दशावतारांचे पुनरवलोकन

भारतातील बहुसंख्य लोक आपला धर्म हिंदू असल्याची कागदोपत्री नोंद करतात. हिंदू धर्माच्या काही मूलभूत मान्यता अथवा आधारभूत संकल्पना आहेत त्या म्हणजे ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व, ब्रह्मा-विष्णु-महेश व शक्ति या प्रमुख देवतांना मान्यता देणे, मोक्ष, पुनर्जन्म, दशावतार, वर्णव्यवस्था, वेद, ब्राह्मणे, पुराणे, उपनिषदे, रामायण-महाभारत (गीतेसह) हे धर्मग्रंथ, इत्यादी. ह्यांपैकी वेद फार पूर्वीपासून, आर्यांचे उत्तर भारतात आगमन झाल्यापासून, मौखिक परंपरेने अस्तित्वात आहेत. वेदांमधील आराध्यदेवता निसर्गातील विविध शक्ती होत्या. त्यात ब्रह्मा, विष्णु, महेश यांना स्थान नव्हते असे म्हटले तरी चालेल. या तीन ‘देवता’ व शक्ती ह्यांचे उल्लेख इसवी सनापूर्वी पाचव्या सहाव्या शतकानंतरच्या पुराणांमध्ये आढळतात.

पुढे वाचा

सेक्युलॅरिझमचा भारतीय तोंडवळाः भाग-१

एक राजकीय आदर्श

‘सार्वभौमता’ ह्या संकल्पनेसारखी ‘सेक्युलॅरिझम’ची एक संकल्पना म्हणून ओळख सहज पटते पण तिची व्याख्या दुष्कर आहे. समाजशास्त्राच्या व राज्यशास्त्राच्या पंडितांत बौद्धिक व्यवहारात ह्या संज्ञेचा सर्रास प्रयोग होत असला तरी ह्या संकल्पनेतला नेमका व्यवच्छेदक अंश कोणता ह्याबद्दल मतभेद आहेत. भिन्न काळी भिन्न देशांत ‘सेक्युलर’ किंवा ‘सेक्युलॅरिझम’ ह्या संज्ञा समाजशास्त्रीय आणि सांस्कृतिक आशयांनी परिप्लुत झालेल्या आहेत.
“अतीन्द्रिय आणि साक्षात्कारमूलक पूर्वगृहीतांचे ज्यांमधून निर्मूलन केलेले आहे असा स्वयंशासित ज्ञानप्रदेश म्हणजे सेक्युलॅरिझम” अशी व्याख्या करण्यात आली आहे. सामाजिक शास्त्रांच्या (Encyeclopaedia of Social Sciences) ज्ञानकोशातून घेतलेली ही व्याख्यासुद्धा वर्जनात्मक (restrictive) आहे.

पुढे वाचा

विवेकवादाला एवढे नक्कीच साधेल

धर्म ही एक सामाजिक आवश्यकता आहे असे म्हणता येईल. प्राचीन काळात धर्माने पार पाडलेली सामाजिक कार्ये म्हणजे, (१) विशिष्ट कर्मकांडांच्या निर्मितीमुळे समाज एकत्रित येणे. (२) भीती, अनिश्चितता या भावनांपासून माणसाची बऱ्या प्रमाणात सुटका होणे. (३) मरणाची व अज्ञाताची भीती बरीचशी कमी होणे. (४) मानवी जीवनात देवाचे साह्य मिळण्याची आशा निर्माण होणे. त्यामुळे माणसाची वैफल्यग्रस्तता कमी झाली व त्याला संकटकाळात आधार प्राप्त झाला. पुढे धर्मात नवनवीन कल्पनांची भर पडत गेली. काही संकल्पना मागे पडल्या. धर्माचे स्वरूपही बदलत गेले. या बदलत्या धर्माचा आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल.

