पत्रचर्चा

अर्थ असा नाही की या मंडळींचे विचार प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. परंतु विचारांवर बंदी नको. धर्मनिष्ठांना धार्मिक जशा भावना असतात तशाच तीव्र भावना धर्मावर विश्वास न ठेवणारांच्याही असू शकतात याची जाणीव प्रत्येक प्रगतिशील शासनाने ठेवली पाहिजे.
धर्मावर टीका केली म्हणून मारा; आम्ही अमुक अमुक बक्षीस देऊ अशा प्रकारचे काही फतवे भारतातही निघाले होते. भारतात असे फतवे काढणाऱ्यांत जसे इस्लाम धर्मातील लोक आहेत तसेच हिंदू कट्टरपंथीयही आहेत. आणि असे फतवे काढणाऱ्यांवर काही विशेष कार्यवाही झाल्याचे माझ्या तरी माहितीत नाही. जर असे फतवे काढणारांवर कार्यवाही करायची नसेल तर भारतातील न्यायालये बंद करावी व न्यायव्यवस्था मुल्ला-पंडित यांच्यावरच सोपवावी हेच बरे.

पुढे वाचा

श्रद्धा धार्मिकांचा प्लॅसिबो

श्रद्धेचा रिमोट वापरून एक बारीकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटिमीटरसुद्धा पुढे सरकता येणार नाही. पण श्रद्धा असल्यास डोंगरसुद्धा चालत येऊ शकतो असी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे काही नाट्यपूर्ण घटना घडतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिण्यामुळे अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत, असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले असतील. पार्वतीमाने पोटावर हात फिरवल्यानंतर बाईची पाळी चुकली, व पोट दिसण्याइतपत पुढे आले, असे सांगणाऱ्या शेकडो बायका महाराष्ट्र गुजरात येथे सापडतील. शेवटी पोटात मूल नव्हतेच हा भाग वेगळा.

पुढे वाचा

परग्रहावरून येणारा देव

दिवाने सर्व जीवसृष्टी निर्माण केली, ती उत्क्रांतीतून विविधतेत परिवर्तित झाली नाही, या मताला रचनावादी, क्रिटाशनिस्ट मत म्हणतात. परंपरेने ते मत ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांमध्ये दिसते, पण इतर धर्मांवर श्रद्धा असणाऱ्यांनाही ते मान्य असते.
आजकाल आपण पारंपरिक धर्मश्रद्धाळू रचनावादी नाही असे दाखवत काही जण इंटेलिजंट डिझाइनवादी नावाचे एक मत मांडतात. पृथ्वीवरील जीवसृष्टी कोण्या तरी बुद्धिमान जीवाने किंवा शुद्ध बुद्धीने योजनाबद्ध रीतीने घडवली, ती उत्क्रांतीतून घडलेली नाही, असे हे इंटेलिजंट डिझाइनवादी मत आहे. परग्रहांवरील काही जीवांनी पृथ्वीवर जीवसृष्टी पेरली असणे, या कल्पनेभोवती इं.डि.वाद्यांचा

पुढे वाचा

‘ईश्वरा’संबंधी माझे विचार

माझे विचार रूढ पद्धतीस अनुसरून नसून ते केवळ बुद्धीच्या दृष्टीचे आहेत. हा बुद्धिवादी ‘मी’ विश्वअहंकाराचा म्हणजे सत् चित् आनंदरूपी ‘ब्रह्मा’चाच एक लहानसा प्रतिसाद नव्हे काय?
ईश्वराची उत्पत्ती हे शब्द आस्तिक्यबुद्धीच्या माणसास विसंगत वाटतील; परंतु बुद्धिदृष्ट्या मानवी मनात ईश्वरासंबंधीच्या माणसास विसंगत वाटतील; परंतु बुद्धिदृष्ट्या मानवी मनात ईश्वरासंबंधीच्या कल्पना केव्हा व कशा उद्भवल्या असतील आणि त्यापुढे कसकशा परिणत होत गेल्या असतील, यांचे अनुमान ऐतिहासिकदृष्ट्या करता येण्यासारखे आहे.
मानवप्राणी या विश्वात नव्हता असाही पुष्कळ काळ गेला असेल आणि मानव नामशेष होऊनही हे विश्व अनंतकाल टिकू शकेल.

