वैयक्तिक आयुष्यात देवावर, नियतीवर श्रद्धा असण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही. पण सार्वजनिक, सामाजिक जीवनात तिची लुडबूड होते तेव्हा चिंता वाटते, वाढते. संघटित धर्मसंस्था सत्तापिपासू लोकांना हमखास आपल्याकडे खेचून घेते आणि मग त्यात राजकारणातील अनिष्ट गोष्टी शिरतात. पाश्चिमात्य राष्ट्रात चर्चचा इतिहास पाहा. आपल्याकडील रथयात्रेपासून सुरुवात झालेल्या घटना पाहून हेच दिसते की जास्त संख्येने लोक आकृष्ट होतात तेव्हा राजकारण्यांचे लक्ष तिकडे जाते आणि राममंदिर हा भक्तीचा नव्हे तर राजकारणाचा विषय होतो. राम हा दर्शनी किंवा ‘फ्रंट’ म्हणतात तसा दाखवायचा भाग बनतो आणि त्याच्या आडून राजकारणाची सूत्रे हलू लागतात.
मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद : एक सांप्रत दर्शन – परिचय
‘आजचा सुधारक’च्या ऑक्टोबर-२३ च्या अंकातील श्रीधर सुरोशे यांचा ‘मार्क्सची अर्थमीमांसा : भाग २‘ हा लेख वाचला. त्यातील विचार आणि मी ज्या दर्शनाचा अभ्यास करीत आहे, यांतील साम्यस्थळे मला दिसली. त्यावरील माझ्या अभिप्रायांवर ‘आजच्या सुधारक’ने प्रोत्साहन दिले की ‘मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद’ याविषयी मी काही लिहावे, ज्याने एक नवा मौलिक विचार लोकांसमोर येईल आणि संवादाचा एक मोठा अवकाश खुला होईल. मला लिहिते केल्याबद्दल ‘सुधारक’चे आभार.
भूमिका :
सर्वप्रथम हे सांगणे आवश्यक आहे की मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद या दर्शनाचा मी गेले काही वर्षे अभ्यास करतो आहे.
मार्क्सची अर्थमीमांसा : भाग ३
निरनिराळ्या वस्तूंत जी अमूर्त वास्तवता शिल्लक राहते तिचा मार्क्सच्या विवेचनास अनुसरून एक अर्थ विशद करता येईल. तो असा :
वस्तूतील ही अमूर्त वास्तवता म्हणजे एकाच प्रकारच्या मानवी श्रमांचे, त्यांचा कोणत्या प्रकारे उपयोग केला जातो याचा विचार न करता जे शिल्लक राहते अशा निव्वळ श्रमांचे घन स्वरूप होय. या सर्व वस्तूंविषयी जे सामान्य तत्त्व मांडता येईल ते असे की, या सर्व वस्तूंच्या निर्मितीसाठी मानवी श्रमशक्ती खर्च झालेली असते. मानवी श्रमशक्तीचे त्या व्यक्त स्वरूप असतात. सारांश, सर्वांत समानतेने असणाऱ्या या सामाजिक गोष्टींची मूर्त स्वरूपे या दृष्टीने पाहता सर्व वस्तू मूल्ये असतात.
पुस्तक परिचय – सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी
लेखक: माधव गाडगीळ
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
परवाच ‘सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी’ हे माधव गाडगीळ यांचे पुस्तक हातात पडले; आणि मी ते आधाशासारखे वाचून काढले. एक निसर्गप्रेमी, पद्मभूषण, पर्यावरणवादी चळवळीतला एक आधारस्तंभ आणि भटनागर प्रशस्ती पुरस्कार मिळालेला एक विद्वान म्हणून मी त्यांना ओळखून होतोच. तशा आमच्या गाठीभेटीही झाल्या होत्या. माझ्या ‘अनर्थ’ पुस्तकासाठी त्यांनी ब्लर्बही दिला होता. पण तरीही त्यांचे हे पुस्तक वाचल्यावर मला माधव गाडगीळ ही काय असामी आहे हे खऱ्या अर्थाने कळले.
या माणसाने निसर्गावर प्रेम केले. सर्व प्राणी, वनस्पती, किडे, भुंगे – सर्व कीटक, दगड, धोंडे, पर्वत, नद्या, समुद्र, त्यातले मासे, हत्ती, वाघ, सिंह, एवढेच काय इथल्या शेवाळ्यावरही याने प्रेम केले!
आवाहन
स्नेह
सध्याच्या सामाजिक वातावरणात वर्तमानपत्रे, निरनिराळ्या वाहिन्या, सोशल मीडिया या सर्व माध्यमांना आपल्या कह्यात घेऊन देव-धर्माचा आणि बुरसट परंपरांचा कर्कश कोलाहल करणाऱ्यांचा उन्माद वाढताना दिसतो आहे. धर्म, धार्मिक आस्था यांमुळे जगभरात अनेक युद्धे झाली, नरसंहार झाला. अगदी अलीकडे सुरू असणारे इस्राईल आणि हमस यांच्यामधील युद्ध याच प्रकारचे. असे असूनही मानवी जीवनात धार्मिक आस्था, श्रद्धा यांचे स्थान वरचढ राहावे हा विरोधाभास बुचकळ्यात पाडणारा आहे.
या पार्श्वभूमीवर बुद्धिप्रामाण्यवादाचा, नास्तिक्याचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सातत्याने प्रसार आणि प्रचार करण्याचे धाडस दाखवणारे काही गट सक्रिय कार्यरत असणे हे आपल्या सामाजिक समृद्धीचे लक्षण ठरते.