पुढे वाचा

अभ्यासेनिं प्रकटावें

पत्रसंवाद वाढत आहे. केशवराव जोशींची बोधक पत्रे आणि त्यांच्या निवासाचे ‘तत्त्वबोध’ हे नाव यातून ‘बोध’ उचलून तो या अंकी पत्रचर्चेतील पत्रांना जोडला आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः, म्हणतात तो होवो!!
आजचा सुधारकचे वाचक कोण हा एक अशांत प्रश्न! हे खरे की जे वाचतात ते वाचक. पण त्यांनी लिहिल्याशिवाय हे कोण ते कळत नाही. आजकाल पत्रलेखनाचा आणि लेखनकलेचा काळजी करण्याइतका संकोच होत आहे. आता सुकर्ण (रोलळश्रश) आले आहेत. आधी पत्र लिहा, मग उत्तराची वाट पाहा ह्या अभिक्रमांना उल्हास लागतो, चिकाटी लागते. त्याला फाटा देऊन वाचक सरळ संवाद साधतात.

पुढे वाचा

लेखकाचा अंगरखा

समाजसुधारक गोपाळराव आगरकर यांच्याकडे विद्यार्थिदशेत एकच सदरा असल्याने रोज रात्री धुऊन वाळत घालीत व दिवसा पेहरत. ही कथा अनेकांनी ऐकली असेल. अमेरिकन साहित्यिक एडगर अॅलन पो (ज्याने आधुनिक रहस्यकथा लेखनाचा पायंडा पाडला) आणि नॅथानियल हॉथॉर्न हे दोघे एकत्र राहत. दोघेही साहित्याच्या मस्तीत धुंद, परंतु खायला चण्या-कुरमुऱ्यांचेही वांधे. त्यांच्या साहित्यावर लुब्ध होऊन एका धनिक स्त्रीने त्यांना पार्टीचे निमंत्रण दिले. दोघे मिळून एकच कोट बाहेर जाताना आळीपाळीने वापरीत. आता आली का पंचाईत ? पो ने बाईसाहेबांना विचारले, ‘बाईसाहेब, आम्ही बरोबर न येता, एकानंतर दुसरा असं आलेलं चालेल का?’

पुढे वाचा

सार्वजनिक सत्य 

ज्योतिबा फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्य’ नावाचा सुंदर विचार सांगितला आहे. देवाची आराधना करून एका माणसाने मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्याला अर्थ नाही. त्यातून देवाचेही मोठेपण सिद्ध होत नाही आणि त्या माणसाचेही नाही. परंतु जेव्हा सार्वजनिक सुखासाठी प्रयत्न होतो त्या वेळीच त्या आराधनेला किंमत असते, गावची जत्रा जशी साऱ्या गावाला सुख देऊन जाते त्याचप्रमाणे गावची विहीर सर्वांना पाणी देऊन गेली पाहिजे. एका माणसाला उत्तम वैद्यकीय मदतीची सोय असावी, पैशाच्या बळावर त्याला धन्वंतरी विकत घेता यावा आणि उरल्या गावाने औषधावाचून तडफडावे ही लोकशाहीची रीत नाही.

पुढे वाचा

प्रासंगिक —रिझवानुरचे रहस्य 

ही कलकत्त्याची गोष्ट आहे. पण ती मुंबईची असू शकते. हैद्राबादची असू शकते किंवा दिल्लीची देखील असू शकली असती. ही एका प्रेमविवाहाची आणि त्याच्या दुःखान्ताची कहाणी आहे. कलकत्त्याच्या प्रियंका तोडी नावाच्या तरुणीने रिझवानुर्रहमान ह्या मुस्लिम तरुणाशी लग्न केले. सिव्हिल मॅरेज केले. आपापले धर्म कायम राखून हे लग्न करता येते. लग्नातून घटस्फोट मिळविणेही सोपे आहे. रिझवान कॉम्प्युटर विद्येतील ग्राफिक डिझाइनर होता. मध्यमवर्गीय कुटुंबातला जबाबदारी उचलणारा तरुण प्रियंकाचे वडील उद्योगपती अशोक तोडी. ‘यह अंदर की बात है’ अशा व्यंजक शब्दांनी ज्यांची जाहिरात केली जाते अशा स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांची निर्मिती करणारा तो एक कारखानदार, सालिना दोनशे कोटींची आय असणारा.

