अमेरिकेत सरकारने १८६० ते १९०० या काळात ५० कोटी एकर जमीन आठ कोटी शेतकऱ्यांना विकली असा एक उल्लेख आहे. (क्रिस्टफर डी. कुक : डायेट फॉर दी डेड प्लॅनेट). प्रत्यक्ष लागवडीखालील शेतजमीन ५० कोटी एकर किंवा थोडी कमी जास्त असावी. ट्रॅक्टर्सची संख्या १९११ ते १९२० या काळात चार हजारांवरून अडीच लाखांवर गेली.
भारतातील महत्त्वाच्या पिकांखाली २००३-०४ साली ३८ कोटी एकर जमीन होती. १९९९-२००४ या काळात दरवर्षी सरासरी २.३३ लाख ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती. देशातील एकूण ट्रॅक्टर्स (वापरातील) संख्या भारत सरकारच्या २००४-०५ च्या वा नंतरच्या वार्षिक आर्थिक समीक्षेत दिलेली नाही.
अमेरिकन शेती
[क्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट या पुस्तकाच्या आधाराने अमेरिकन शेतीचा खालील इतिहास रेखला आहे.
अश्विन परांजपे (वय वर्षे ३५) हा भारतात B.Sc. (Agri.) शिकून व अमेरिकेत फलोद्यानशास्त्रात M.S. करून आज पुण्याजवळ शेतीक्षेत्रात अनेक प्रयोग करत आहे. त्याने लेखात जागोजागी त्याची निरीक्षणे नोंदली आहेत…]
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे राष्ट्र १७७६ साली जन्माला आले. गेल्या दोन-अडीच शतकांत ते जगातील सर्वांत प्रबळ व श्रीमंत राष्ट्र झाले आहे. आज अमेरिका म्हणजे केवळ हे राष्ट्र असे लिहिले-बोलले जाते. भौगोलिक संदर्भ द्यायचे झाले तर मात्र उत्तर अमेरिका खंड, असे म्हणावे-लिहावे लागते.
सभ्यता आणि राज्यशास्त्र
सभ्यता आणि राज्यशास्त्र
क्रिस्टफर डी. कुक
सभ्यता (civilizaton) म्हणजे जे नगरांत घडते ते; आणि नगरे अन्नोत्पादकाकडे गरजेपेक्षा जास्त अन्न असण्यावर अवंलबून असतात. ते ज्यादा अन्न उत्पादकाकडून घेणारी संस्थाही असावी लागते. या ज्यादा अन्नातून ती राजकीय संस्था राजांची पोटे भरते ……. सैन्याची, वास्तुशिल्पींची आणि बिल्डरांचीही पोटे भरते. आणि यांतून नगर जन्माला येते. अन्नोत्पादकापासून त्याचे ज्यादा उत्पन्न फारसा काही मोबदला न देता कसे घ्यावे, हे राज्यशास्त्राचे सर्वांत प्राचीन रूपातले ज्ञान आहे.
[चार्ल्स वॉल्टर्स, ज्यूनियरच्या अँग्री टेस्टामेंट (१९६९) मधले हे अवतरण, क्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट (२००४)मध्ये उद्धृत केलेले.
पत्रसंवाद
प्रसन्न दाभोलकर, सातारा
आ.सु.च्या २००९ च्या अंकात श्री. कृ.अ.शारंगपाणी यांनी माझ्या लेखाबाबत दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांचे उत्तर –
१) ‘माझ्या लेखात “मी आहे आणि माझे अनुभव आहेत.” हा व्यक्तिगत अनुभव ज्यामुळे शक्य होतो ते चैतन्यस्वरूप ब्रह्म’ असे वाक्य आहे. ‘हेही कळले नाही.’ असे श्री. शारंगपाणी लिहितात.
माझी भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
श्री. शारंगपाणी यांनी ‘हेही कळले नाही’ या वाक्याचा कर्ता दिलेला नाही. तो अर्थातच गृहीत आहे – ‘मी’. म्हणजे पूर्ण वाक्य ‘हेही मला कळले नाही’ असे होते. आता शारंगपाणींनी लेख वाचणे, त्यावर विचार करणे आणि त्यातला काही भाग कळला नाही या निष्कर्षावर येणे’ येथपर्यंतच्या क्रिया त्यांच्या मेंदूत घडल्या आहेत.
दुभंगलेला समाज
मुंबईतील भा.ज.पा.च्या एका कार्यकर्त्याने अभिनेता इमरान हाशमीच्या विरोधात ३ ऑगस्ट २००९ रोजी तो जातीय द्वेष पसरवतो आहे अशा प्रकारची तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये महेश भट्ट ज्यांनी इमरान हाशमीच्या बाजूने विधान केले आहे, त्यांनाही गोवण्यात आलेले आहे. इमरान हाशमीने अलीकडे राज्य अल्पसंख्यांक आयोगाला भेट देऊन अशी तक्रार केली की ‘निभाना’ ही हौसिंग सोसायटी, जी मुंबईतील पालीहील भागात आहे त्यांच्याकडून भेदभावाची वागणूक दिली जात आहे. त्याची मुख्य तक्रार अशी होती की, त्याने फ्लॅट विकणाऱ्याला अगोदरच अॅडव्हान्समध्ये लाखभर रुपये दिले होते, पण हौसिंग सोसायटी त्याला ‘ना हरकत पत्र’ देण्यास तयार नव्हती कारण इमरान हाशमी मुसलमान आहे.
