D: It is written पण नेमकं काय? पाण्याच्या वाफेवर लिहिलेला जमालचा संघर्षमय भूतकाळ की फसवा वर्तमानकाळ की उज्ज्वल भविष्यकाळ ??
जमाल… एक अमिताभवेडा क्रिकेटप्रेमी, तर सलीम, त्याचा मोठा भाऊ, आईसोबत ‘आमची’ मुंबईच्या झोडपट्टीत राहात असतात. हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये जीव वाचवताना राम भेटतो. पण आईला गमावून अनाथ, निष्पाप भावंडे – द टू मस्केटीयर्स – आणि लतिका – द थर्ड – जगण्यासाठी एकांडा संघर्ष सुरू करतात.
पोटासाठी कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या या मुलांना भिकारी बनवण्यासाठी एक दिवस ममनचे लोक घेऊन जातात. मुलांचे डोळे काढून काहींना पांगळे करून भिकेला लावण्याच्या या धंद्याचा ममन बादशाह असतो.
नैतिकतेची वैश्विकता
मार्क हॉसर हे नामवंत मानसतज्ज्ञ असून मन, मेंदू व वर्तणूक यांविषयी विशेष अभ्यास करत आहेत. त्यांच्या मॉरल माइंड्स (Moral Minds: How Nature Designed Our Universal Sense of Right and Wrong) या पुस्तकात नीतिमत्तेच्या वैश्विक स्वरूपाबद्दल विस्तृतपणे चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेल्या काही प्रश्नोत्तरांतून नैतिकतेविषयी त्यांना काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल. माणसांमध्ये नीतिमत्ता उपजतच असते असे विधान आपण करत आहात. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे?
सर्वांत प्रथम नीतिमत्तेचे मूळ कुठे असेल याचा विचार करायला हवा. बरोबर वा चूक असे निकाल देत असताना त्यामागील मानसिक प्रक्रिया कोणती असेल?
पाणी व्यवस्थापनः सोपे उपाय
आ.सु.चा एप्रिल २००९ च्या अंकातील लेखात शेतीला लागणारे एकूण पाणी यासंबंधीचे विवेचन वाचले. मला शेतीला लागणाऱ्या पाण्याविषयी काही सांगावेसे वाटले म्हणून हे पत्र !
शेतीसाठी अथवा इतर उपयोगांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत हा पडणारा पाऊस आहे. आता त्याच्यावर आपले म्हणजे एकूणच मनुष्यप्राण्याचे फारसे नियंत्रण नाही. या शास्त्रात काम करणारे आपले जे दिग्गज शास्त्रज्ञ आहेत त्यांचे काम छान झाले याचा अर्थ त्यांनी वर्तवलेला पुढील वर्षीचा पावसाचा अंदाज जवळ जवळ बरोबर वर्तवला असे असते! तेव्हा जेवढा पाऊस पडेल व त्यातून जेवढे पाणी उपलब्ध होईल, ते साठवून (जमिनीवर अथवा जमिनीखाली) व काटकसरीने वापरून आपली गरज भागविण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे निर्विवाद.
राजा दीक्षित यांचा लेख,
“महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार”, प्रतिमा प्रकाशन, पुणे च) ख. ते (सावरकर) असे म्हणतात की, ‘चातुर्वर्ण्याच्या किंवा जातिभेदाच्या सर्व मुख्य प्रकारांच्या मुळाशी आनुवंशिक गुणविकासाचे सर्वसामान्य असे मुख्य तत्त्व आहे हे तत्त्व ‘जनहितकारक’ असून, ‘ज्यांच्या उपकारक प्रवृत्तीच्या पुण्याईच्या वशिल्यावरच आजवर ही संस्था (=जातिभेद) जगत आली’ त्या सर्वात हे तत्व ‘खरोखरच महत्त्वाचे’ आहे असेही ते (सावरकर) सांगतात.” वसंत पळशीकर यांचा लेख, जात्युच्छेदक निबंध व सावरकरांचे अस्पृश्यता निवारक कार्य, सुमंत यशवंत, (संपा.) महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार, प्रतिमा प्रकाशन, पुणे खख. “सावरकर हे वंश व वर्णश्रेष्ठत्ववादी कसे होते त्याचा परामर्श घेताना वसंत पळशीकर म्हणतात, “काही गुण श्रेष्ठ, काही कर्मे श्रेष्ठ, अशी त्यांची धारणा कायमच होती.
उत्क्रांतिसिद्धान्त, जात आणि जनुके
जाति-विभङ्ग पाणानं, अनामना हि जातियो ।।
एवं नत्थि मनुस्सेसु, लिङ्गं जातिमयं पुथु ।।* –
तथागत गौतम बुद्ध
(मनुष्येतर) प्राणिमात्रांमध्ये भिन्नभाव दाखविणाऱ्या जाती असतात; पण मनुष्यांमध्ये पृथक्ता दाखवणारे जातिमय लिंग नसते. (मज्झिमनिकाय, वासेट्ठसुत्त (२.४८.२.३), उद्धृत – शरद पाटील, दासशूद्रांची गुलामगिरी, खंड १ : भाग २, प्राज्ञ प्रकाशन, वाई, १९८७, पृ. ४५८)
उत्क्रांतिसिद्धान्ताने चार्ल्स डार्विनला (१८०९-१८८२) इतिहासात अढळ असे स्थान प्राप्त करून दिले आहे. जैवविज्ञानाच्या ज्ञानशाखेस त्याने जे योगदान दिले ते आजही त्याच्या काळाइतकेच महत्त्वाचे आणि पायाभूत मानले जाते. मानवाला, तो अगदी आदिमावस्थेत असतानापासून आपली उत्पत्ती आणि विकास कसा आणि कोणत्या क्रमाने होत आला हा प्रश्न भेडसावत होता.
