स्वयंसेवी संस्थाः काही विचार

गेली तीस वर्षे मी स्वयंसेवी क्षेत्रात काढली, त्यातल्या शेवटच्या पाच वर्षांत फार उद्विग्नता वाट्याला आली आणि ‘अर्थ काय स्वयंसेवी संस्थांचा ह्या विश्वचक्री ?’ असे वाटू लागले. संपूर्णपणे पुन्हा पहिल्यापासून स्वच्छ, साधा आणि मोकळा विचार करावा असे जाणवू लागले. तसा विचार सुरू केला पण अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ‘स्वयंसेवी संस्था : सद्यःस्थिती आणि आह्वाने’ ह्यावर काही लिहिण्याइतपत आपला विचार पूर्ण झालेला आहे, असे अगदी खरोखरच वाटत नाही. दिवसेंदिवस मी जसा जसा विचार करतो आहे आणि अनुभव करतो आहे, तेव्हा वाटते, काय ह्या स्वयंसेवी क्षेत्रांनी स्वतःची वाट लावून घेतली.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्था: एक भांडवली षडयंत्र

स्वयंसेवी संस्थांचा विचार करताना त्यांच्या चांगल्या बाजू कोणत्या व वाईट बाजू कोणत्या किंवा त्यावरचे आक्षेप काय आहेत असा विचार करून चालणार नाही. त्याऐवजी प्रस्थापित व्यवस्था मान्य आहे की अमान्य, यासंदर्भात याचा विचार करावा लागेल. कारण स्वयंसेवी संस्था चांगल्या की वाईट हा प्रश्न ज्यावेळी आपण करतो, तेव्हा ही व्यवस्था हवी की नको हा प्रश्न बाजूला पडतो. त्यामुळे ही व्यवस्था मान्य केली तर त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे स्थान काय असेल व जर व्यवस्था अमान्य केली तर त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे स्थान काय असेल असा विचार केला पाहिजे.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्था: काही निरीक्षणे, काही अनुमाने

गेली काही वर्षे मी स्वयंसेवी संस्थांना जवळून पाहतो आहे. त्यांच्यासोबत काम करतो आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना काही गोष्टी पाहण्यात आल्या, काही कानावर पडत गेल्या, काही वाचनात आल्या. अशा कामाच्या जवळ जाण्यापूर्वी स्वयंसेवी संस्थांबद्दल मराठी बुद्धिजीवींमध्ये कोणते प्रवाद आहेत; या संस्थांची जनमानसात, विचारवंतांत, कोणती प्रतिमा आहे, याची मला सुतराम कल्पना नव्हती. किंबहुना, मेधा पाटकर, सुरेखा दळवी, आदींची कामे जवळून पाहिल्यानंतरही ‘एनजीओ’ ही संज्ञा मला माहीत झालेली नव्हती. म्हणजे, अगोदर तपशील माझ्यासमोर आले ; नंतर इतिहास, ऐतिहासिक प्रवाह माहीत झाले आणि त्याहीनंतर फॉरिन फंडिंग व त्याला जोडून येणारे प्रवाद, आक्षेप, वगैरे कळले.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्थाः सद्यःस्थिती आणि आह्वाने

राजकीय पक्षसंघटनाबाह्य स्वयंसेवी संस्थांची गरज पूर्वीही होती व आजही आहे. नव्याने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रबांधणीचे व उभारणीचे महाकाय काम होते. हे काम शासनसंस्थेच्या आवाक्याबाहेरचे होते. ते यंत्रणेच्या आवाक्याबाहेरचे होते तसेच शासनाच्या आर्थिक क्षमतेच्याही आवाक्याबाहेरचे होते. १९५०-५१ साली राष्ट्रीय उत्पन्न रु.९८९३ कोटी होते ते २००१-०२ साली २२.८३ लाख कोटीवर गेले आहे. १९९३-९४ च्या किंमतीनुसार १९५०-५१ चे राष्ट्रीय उत्पन्न रु. १.४७ लाख कोटी होते जे २००१-०२ साली १३.७० लाख कोटीवर गेले आहे. म्हणजे प्रचलित राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त १० टक्के एवढेच उत्पन्न १९५०-५१ साली होते.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्था