मनोगत
‘आजचा सुधारक’च्या जुलै २०२३ च्या कृत्रिमप्रज्ञा विशेषांकाला लेखकांचा आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या अंकाच्या मनोगतात आम्ही लिहिले होते की,
आजवरच्या विकासात बनलेली साधने, उपकरणे, तंत्रज्ञान हे माणसाचे शारीरिक श्रम कमी करून त्याची ऊर्जा आणि त्याचा वेळ वाचवण्यासाठी बनलेली दिसतात. असा मोकळा वेळ मिळाला तर बुद्धी सृजनाचे काम अधिक करते. आज कृत्रिमप्रज्ञेसारख्या शोधाने मात्र माणसाच्या मनाला आणि बुद्धीलाच गुंतवून टाकले आहे. एवढेच नव्हे तर माणसाच्या विचारांना दिशाही तीच देते आहे.
मानवाची आजवरची वाटचाल/प्रगती ज्या अंगभूत गुणांमुळे, जसे जिज्ञासा, कल्पकता, सर्जकता, इत्यादींमुळे झाली, ते गुण कृत्रिमप्रज्ञेच्या वाढत्या उपयोगामुळे निकामी तर होणार नाहीत ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.
दर्जेदार शिक्षण
गुणवत्ता म्हणजे काय आणि शिक्षणातून गुणवत्ता कशी वाढवायची?
मी काही स्वत:ला शिक्षणतज्ज्ञ समजत नाही. पण तरीही हा विषय माझ्या खास जिव्हाळ्याचा आहे. १९७९-८० सालातली गोष्ट आहे. तेंव्हा मी वीस वर्षांची होते. पुणे विद्यापीठात जर्मन या विषयात एम.ए. करत होते. त्या काळी हा विषय तसा नवाच असल्यामुळे शाळांमध्ये जर्मन शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्याही तशी बेताचीच होती. तेव्हा एका शाळेतील ९वी व १०वीच्या वर्गांना जर्मन विषय शिकवणारे शिक्षक अचानक सत्राच्या मध्यातच सोडून गेले. अशावेळी त्यांची अडचण सोडवण्यासाठी आमच्या सरांनी मला त्या शाळेत शिकवायला पाठवले.
शिक्षणाचे वर्तमान – एक टिपण
सध्याच्या, सरकारप्रणित, उपलब्ध असलेल्या एसएससी बोर्डाच्या दिशेने जाणाऱ्या शिक्षणाचे वर्णन ‘हाती धरता रोडका, डोकी धरता बोडका’ या जुन्या खेडवळ म्हणीने करता येईल. रोजगार मिळवून देण्यासाठीही ते हमी देणारे नाही आणि मूल्ये रुजवण्याच्या किंवा संस्कार करण्याच्या नावानेही बोंबच आहे.त्यामुळेच सुस्थितीतल्या पालकांचा कल महागड्या इंटरनॅशनल स्कूल्सकडे झुकत चाललेला दिसत आहे. आता मुंबईतील महापालिकेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळादेखील याच प्रवाहात जाताना दिसत आहेत.
इंटरनॅशनल स्कूल्समधील अध्यापनपद्धत वेगळी म्हणजे रीसर्च बेस्ड (संशोधनाधारित) किंवा प्रोजेक्ट बेस्ड (प्रकल्पाधारित) असल्याने तेथे शिकल्यावर त्या मुलांना आपल्या विद्यापीठातील पारंपरिक पद्धतींशी जुळवून घेणे कठीण जाते.
आजच्या शाळा आणि पाठ्यपुस्तके आजच्या जगासाठी मुलांना तयार करत आहेत का?
विदासंकलन आणि विश्लेषण : विनय, निलेश, अंजली, कांचन, प्रशांत, पायल, गणेश
७ वर्षांपूर्वी एका गावात सुदीपला भेटलो (बदललेले नाव), वय वर्षे २६. सुदीप आणि त्याचा भाऊ १०वीपर्यंत सोबत शिकले. त्याच्यानंतर घरातील आर्थिक परिस्थिती फार चांगली नसल्यामुळे दोघांपैकी एकाचेच शिक्षण शक्य होते. घरातील हुशार मुलगा म्हणून सुदीपचे शिक्षण सुरू ठेवले आणि दुसऱ्या भावाने शेतीची जबाबदारी घेतली. सुदीपने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले, आणि मग कामाचा शोध सुरू झाला. तीन वर्षांपासून त्याच्या हाती काही लागत नाही आहे. घरातील शेतीमध्येही मन लागत नाही आणि इतर काही कामही जमत नाही.
शिक्षणाच्या आईचा घो
कुठल्याही माणसाचा आयुष्याचा उद्देश काय असतो? आजच्या जगात पैशाला इतके महत्त्व आले आहे की पैसा मिळवला म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पैसे मिळविण्याकरिता शिक्षण सगळ्यात महत्त्वाचे आहे असे आपल्याला लहानपणापासून सांगण्यात येते.
गेले काही वर्षे शिक्षणाचा जो काही खेळखंडोबा चालला आहे तो आपण सगळे बघतोच आहोत. काहीही करून मुलांना पुढच्या वर्गात ढकलण्याची धडपड. आता तर काय म्हणे इंजिनीयरिंगला मॅथ्स आणि फिजिक्स हे विषय बंधनकारक असणार नाहीत. अर्थात, यामुळे फार काही नुकसान होणार नाही. पर्याय म्हणून दिलेले इतर विषय पैसे मिळवण्यासाठी कामात आले की मूळ हेतू पूर्ण होणारच.