नव्या राज्यशास्त्रीय व्याख्या

इंटरनेट

समाजवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही एक गाय शेजाऱ्याला देता.
साम्यवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला थोडे दूध देते.
फॅसिझम : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला थोडे दूध विकते.
नात्झीवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला गोळ्या घालते.
लालफीतवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, एकीला गोळी घालते, दुसरीला दोहते, आणि दूध फेकून देते.
पारंपरिक भांडवलवादः तुमच्याकडे दोन गाई आहेत.

पुढे वाचा

आरोग्यमंत्र्यांचा आशावाद व तरुणाईतले मनुष्यबळ

“जर वीज असेल तर लोक दूरदर्शनसंचावरील कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत पाहतील व मग उशिरा झोपल्याने मुले होणार नाहीत” असे आरोग्यमंत्री म्हणाल्याचे वर्तमानपत्रीं वाचले. त्याचबरोबर महेश भट्टांसारखे सिनेमातज्ज्ञ म्हणाले की “उत्तम मनोरंजन हे एक संततिनियमनाचे उत्तम साधन आहे.”

सारांश, लोकसंख्यावाढीचा प्रश्न अजून अस्तित्वात आहे, तो संपलेला नाही, याची जाणीव आजही कोठेतरी आहे व ही वाढ रोखण्यासाठी साधनेही सुचविली जातात हे आजच्या भारतीयांना अभिमानास्पद (?) आहे. नाहीतर भारतात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यात काम करण्याच्या वयाच्या (१६ ते ५५) लोकांचे प्रमाण त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्यापेक्षा बरेच जास्त आहे, ही आर्थिक लाभाची गोष्ट आहे, असे सुचविल्याशिवाय भारतातील कोठलीही बैठक आणि चर्चा पूर्ण होत नसल्याचे ऐकतो.

पुढे वाचा

आय.सी.एस.ई.-इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह स्टिम्युलेटिंग एज्युकेशन?

मागील वर्षीचे पर्सेंटाईल सूत्र, ह्या वर्षीचे ९०:१० च्या कोट्याचे प्रकरण, तसेच कपिल सिबलांची वक्तव्ये विचारात घेता मुळात प्रत्येक बोर्डाची अंगभूत वैशिष्ट्ये समजून घेणे गरजेचे आहे. आय.सी.एस.ई.बोर्ड विविध इयत्तांमध्ये गणित, भाषा, विज्ञान आदि विषयांची हाताळणी कशा प्रकारे करते, हे जवळून पाहायची संधी मिळाल्याने गेली बारा वर्षे मला जाणवलेल्या वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत टाकत आहे. माझा अनुभव सार्वत्रिक असेल, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. आय.सी.एस.ई.च्या प्रत्येक शाळेत असेच असेल, असे मुळीच नाही. मुळात हे बोर्ड शाळेला बऱ्याच अंशी स्वायत्तता देते. विषय व पुस्तके निवडण्याचे तसेच परीक्षापद्धती व सत्रनियोजन ठरविण्याचेही शाळेला स्वातंत्र्य असते.

पुढे वाचा

कसोटीचा दगड…… पाठराखा

“आपले मतभेद आहेतच, कधी तपशिलाचे, कधी तात्त्विक. तसे मतभेद तर असणारच, कारण दोघेही आपापल्या अनुभवांच्या, आकलनाच्या आधाराने मते घडवत आहोत. पण हे मतभेद संवादाला बाधा आणत नाहीत. उलट तपशीलवार संवादातून मतैक्य कुठेकुठे आहे, एकमेकांना पूरक भूमिका आहेत का, हे सारे प्रश्न सोडवता येतील. कृतीच्या पातळीवर ज्यात (भाषणे, लेखन हेही आलेच) तर नक्कीच मतैक्य भेटेल. तर तेवढी कृती एकत्र करू या; आणि ती करत असताना संवादही करत राहू या.”

भोळेसर आणि आजचा सुधारक चा छोटेखानी परिवार, यांच्या संबंधांचा पाया वरील परिच्छेदात आहे.

पुढे वाचा

परंपरांच्या विरोधात

[लिन् मालिस (Lynn Margulis) ही एक चाकोरीबाहेरच्या वाटा चालणारी जीवशास्त्रज्ञ आहे. कालेजच्या आयुष्याच्या सुरुवातीला तिचा कार्ल सगानशी प्रेमविवाह झाला. तो पुढे प्रख्यात विज्ञानप्रसारक झाला. पृथ्वी सोडून विश्वात कुठे बुद्धिमान जीव आहेत का, हे शोधण्याच्या SETI (Search for Extra-Terrestrial Intelligence) प्रकल्पाचा तो जनक. लिन् मात्र त्याच्याशी विभक्त होऊनही मैत्री टिकवून आपले संशोधन करत राहिली. तिच्या सिंबायॉटिक प्लॅनेट, (ड्रालळींळल झथरपशी) या पुस्तकातील काही भागाचे, Against Orthodoxy या प्रकरणाचे हे संक्षिप्त भाषांतर. – सं.]

मी उच्च शिक्षणासाठी अर्ज केला. माझी लिबरल आर्टस्मधील पदवी ग्राह्य धरून विद्यापीठात प्रवेश मिळाला हे एक आश्चर्यच होते.