स्वयंसेवा या संकल्पनेतील ‘स्वयं’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; हा ‘स्वयं’ या क्षेत्रातील ऊर्मी, स्फूर्ती, प्रेरणा व जोश यांचा स्रोत आहे. खाजगी क्षेत्रातील ‘प्रेरणा’ व सार्वजनिक क्षेत्रातील ‘सेवा’ यांचा संयोग जुळवते ती स्वयंसेवा. कालमानानुसार, सेवेच्या स्वरूपात अनेक बदल झाले आहेत. परंतु सध्या ‘स्वयं’चे ही रूप झपाट्याने बदलत आहे हे निश्चित. या बदलांचे आकलन मात्र विविध पातळ्यांवरून होऊ शकते. सर्वसाधारण मीमांसा स्वयंसेवी संस्थाना त्यांच्याच प्रतिमानांनी आजमावते. या कार्याला एक स्वतंत्र विश्व मानते. साहजिकच या दृष्टिकोनातून केलेल्या चिकित्सेला दिसतात त्या या ‘शुद्ध’ क्षेत्रात शिरलेल्या विकृती.

पुढे वाचा

केल्याने होत आहे रे

चांगले हेतू, चांगली धोरणे, चांगले निर्णय, या साऱ्यांतून परिणामकारक कृती व्हायला हव्या. “आम्ही अमुक करू इच्छितो” या विधानानंतर “आम्ही ते असेअसे करतो, अमुक वेळात आम्ही ते करतो. अमुक माणूस त्यासाठी जबाबदार असतो. थोडक्यात म्हणजे, आम्ही अमुक कामासाठी जबाबदार असतो.’ ही विधाने यायला हवी. परिणामकारक संस्था हे मानूनच चालतात, की सुंदर योजना आखल्याने काम होत नाही. उत्कृष्ट धोरण-विधानानेही काम होत नाही. ते केल्यानेच होते. माणसांनी केल्याने. ठराविक वेळेत केल्याने. त्यासाठीची माणसे प्रशिक्षित असल्याने. त्या माणसांची प्रगती तपासून माणसे जोखत राहिल्याने. आपण परिणामांसाठी जबाबदार आहोत असे मानणाऱ्या लोकांकडून काम होते.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्थाः वाट का चुकते ?

सर्वसाधारणपणे स्वयंसेवी संस्थांच्या व्यवस्थापनाचा ढाचा सार्वजनिक न्यासाचा असतो. त्यांमधील काही संस्था तहहयात विश्वस्तांनी चालविलेल्या, किंवा काही संस्थांमध्ये विवक्षित कालावधीनंतर त्या संस्थांच्या सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकमंडळाच्या व्यवस्थापनाखाली चालविल्या जातात. त्या संस्था यशस्वी रीतीने चालविण्याकरिता ज्या निधीची आवश्यकता लागते, तो उभा करण्याचे प्रमुख मार्ग, पुढीलप्रमाणे आहेत : लोकवर्गणी, निर्माण केलेल्या मालमत्तेतून येणारे उत्पन्न ; शासनाचे अनुदान व परदेशी संस्थांकडून मिळणारी मदत. स्वयंसेवी संस्थेच्या कार्याच्या प्रकारांप्रमाणे निधी उभा करण्याचा तो तो मार्ग महत्त्वाचा ठरतो. सामाजिक कार्याच्या प्रकारांची ढोबळ विभागणी केली तर पारंपरिक शिक्षण देणाऱ्या संस्था, आरोग्यासारख्या क्षेत्रातील सर्वसाधारण सेवा देणाऱ्या, कल्याणकारी काम करणाऱ्या संस्था निधी उभारण्याच्या पहिल्या तीन मार्गांवर अवलंबून राहताना दिसतात; तर उपेक्षितांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांची सतत नवी आह्वाने निर्माण करणारी जी सामाजिक कामाची क्षेत्रे आहेत, त्यांमधील संस्था सामान्यपणे लोकवर्गणी, शासनाच्या किंवा विदेशी निधीवर अवलंबून राहतात.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्थांची सद्यःस्थिती

