अनेक जण असे मानतात, की भारत हा देश खेड्यांमध्येच वसलेला आहे. वास्तव मात्र असे नाही. आज देशातील चाळीसेक टक्के प्रजा नागर आहे. महाराष्ट्रात तर आज नागर प्रजा आणि ग्रामीण प्रजा यांच्या संख्या जवळपास सारख्याच आहेत. हा नुसता आकड्यांचा खेळ नाही. यामागे जीवनदृष्टी, विकासातले अग्रक्रम अशा अनेक मूलभूत बाबी आहेत.
जसे, गांधीवादी-सर्वोदयवादी “खेड्यात जा”, असा संदेश देतात, तर आंबेडकर “शहरांत जा”, असे म्हणतात. गांधीविचारांत पंचायत-राज, विकेंद्रीकरण महत्त्वाचे आहे. आंबेडकर असे मानतात की कृषिप्रधान, जातींच्या उतरंडीने निबद्ध अशा खेड्यांमध्ये संख्येने भरपूर असलेल्या दलितांना न्याय मिळणार नाही; त्यासाठी औद्योगिक, केंद्रीभूत परस्परावलंबनावर बेतलेली शहरेच उपयोगी ठरतील.
स्मिथ, मार्क्स आणि गांधी
अर्थशास्त्राचा जनक अॅडम स्मिथ याला नुसते अर्थशास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा अर्थतत्त्वज्ञ म्हणणे जास्त उचित ठरेल. राजसत्ता आणि अर्थकारण यांचा अन्योन्यसंबंध तपासण्याची त्याला अठराव्या शतकातच गरज भासली. त्याच्या दूरदर्शीपणाचा हा पुरावा आहे.
अँडम स्मिथ ग्रेट ब्रिटनचा नागरिक होता आणि ‘औद्योगिक क्रांती’चे जन्मस्थान इंग्लंड मानले जाते. याच इंग्लंडात पुढे कार्ल मार्क्स हाही अर्थतत्त्वज्ञ येऊन राहिला होता आणि भांडवलाची चिकित्सा करणारा आपला ग्रंथ त्याने औद्योगिक क्रांतीच्या वाढत्या पडछायेत लिहिला. ज्या लंडन शहरात अॅडम स्मिथ आणि कार्ल मार्क्स यांनी आधुनिक संस्कृती आणि अर्थकारण यांचे परस्परसंबंध मांडण्याचा प्रयत्न केला, त्याच लंडन शहरात मोहनदास करमचंद गांधी ह्या – महात्मा म्हणून ओळखल्या गेलेल्या – भारतीयाला पाश्चात्त्य संस्कृतीचे जवळून दर्शन घडले.
अभिप्राय : लिहावे नेटके
माधुरी पुरंदरे ह्यांचे नाव वाचू आनंदे ह्या अद्वितीय पुस्तकाच्या कर्त्या म्हणून आपणाला माहीत आहे. आता लिहावे नेटके हे पुस्तक त्यांच्या लेखणीतून उतरले आहे. वाचनामध्ये गोडी निर्माण झाली की लेखनाला सुरुवात करावी आणि त्यामध्ये सर्वांनी प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची इच्छा त्यांच्या ह्या उपक्रमांतून आपणाला दिसून येते. त्या नुसती इच्छा मनात बाळगून स्वस्थ बसल्या नाहीत तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अपार कष्ट उचलले आहेत. त्यांच्या ह्या दोनही प्रयत्नांची प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे.
लिहावे नेटके हे पुस्तक वाचताना त्यांनी केलेल्या व्यासंगाचे जे दर्शन आपल्याला होते त्याने आपण दिपून जातो.
पुस्तक-परिचय : द प्रेग्नंट किंग
डॉ. देवदत्त पट्टनाईक यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे (पेंग्विन, 2008).
पुस्तकाच्या नावात जितका सरळपणा आहे तितक्याच सरळ भाषेत लिहिलेली, महाभारताच्या काळातली आणि महाभारताला समांतर जाणारी ही कथा आहे. कथेत काही महाभारतातली पात्रे गोवलेली आहेत.
कथा दोन पातळ्यांवर लिहिली आहे. एक म्हणजे मुख्य कथेचा धागा जो पुढे सरकतो आणि दुसरी म्हणजे, मुख्य कथेच्या अंगाने येणाऱ्या अनेक उपकथा, दंतकथा आणि त्या काळातल्या संस्कृतीतल्या संकल्पनांची लेखकाची स्पष्टीकरणे.
थोडे कथेबद्दल
इलवृत्त नावाच्या राज्याच्या युवनाश्व नावाच्या राजाची ही गोष्ट आहे. युवनाश्वाचे वडील प्रसेनजित त्याच्या जन्माच्या आधीच मरतात.
एका विचारवंताची रोजनिशी
स्वतःचे विचार, भावना, येणारे अनुभव आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबतच्या प्रतिक्रिया, अशा अनेक गोष्टी माणसं नोंदत असतात. मित्रांना, सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांमधून विचारांची देवाण-घेवाण करत असतात. अनेक पाश्चात्त्य लेखकांच्या, विचारवंतांच्या अश्या डायऱ्या, जर्नल्स, पत्रसंग्रह नंतर प्रकाशित झाले आहेत. अमेरिकन कादंबरीकार जॉन स्टाइनबेक तर त्याची ग्रेप्स ऑफ राथ ही कादंबरी लिहीत असताना बरोबरच एक डायरीदेखील लिहीत असे. गाणारा गायक जसा बैठकीच्या आधी गळा मोकळा करतो तसा स्टाइनबेक आधी डायरी लिहून हात मोकळा करत असे.