यक्षप्रश्न
भारताला चीनबद्दल तिहेरी भीती वाटते. चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य, व्यापारी आक्रमकता व अणुशस्त्रसज्जता. चीनने कुरापत काढून १९६२ सारखे दुसरे युद्ध उभे केले तर?
छोट्या स्वस्त मालाची चीनची उत्पादनक्षमता जबर आहे. गेल्या काही वर्षांतच अनेक त-हेची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खेळणी, लसूण अशा विविध मालांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. हे असेच वाढत राहिले, तर भारतीय उद्योगधंद्यांवर आणि लक्षावधी कामगारांवर उपासमारीची पाळी यायची. आणि तिसरा लोकशाहीच्या कार्यक्षमतेचा व उपयुक्ततेचा यक्षप्रश्न. अविकसित देशाला महागडी लोकशाही परवडत नाही की काय ? खरे म्हणजे अशी तुलना करणे दिशाभूल करणारे आहे.
संपादकीय काळजी आणि उपाय
सोबत दोन नकाशे आहेत, भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या पावसाच्या प्रमाणांचे. कच्छ-सौराष्ट्र भागातच पाऊस सरासरीच्या जास्त झाला आहे. उत्तरप्रदेशाचा पश्चिम भाग, हरियाणा, दिल्ली या क्षेत्रांत पाऊस सरासरीच्या चाळीस टक्क्यांनाही पोचलेला नाही. ओरिसा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, केरळ व दक्षिण कर्नाटक या क्षेत्रांत पाऊस सामान्य आहे (म्हणजे सरासरीच्या १९% वरखाली). उत्तर कर्नाटक व तामिळनाडू मात्र सहाच दिवसांच्या पावसातल्या तुटवड्याने सामान्य स्थितीतून कमतरतेच्या स्थितीत गेले. इतर सर्व देश आधी व नंतर कमतरतेच्या स्थितीत अडकलेला आहे.
याचा अर्थातच शेतीवर परिणाम होणार. नागरी पाणीपुरवठाही पुढे त्रासदायक तुटवड्यात अडकणार.
पुस्तक परिचय- वेताळाच्या आरोग्यकथा
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेले हे एक वेगळ्या प्रकारचे पुस्तक. “बंडखोरी करणाऱ्या व नवनिर्मितीच्या मुळाशी असणाऱ्या प्रश्न विचारण्याच्या व उपस्थित करण्याच्या प्रवृत्तीस’ ही अर्पण पत्रिकाही कुतूहल वाढवणारी आहे.
औषधशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण मिळवून मुंबईला एस्.एन्.डी.टी. विद्यापीठात २० वर्षे प्राध्यापिकी केलेल्या या लेखक महोदयांनी महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांनाही वाचा फोडली. स्त्री भ्रूणहत्येचे महाराष्ट्रातील वाढते प्रमाण, सोबतच औषधनिर्मिती व विक्रीचा बाजार, त्यात होत जाणारी रुग्णांची फसवणूक, जाणीवपूर्वक किंवा अजाणता डॉक्टर मंडळी यात का सामील होतात ; या सर्व प्रश्नांना उत्तरे शोधायचा प्रयत्न करतानाच त्यावर काही उपाय करता येतील का, हा महत्त्वाचा प्रश्न ते आपल्यासमोर मांडतात.
‘यू टर्न’च्या निमित्ताने
आनंद म्हसवेकर लिखित ‘यू टर्न’ ह्या नाटकाचा १४३ वा प्रयोग नुकताच पहिला. या नाटकाविषयी, कथानकाविषयी, प्रयोगाविषयी पूर्वी वाचलेलेच होते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोग पाहण्याची उत्सुकता होती व तशी संधी मिळाली म्हणून ती सोडली नाही. नाटकाच्या तांत्रिक बाबींविषयी मी लिहिणार नाही कारण त्याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. मला फक्त कथानकाविषयी व त्यात मांडणी केलेल्या समस्येविषयी काही लिहायचे आहे.
नाटकाचे कथानक म्हटले तर अभिनव आणि म्हटले तर ते तसे नाहीही. कारण यापूर्वी ह्याच कथानकाच्या आशयाचे ‘दुर्गी’ हे नाटक पाहिल्याचे मला आठवते आहे. कोणी लिहिले, कोणी दिग्दर्शित केले हे आज आठवत नाही.
विवेक आणि नीति यांच्यात विरोध?
बरोबर काय आणि चूक काय, न्याय्य आणि अन्याय्य, चांगले आणि वाईट, यांची समज किंवा ज्ञान माणसाला, उपजत बुद्धीनेच मिळतात, असे मला वाटते. जन्मानंतरच्या संस्कारांनी व शिक्षणाने या समजेत आणि ज्ञानात भर क्वचित् आणि थोडीच पडते. उलट संस्कारांनी आणि शिक्षणाने या संकल्पना पूर्णपणे उलट्या किंवा विकृत होण्याची शक्यता खूपच असते-विशेषतः धार्मिक संस्कारांनी, उदाहरणार्थ दोन शतकांपूर्वी सवर्ण हिंदूंना अस्पृश्यता, सती जाणे, विधवेचे विद्रूपीकरण या गोष्टी न्याय्य आणि बरोबरच वाटत होत्या – इतकेच नाही तर खुद्द अस्पृश्य आणि विधवा यांनादेखील या गोष्टी बरोबरच वाटत होत्या!