणखीही प्रकार करता येतात. ह्या कादंबऱ्या कथानकाच्या बळावर लोकप्रिय होतात. लेखकाचे निवेदनकौशल्य, कथावस्तूतील नाट्य, चित्रित झालेले जीवनदर्शन वाचकाला मनोहारी वाटते. परंतु वामन मल्हार जोश्यांची रागिणी ह्या सर्वांपेक्षा वेगळ्या कारणाने आपल्या लक्षात राहिलेली असते. तिच्यातील तत्त्वचर्चा वाचकाला विविध विचारव्यूहांमधून फिरवीत राहते. रागिणी, सुशीलेचा देव ह्या कादंबऱ्या तुम्हाला नुसती कथा सांगत नाहीत, विचारात गुरफटत नेतात अन् शेवटी अशा बिंदूवर आणून सोडतात की तुम्हीच तुमचा निर्णय घ्यायला मोकळे असता.
सुरेश द्वादशीवारांची कोऽहम् ही लघुकादंबरी तशी आहे.
पुस्तक परीक्षण: ‘विवेकीजनी ह्या मज जागवीलें’
प्रा. प्र.ब. कुळकर्णी यांचा नुकताच प्रकाशित झालेला हा लेखसंग्रह वाचनात आला. ह्यातील बरेचसे लेख यापूर्वी ‘आजचा सुधारक’ या मासिकातून अधूनमधून प्रसिद्ध झालेले आहेत. प्रस्तुत पुस्तकात ते एकत्र संग्रहीत झाले आहेत. माझे वाचन तसेही सीमित. विशेषतः धार्मिक ऐतिहासिक अशा विषयांशी संबंधित असणारे! त्यामुळे समाजसुधारणा, स्त्री-समस्या, सुधारकाचे चरित्रग्रंथ, तसेच मानवी भवितव्यतेवर भाष्य करणारे ग्रंथ ह्यांविषयी काहीशी अनास्थामूलक उदासीनता असल्यामुळे कित्येक तत्त्वचिंतक मला अपरिचित राहून जातात. आगरकरांसारखे मोजके समाजसुधारक अपवाद म्हणून वगळता कित्येकांची नावे, कर्तृत्व, उपलब्धी, यांविषयी परिचय नसतो. माझ्यासारख्या सामान्य वाचकाला परिवर्तनवादी साहित्यक्षेत्रातील अज्ञात असणारे विचारधन प्रा.
अरिस्टॉटलची न्यायसंकल्पनाः [अरिस्टॉटल (३८४-३२२ बी.सी.]
कायदा करण्याचा ज्यांना अधिकार आहे, अशा मंडळाने केलेले कायदे हे कायदेशीरच असणार आणि त्यांचा उद्देश न्याय प्रस्थापित करणे हाच असल्याने कायदा न्याय्यच असतो. समाजासाठी सुख निर्माण करणे आणि टिकविणे हे एका अर्थी ज्यांना आपण कायदेशीर किंवा न्याय्य वर्तने म्हणतो, त्यांचे कार्य आहे. शौर्याची, संयमाची, सुस्वभावी माणसांची कृत्ये आणि अन्य सद्गुणांची कृत्ये करण्यास कायदा आपणांस बाध्य करतो. म्हणून कायद्याचे पालन करणारा तो न्यायी आणि त्याचे उल्लंघन करणारा तो अन्यायी समजला पाहिजे. दुष्कृत्ये करण्यास कायदा मनाई करतो. न्याय हा नागरिकांच्या परस्परसंबंधाबाबत असतो. केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसतो.
स्त्रीवादी साहित्य काय आहे?
[मार्च २००७ मध्ये नागपूर येथे वैदर्भीय लेखिकांचे सहावे संमेलन झाले. विदर्भ साहितय संघाच्या विद्यमाने ही संमेलने होतात. अध्यक्ष/अमरावतीच्या प्राचार्य विजया डबीर ह्या होत्या. त्यांचे उद्घाटनपर भाषण, स्वल्पसंपादित सं.]
येथे मंचावर उपस्थित असलेले नागपूर विद्यापीठाचे आणि विदर्भ साहित्यसंघाचे सर्व मान्यवर, साहित्यप्रेमी लेखक आणि वाचक मित्रमैत्रिणींनो,
ह्याप्रसंगी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेत्या पाच थोर लेखकांची नावे मला आठवताहेत. कलेची बूज राखून जीवनसंमुखतेला महत्त्व देणाऱ्या कुसुमावती देशपांड्यांचे योगदान आठवते आहे. आशा बगे यांना नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे.
हल्ली वाचनसंस्कृती लयाला जात आहे असे आपण सतत म्हणत असतो; पण त्याचवेळी लेखन भरपूर वाढते आहे असेही चित्र आपल्याला दिसते.
जग खाऊन टाकणारे! जनअरण्य…
जेफ्री साक्स हे आजचे आघाडीचे अर्थतज्ज्ञ आहेत. अनेक देशांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे आणि रशियासारख्या देशांना आर्थिक संकटातून बाहेरही काढले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे ते विश्वासू मित्र. त्यांनीच ब्लेअर यांना निराळा ‘आफ्रिका निधी’ उभारायला लावला. या पैशातून गरिबी आणि अज्ञानात रेंगाळलेल्या आफ्रिकन देशांना सावरण्यासाठी मदत होते.
जेफ्री साक्स यांना यंदा बीबीसीची अतिशय प्रतिष्ठेची अशी रीथ व्याख्यानमाला गुंफण्याचा मान मिळाला. एण्ड ऑफ पॉव्हर्टी या पुस्तकामुळे साक्स जगभर परिचित आहेतच. अर्थशास्त्र हा केवळ घडणाऱ्या घटनांचा ताळा मांडण्याचा बौद्धिक खेळ नाही.