समाजाच्या एका भागाला लाभदायक आणि आवश्यक वाटणाऱ्या कृती दुसऱ्या एखाद्या भागाला जाचक ठरतात. दुसऱ्याला त्रास देणे, हा पहिल्या गटाचा हेतू नसतो. पण तो अटळ उपपरिणाम मात्र असू शकतो. असे विषमतेला जन्म देणारे, तीव्र करणारे उपपरिणाम अखेर मुळात कोणाला तरी लाभदायक वाटणाऱ्या हेतूंनाच बहकावून नेतात. हे ओळखून असे घातक उपपरिणाम टाळून मूळ हेतू जास्त व्यापक करणे, हाच दूरदृष्टीचा स्वार्थ. यालाच नीतीने वागणे, असेही म्हणतात; आणि विवेकाने वागणे, असेही म्हणतात.
आपण असे समजतो की ही दूरदृष्टी, ही नीतीची जाण, हा विवेक शासनयंत्रणा दाखवेल परंतु दूरदृष्टीने कृती निवडणे सोपे नसते.