स्वयंसेवी संस्थांबाबत आजच्या संदर्भात चर्चा उपस्थित करताना समाजाची सेवा अथवा समाजातील एखाद्या घटकाचे कल्याण करण्यासाठी अथवा समाजातील एखादी गरज भागवण्यासाठी गेल्या शतकात अथवा १९७० च्या आधी झालेले प्रयत्न व संस्था-उभारणी यासारख्या उपक्रमांपासून, आजचे स्वयंसेवी संस्थांचे वर्तुळ वेगळे काढून पाहण्याची आवश्यकता आहे.
स्वयंसेवी संस्थांच्या कामाला पाया अथवा सामाजिक श्रेय त्याच पूर्वीच्या कामातून मिळाले आहे हे खरे असले तरी १९८०-८५ पासून ज्या प्रकारचे स्वयंसेवी संस्थांचे मोहोळ उभे राहिले आहे, त्यामध्ये मूलभूतरीत्या काही वेगळेपणा आहे. तो वेगळेपणा तपासला पाहिजे. तो एक पॅटर्न म्हणून उभा राहतो.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्थाः दशा आणि दिशा

स्वयंसेवी कार्याची परंपरा फार प्राचीन असली तरी तिचे आधुनिक संस्थात्मक स्वरूप समकालीन समाजव्यवस्थेमध्ये उदयास आले आहे. आधुनिक आर्थिक-राजकीय व्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची असल्यामुळे व तिला कल्याणकारी लोकशाहीप्रधान करण्यापलिकडे (तेही अपूर्णावस्थेतच) भारतामध्ये व इतरत्रही फारसे साध्य करणे अजूनपर्यंत यशस्वी झाले नाही. स्वयंसेवी संस्था व चळवळ यांची दशा व दिशा काय आहे हे समजून घेण्यापूर्वी सध्याची राजकीय स्थिती काय आहे ते आपण बघू या.
गेल्या २००-३०० वर्षांपासून सरंजामशाहीच्या बंदिस्त आर्थिक-राजकीय व्यवस्थेपासून उदारमतवादी लोकशाहीप्रधान कल्याणकारी राज्यव्यवस्थेपर्यंत आपण जागतिक स्तरावर वाटचाल केली आहे. त्यानंतरही व्यवस्थापरिवर्तनाचे पुष्कळ राजकीय प्रयोग झाले आहेत.

पुढे वाचा

समाजहितैषी संस्था बदललेले संदर्भ व कामाचा ढाचा

“महाराष्ट्र हे स्वयंसेवी संस्थांचे मोहोळ आहे.” असे गांधीजी म्हणत. पाचसहा दशकांपूर्वीच्या त्या स्वयंसेवी संस्था आता बढेशी कालबाह्य झाल्या आहेत किंवा अस्ताला गेल्या आहेत. स्वयंप्रेरित, समाजहितैषी कार्याचे संदर्भच पार बदलले. आपण आज एका युगाच्या अस्ताशी आणि नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. औद्योगिक समाजाचा अस्त होत आहे, आणि राष्ट्रसंकल्पनेची व्यावहारिक पातळीवर पीछेहाट होत आहे. नवीन शैक्षणिक संपर्कसाधनांद्वारे माहितीची विस्फोट होत आहे. सर्व मानवी व्यवहार फक्त पैशांमध्ये होत आहेत.
तीन गोष्टी झपाट्याने पुढे येत आहेत. जागतिकीकरण ही पहिली गोष्ट. पैशाच्या स्वरूपातील भांडवल आता जगभर क्षणार्धात इकडून तिकडे संचार करू शकते.

पुढे वाचा