पुस्तक परीक्षणः ‘ऑपरेशन यम्’ एकविसाव्या शतकाची कादंबरी
‘ऑपरेशन यमू’ ही मकरंद साठेलिखित अवघ्या एकशेसहा पानांमध्ये आटोपणारी कादंबरी हाती आली नि एक अप्रतिम कादंबरी वाचल्याचे अपूर्व समाधान देऊन गेली. “ही खरीखुरी एकविसाव्या शतकाची कादंबरी आहे” अशा शब्दात महेश एलकुंचवारांनी मलपृष्ठावर तिचा गौरव केलेला दिसतो.
निवेदिका ललिता नि तिचा मित्रपरिवार एकविसाव्या शतकातील जिणे जगतात. ललिता एका दूरचित्रवाणीची वार्ताहर आहे (वय वर्ष बेचाळीस). प्रत्येक घटनेत ‘स्टोरी’ शोधणारी, थोडक्यात स्पष्ट, स्वच्छ, मुद्देसूद बोलण्याची सवय असलेली पण एका विशिष्ट घटनेमुळे निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणारी व त्यातून बाहेर पडू पाहणारी.
घटना घडते ती तिच्या मित्राच्या, सतीशच्या, जीवनात.
पिसाळलेले म्हणा आणि गोळी घाला !
“कॉल ए डॉग मॅड अँड शूट इट” अशी म्हण इंग्रजीत आहे. याचा अर्थ असा की कुत्र्याला मारायचे आहे ना? मग तो पिसाळलेला आहे असे म्हणा, आणि त्याला गोळी घाला.
जनुकबदल पिकांबद्दल (genetically modified crops) हेच चालू आहे. भीती पसरवण्यात आनंद मानणारा एक तथाकथित पर्यावरणवादी/समाजवादी/पुरोगामी म्हणवून घेणारा कंपू भारतात कार्यरत आहे. त्यांनी का कोण जाणे पण जनुकबदल पिकांना गोळी घालावयाचे ठरवले आहे. त्यासाठी मग जनुकबदल पिकांचे सर्व गुण नाकारून त्यांना विषारी, धोकादायक, पर्यावरणाला धोकादायक, शेतकऱ्यांना परावलंबी बनवण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेले हत्यार, वगैरे विशेषणे बहाल केली आहेत.
तापमानवाढीच्या गोष्टी
माणसांना वेगवेगळ्या वस्तू, घटनांच्या ध्वनिचित्रफिती, प्रत्यक्ष घटना वगैरे दाखवून त्या ऐकण्या-पाहण्याने मेंदूंत काय क्रिया घडतात; हे तपासायचे शास्त्र-तंत्र आता विकसित झाले आहे. त्याच्या वापरातून एक मजेदार निष्कर्ष निघाला. माणसांपुढे घडणाऱ्या दृश्यांत माणसे मनाने (मेंदुव्यवहाराने) सहभागी होतात! सिनेमे पाहताना नायक-नायिकांच्या मनांत असतील तसे व्यवहार प्रेक्षकांच्याही मनांत होतात. गोष्टी वाचताना-ऐकतानाही असे घडते. सापाचे चित्र पाहणेही साप पाहण्याला समांतर अशा शारीरिक-मानसिक प्रतिसादाला जागवते, इ.
यावरून एक मत घडते आहे, की माणसे उत्क्रांतीतून गोष्टी अनुभवण्याला अनुरूप झाली आहेत. लहान मुले गोष्टी अत्यंत मन लावून वाचतात–ऐकतात, दूरचित्रवाणी व चित्रपटांना जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद देतात.
ग्रामीण अर्थव्यवस्था व शेतकरी
आपण गेल्या २-३ वर्षांत विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बऱ्याच बातम्या वाचल्या व त्यावरचे विचारवंतांचे, राजकीय पक्षांच्या धुरीणांचे लेख वाचले. समित्या नेमलेल्या ऐकल्या. त्यांचे अहवाल वाचले. पण अजूनही परिस्थितीत फारशी सुधारणा नाही. याचे एक कारण असे की राज्यकर्ते नेहमीप्रमाणे या अरिष्टावर काही तरी मलमपट्टी उपाय करू पाहत आहेत व या सर्व गोष्टींच्या मागे जो मूळ प्रश्न आहे त्याच्याकडे त्यांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलेले आहे. या आत्महत्यांचा सरकारवर झालेला दृश्य परिणाम म्हणजे केंद्र व राज्य सरकारने केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी! कर्जमाफीसाठी असलेले अनेक निकष फारसे योग्य नाहीत.
पुराव्यांनी धारणा बदलतात
पण माणसांचे विश्वास, त्यांच्या धारणा सहज बदलू शकतात, विशेषतः धोका पुढ्यात उभा असला की. म्हणूनच माणसे पुरावे पाहून धारणा बदलतात. याचे अभिजात उदाहरण मला भेटले. १९९०-२००० च्या मध्याजवळ मला वार्ताहर विचारत, की माझा तापमानवाढीवर विश्वास आहे का, आणि मी माझ्या विश्वासाचा उघडपणे बचाव देईन का.
आज मात्र तेच मला विचारतात, की परिस्थिती किती बिघडेल ! [मार्क मॅस्लिनच्या अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन टु ग्लोबल वॉर्मिंग (ऑक्स्फर्ड युनि. प्रेस, २००४) या पुस्तकातून]