पुढे वाचा

ब्ल्यू-प्रिण्टचे ‘टायमिंग’

तोडफोड, दमबाजी, घोषणाबाजी याच्यापलीकडे जाऊन स्थानिकांच्या हिताचे विवेकी राजकारण करणाऱ्यांची या राज्यात गरज आहे. परंतु भावनिक हिंदोळ्यावर बसून स्वतःचे झोके आभाळात घेऊन जायचे आणि तेथून हात उंचावून भक्तांना दर्शन द्यायचे, याच पद्धतीने अस्मितेचे राजकारण सुरू आहे. राज्याच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिण्ट’ राज्यावर आल्यानंतर बनविता येत नाही, ती ‘ब्ल्यू प्रिण्ट’ दाखवून राज्यावर यावे लागते. परंतु सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही राजकारण केवळ ‘प्रिण्ट’च्या दिशेने जाणारे आहे. “प्रिण्ट’चा शुद्ध मराठी अर्थ ‘छापणे’ असा होतो आणि ‘छापणे’चा अर्थ काय होतो हे मराठी माणसाला वेगळे सांगण्याची गरज नाही.

पुढे वाचा

संपादकीय मिलिंद मुरुगकर, अश्विनी कुलकर्णी

जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने स्वतंत्र भारताच्या इतिहासातील उच्चांक गाठला आहे. या महागाईला देशातील कोट्यवधी गरीब लोक कसे तोंड देत असतील. याचा विचारही हृदयद्रावक आहे.
१९९० नंतरच्या अर्थव्यवस्थेने घेतलेल्या नवीन वळणानंतर देशाचा अर्थिक विकासाचा दर झपाट्याने वाढता राहिला. या विकासाचा फायदा अतिशय विषम पद्धतीने जनतेपर्यंत पोहचला. त्यामुळे समृद्धीची काही बेटे तयार झाली. पण फार मोठ्या जनसंख्येला विकासाचा अत्यल्प लाभ मिळाला. इतर मोठ्या संख्येला तो काहीच मिळाला नाही. जागतिकीकरणाच्या रेट्याबरोबर झालेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे समृद्धीच्या चकचकीत बेटांच्या प्रतिमा आपल्यासमोर वारंवार नाचत राहिल्या. या प्रतिमांमुळे देशातील अफाट दारिद्र्य मात्र झाकोळले गेले.

पुढे वाचा

कसोटीचा दगड —– पाठराखा.

आपले मतभेद आहेतच, कधी तपशिलाचे, कधी तात्त्विक. तसे मतभेद तर असणारच, कारण दोघेही आपापल्या अनुभवांच्या, आकलनाच्या आधाराने मते घडवत आहोत. पण हे मतभेद संवादाला बाधा आणत नाहीत. उलट तपशीलवार संवादातून मतैक्य कुठेकुठे आहे, एकमेकांना पूरक भूमिका आहेत का, हे सारे प्रश्न सोडवता येतील. कृतीच्या पातळीवर ज्यात (भाषणे, लेखन हेही आलेच) तर नक्कीच मतैक्य भेटेल. तर तेवढी कृती एकत्र करु या; आणि ती करत असताना संवादही करत राहू या.
भोळेसर आणि आजचा सुधारक चा छोटेखानी परिवार, यांच्या संबंधांचा पाया वरील परिच्छेदात आहे.

पुढे वाचा

वैचारिक प्रवास : भेदाकडून अभेदाकडे जाणारा

विचारवंत म्हणून साने गुरुजींची प्रतिमा प्रतिष्ठित करणाऱ्या भा. ल. भोळ्यांना साने गुरुजींच्या जयंतीदिनीच मृत्यू यावा हा केवळ योगायोग असेलही, पण त्यातही भोळ्यांचा ‘वैचारिक अनुबंध’च प्रकट झाला, म्हणून भोळ्यांच्या लवकर जाण्याने चळवळीची, साहित्य व्यवहारांची, माणुसकीची व अशा अनुबंधाची झालेली हानी ही साचेबंद प्रतिक्रिया राहत नाही, तर मनाच्या दुखऱ्या कोपऱ्यांच्या संख्येत भर टाकणारी ठरते. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ जीवाभावाचे संपन्न मैत्र देणाऱ्या या विचारवंत मित्राच्या स्मृतीस हार्दिक अभिवादन.
निर्भीड, व्यासंगी व साक्षेपी हे तिन्ही शब्द भोळ्यांच्या लेखनात, जीवनव्यवहारात शब्दश: खरे होते. या शब्दांच्या अर्थांची छटा कितीही कमी-जास्त धरली तरी त्यांच्या टीकाकारांना, मित्रांना, वाचकांना हे शब्द वापरण्यास काही पर्यायच उरत नाही.

पुढे वाचा

भ्रष्ट, अकार्यक्षम रेशनव्यवस्थेला ठोस पर्याय

दारिद्र्यनिर्मूलन हा या देशापुढील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे असे जर आपण मानणार असू तर देशातील गरीब ग्राहक व गरीब शेतकरी यांच्या हितसंबंधांची परस्परपूरक अशी सांगड घालण्याचा प्रश्न देशापुढील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न ठरेल. आजची व्यवस्था दुर्दैवाने नेमके याच्या उलट करते. आजची रेशनव्यवस्था गरीब ग्राहक व गरीब शेतकरी यांना परस्परांविरुद्ध उभे करते. गरीब ग्राहकाची अन्नसुरक्षा साधण्याच्या नावाखाली गरीब धान्योत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करून ग्रामीण दारिद्रयनिर्मूलनाच्या प्रक्रियेत अडथळा आणते आणि दुसरीकडे प्रत्यक्षात गरीब ग्राहकाची अन्नसुरक्षा तर साधली जात नाहीच. उलट महागाईच्या दुष्टचक्रात देशातील गरीब ग्राहक अक्षरशः भरडून निघत आहेत.

पुढे वाचा