पुढे वाचा

विचार करण्यासाठी एक विचार

आजकाल लोकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना का निर्माण होत नसावी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तथाकथित विकासासोबत माणूस उत्तरोत्तर आत्मकेंद्री व स्वार्थी बनत आहे, हे आपण पाहतोच, सुखाच्या कल्पना बदलत आहेत. बुद्धिमान मध्यमवर्गीय तरुणानी विनासाची कल्पना एकदम ढूळिलरश्र आहे. आपला देश, आपल्या देशातील लोकांची प्रगती याविषयी इच्छा किंवा निज्ञासा कोणत्याही बुद्धिमान तरुणात दिसून येत नाही. व्यवस्थापन, संगणन, अशा विषयांत तज्ज्ञता प्राप्त करून एखाद्या पाश्चात्त्य देशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करून तिथेच स्थाईक होणे, हे मध्यमवर्गीय तरुणाचे स्वप्न असते. अशा परिस्थितीत सर्वसामान्य गरीब दलित, पीडित लोकांचे जीवनमान कसे उंचावणार?त्यांना

पुढे वाचा

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी……

गेल्या काही वर्षांत आपल्या देशातीलच नव्हे तर इतर अनेक देशांतील शिक्षणव्यवस्थेत अनेक स्थित्यंतरे झालेली आहेत. शिक्षणासाठी वाढीव आर्थिक तरतूद, शिक्षणव्यवस्थापनात व्यावसायिकता आणण्याचे प्रयत्न, अद्ययावत् ज्ञान मिळण्यासाठी पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तकांची फेररचना, चाचणी व परीक्षा पद्धतीत सुधारणा, विद्यार्थी व शिक्षक यांचे मूल्यमापन, खासगी संस्थाचा वाढता सहभाग, केंद्र शासन-राज्यशासन-स्थानिक स्वराज्य संस्था यांची उदासीनता, बालवाडी ते पदव्युत्तर व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा व त्यांच्या जाचक (खर्चिक!) अटी, इत्यादी प्रकारे शैक्षणिक व्यवहारात बदल सुचवले जात आहेत व केले जात आहेत. परंतु या सर्व गदारोळात एकच गोष्ट बदलली नाही : ती म्हणजे शिक्षणाचा दर्जा.

पुढे वाचा

अभ्यासः एका व्यवस्थापन-पद्धतीचा

१९६९-७० साली फिलाडेल्फिया, अमेरिका इथे मी एक वर्षाचा बांधकाम व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम केला. त्यामध्ये इंजिनीअरिंगखेरीज एक प्रमुख भाग होता तो म्हणजे माणसांकडून काम करवून घेण्याची मानसिक तंत्रे ऊर्फ अप्लाइड सायकॉलॉजी. याच मथळ्याखाली वाचनालयांमध्ये कोणी शोध घेतला तर संपूर्ण निराळी माहिती आणि लेखनसंदर्भ मिळणार, कारण मॅनेजमेंटमध्ये शिकलो तो भाग खरोखरच निराळा होता. प्रत्यक्ष बांधकाम शेवटी माणसांकडूनच करवून घ्यायचे असते. ते एरवी अशक्य वाटणारे काम नेहमीच्याच लोकांकडून करवून घ्यायचे ह्या तंत्राचे नाव आहे सी (कॉस्ट) क्यू (क्वालिटी) एस (स्पीड). या सीक्यूएस पद्धतीच्या जादुगिरीने अनेक प्रॉजेक्टस् मी केली.