पुढे वाचा

क्रिकेट 

मूलभूत शारीरिक क्षमतांचा विकास करण्यासाठी जो खेळ खेळला जातो त्या खेळास फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मान्यता मिळते. ह्या खेळातून (1) शारीरिक क्षमतांचे दमसास, (2) स्नायूंचा दमदारपणा (3) वेग (3) ताकद (5) चपळाई (6) सांधे चलनवलन, दीर्घ आयुष्य इ. सर्व साध्य झाले पाहिजे. कुस्ती, हुतूतू. खोखो, आट्यापाट्या, फुटबॉल, बॉस्केटबॉल, मुष्टियुद्ध इ. खेळ योग्य आहेत. क्रिकेटसारख्या मनोरंजक खेळास फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मान्यता नाही. आलिंपिकमध्ये तो खेळत नाहीत. 

परंतु आज पेप्सी, हिरोहोंडा, सहारा, सोनी अशा साम्राज्यावाद्यांच्या बाजूच्या कंपन्या क्रिकेटसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात; आणि समाजपुरुषाची शारीरिक क्षमता खऱ्या अर्थाने वाढू न देण्यास मदत करतात.

पुढे वाचा

राजकारण जातींसाठी की जात्यंतासाठी? 

आजकाल राजकारणात जातीचे महत्त्व तसेच जातीयवाद फार वाढत चालला आहे, जातिसमूहातील तडजोडीचे राजकारण वाढत चालले आहे, जातिनिर्मूलनापेक्षा जात टिकविण्याकडे व जातींचा विनाश करण्यापेक्षा त्यांचे संघटन करण्याकडे आपण वेगाने वाटचाल करू लागलो आहे, विळ्या भोपळ्याचे सख्य असलेल्या जाती राजकारणात एकत्र येऊ लागल्या आहेत, त्यावर उच्चजातीबरोबरच जुळवून घेतल्याने सत्ता मिळेल पण त्यामुळे मनुवादाला खतपाणी घातले जाईल, ब्राह्मणांसारखा उच्चवर्णीय मनुवादी जातींना शोषक व सर्व समस्यांना जन्म देणारे, समस्या टिकवून ठेवणारे समूह म्हणून विरोध करणे गरजेचे असताना सर्व स्थानांपासून हटवणे हे आद्य कर्तव्य असताना त्यांचाच सत्तेत सहभागी करून घेणे हे अत्यंत अश्लाघ्य आहे, निषेधार्ह आहे, अशा प्रतिक्रिया उत्तरप्रदेशात निवडणुका पार पडल्यावर ऐकू येऊ लागल्या आहेत.

पुढे वाचा

सुहासिनीची सत्त्वपरीक्षा 

माझी मुलगी एका सरकारी मनोरुग्णालयात समुपदेशक म्हणून नोकरीला आहे. तेथे भरती होऊन कालांतराने बऱ्या झालेल्या मध्यमवयीन स्त्रीकडून तिला कळलेली माहिती मला धक्का देणारी वाटली. 20 व्या शतकात आणि 21 व्या शतकाच्या आरंभी स्त्रियांना या कोटीचा सासुरवास सहन करावा लागत असेल तर त्याला आ. सु.ने वाचा फोडली पाहिजे आणि त्याविरुद्ध काही उपाययोजना सुचविली पाहिजे असे मला वाटते. त्या रुग्णाला आपण सोयीसाठी ‘सुहासिनी’ म्हणू. एखाद्या फुलराणीसारखी ती एका मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात जन्माला आली. घरातील मंडळी इतकी समंजस की आजी म्हणे, 

‘कन्या झाली म्हणून करू नको हेळसांड। बापाशेजारी लेकीचं पान मांड ॥” 

अशी लाडाकोडात वाढलेली ती फुलराणी.

पुढे वाचा