पुढे वाचा

भगवान गौतम बुद्धांचा वैज्ञानिक धर्म (उत्तरार्ध)

गौतमांनी आप्तप्रामाण्य नाकारले, शब्द-पूजा नाकारली, गुरू नाकारले, कोणतेही मत-कसोटीवर घासून त्याच्या सत्यतेचा प्रत्यय आल्याशिवाय मान्य करू नये, असे गौतमांनी सांगितले; कुठल्याही दुसऱ्या बाह्य ज्ञानी पुरुषाला शरण न जाता केवळ स्वतःला म्हणजे स्वतःमधील बुद्ध-स्वरूपाला शरण जावे; आणि आपल्यामधले अव्यक्त बुद्धत्व व्यक्त करून बुद्ध-पदाला पोहोचलेल्या गौतमांसारख्या महात्म्याचा ‘सल्ला’ घेत घेत प्रत्येकाने स्वतःच स्वतःची वाटचाल करावी; हे सारे समजले ; पण गौतम बुद्धांनी दिलेला हा ‘सल्ला’ काय आहे? त्यांनी दिलेली शिकवण आपण स्वतः पडताळून पाहावी हे ठीक, पण ती शिकवण आहे तरी काय ?’

पुढे वाचा

कटु गोडल्याचा ‘हर्ष’

मी आगळा वेगळा माई
न्यारीच जिंदगानी
माहे मरण आहे खरं अवकानी
पाणी काया
जमिनीतला कापूस, मले हरिक
कवितेचा त्याच्या मुईले
गोळवा, गोड उसाच्या पेराचा
माह्या मरणाले कोणी म्हणतील येळा
देह टांगता ठेवला, जसा फुलोऱ्यातला कानोला
श्रीकृष्ण कळंब
[(१) माझी, (२) अवकाळी, (३) काळ्या, (४) हर्ष, (५) मुळीला, (६) गोडवा, (७) वेडा, (८) काही पूजांमध्ये करंज्या वगैरे एका चौकटीला लावलेल्या ‘हुकां’ना (फुलोऱ्याला) टांगतात, ती प्रतिमा इथे वापरली आहे.]
[मार्च २००८ च्या उत्तरार्धाच्या अवकाळी पावसानंतर अकोल्याजवळील ‘बाभुळगाव (जहांगीर)’ येथील श्रीकृष्ण कळंब या शेतकऱ्याने आपल्या मूर्तिजापूर येथील बहिणीच्या घरात गळफास लावून, टांगून, आत्महत्त्या केली.

पुढे वाचा

पत्रचर्चा

सुधाकर कलावडे, ए-९/१, कुमार पद्मालय, न्यू डी पी रोड, स. नं. १६०/१, औंध, पुणे ४११ ००७. फोन (०२०) २५८९७३५९
लंकाधिपति-सम्राट-रावणाशी युद्ध करण्यासाठी समुद्राचे उल्लंघन आवश्यक होते. त्यासाठी रामेश्वर व लंका यांच्यामधील महासागरावर सेतू बांधावा लागला. रामाने वानरांच्या साह्याने पाच दिवसांत महासागरावर पाषाण, वृक्ष टाकून सेतू बांधला अशी कथा आहे. हा रामसेतू रामायण प्रत्यक्ष घडल्याचा पुरावा म्हणून दिला जातो व त्यावरून प्रतिपादन केले जाते. डॉ. भावे यांनी संशोधन करून हा सेतू रामाने प्रत्यक्षात बांधला होता असा दावा केला आहे. रामसेतू (हनुमान सेतू) वरून वानरसेनेने लंकेत प्रवेश केल्यावर शत्रूने पळून जाण्यासाठी अथवा अन्य कारणासाठी त्याचा उपयोग करू नये म्हणून रामाने एक बाण मारून सेतू महासागरात बुडवून टाकला व त्याचेच अवशेष आज दिसताहेत.

पुढे वाचा