व्हर्जिनिया वूल्फ, कॅथरीन मॅन्सफील्ड ह्या लेखिकांच्या डायऱ्या, पत्रे वाचताना फार मजा वाटली होती.
संपादकीय खरे वृत्त शोधपत्रकारिता?
गेले काही महिने प्रसारमाध्यमांतून वेगवेगळे घोटाळे गाजत आहेत. यांपैकी 2 जी घोटाळा या नावाने ओळखला जाणारा, तो सगळ्यांत थोर. पावणेदोन लाख कोटी रूपये महसूल या घोटाळ्यामुळे बुडला, असे सांगितले जाते. हे नुकसान किती काळात झाले, हे मात्र कुठेही नोंदले गेलेले नाही. महसूल नेहेमी विशिष्ट काळात कमावला जात असतो. जर असा काळ नोंदला गेला नसेल, तर तो आकडा निरर्थक ठरतो. पण पावणेदोन लाख कोटी हा आकडा मोठा तर खराच; आजच्या भारतातील प्रत्येक माणसामागे सुमारे दीड हजार रुपये येवढा तो आकडा आहे. किती काळात हे पैसे बुडले, हे मात्र स्पष्ट नाही.
संस्कृतीची जादू
संस्कृतीची जादू
औद्योगिकीकरणाने जन्माला घातलेली स्थलांतराची प्रक्रियाही इंग्लंडमध्ये अनपेक्षित होती. त्याचे सामाजिक परिणाम तीव्र होते.
औद्योगिक नगरांनी औद्योगिक कामगार घडविले खरे, पण त्यांचे पालनपोषण, संगोपन करण्याची काहीच व्यवस्था तेथे निर्माण झाली नव्हती. अपत्यसंगोपनाचा काहीच अनुभव नसलेल्या बाईला ज्या गोंधळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्याचा अनुभव त्या गावातील प्रशासकांना येत असावा. त्या काळातील नागरी परिस्थितीचे वर्णन अॅलेक्सी डी तॉकव्हिल या फ्रेंच प्रवाशाने अतिशय भेदकपणे केले आहे. तो म्हणतो:
“माणसाच्या कर्तृत्वामुळे जग सुपीक होते आहे. येथे घाणीने भरलेल्या गटारातून सोने वाहते आहे. येथे मानवाने विकासाचे परमोच्च शिखर गाठले आहे.
स्वयंसहायता समूह व स्त्रियांचे सक्षमीकरण
स्त्रियांच्या सक्षमीकरणाची गरज काय आहे? आज या विषयावर विचार करायला आपण प्रवृत्त होतो, हीच आजची वास्तविकता आहे. स्त्रिया सक्षम कशा होतील या विषयावर चर्चा, वादविवाद, विनोद होताना दिसतात कारण समाजावर पितृसत्ताक समाजरचनेचा प्रभाव आहे. या संदर्भात स्त्रियांच्या सक्षमीकरणाकरिता त्यांना सोई, सवलती, आरक्षणे देण्यालाही अनेकांचा आक्षेप आहे.या विषयावर सामान्य जन व राजकारणी यांच्यामध्ये मतभिन्नता असल्याचे आपल्याला दिसून येते. स्त्रियांचे सक्षमीकरण हा सामान्य महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय न राहता हा विद्यापीठे, स्त्री-अध्ययन केन्द्र, महिला संघटना, स्वयंसेवी संस्था ह्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. बचतगट अथवा व स्वयंसहायता गट यामुळे स्त्रियांच्या सक्षमीकरणाची प्रक्रिया घडून येते असे गृहीत धरण्यात येऊन आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर या कार्याची कार्यक्रम म्हणून आखणी सरकारी पातळीवरून योजनेच्या स्वरूपात करण्यात आली आहे.
अरब जगाताल उठाव : वादळ की वावटळ?
डिसेंबर 2010 च्या उत्तरार्धात उत्तर आफ्रिकेच्या टोकावर वसलेल्या लहानशा ट्यूनिशिया देशातल्या जनतेने त्या देशावर 23 वर्षे सत्ता गाजविणारे अध्यक्ष झिने अल अबिदिन बिन अली यांच्याविरुद्ध उठाव केला, तेव्हा पुढे घडणाऱ्या महाभारताची ती नांदी आहे असे फारच कमी लोकांना वाटले असेल. पण ट्युनिशियापाठोपाठ शेजारच्या लिबिया आणि इजिप्तमध्येही या उठावाची लागण झाली. 17 जानेवारी 2011 रोजी ट्युनिशियाचे अध्यक्ष बिन अली पायउतार झाले. महिन्याभराच्या आतच, 11 फेब्रुवारीला, इजिप्तच्या जनतेने सुमारे 32 वर्षे सत्तेवर असलेल्या अध्यक्ष होस्नी मुबारक यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. लिबियामध्ये राजधानी त्रिपोलीपाठोपाठ पूर्वेकडील बेनगाजी शहरातही अध्यक्ष मुअम्मर गडाफी यांच्याविरोधात प्रचंड मोठे आंदोलन सुरू झाले.
पुस्तक-परिचय समृद्धीची उत्क्रांती
प्रत्येक जातीमधील प्राणी बालपण, तारुण्य आणि म्हातारपण ह्या स्थितींमधून जाताना केवळ त्याच्या निसर्गदत्त क्षमतांचा वापर करतो. मनुष्य हा एकच प्राणी असा आहे की त्याच्या आयुष्याच्या काळात व्यक्ती आणि मानवजात ह्या दोन्ही पातळ्यांवर तो विकसित होत असतो. माणसाची प्रत्येक नवीन पिढी ही आधीच्या पिढ्यांनी रचलेल्या पायावर नवीन रचना करीत असते.
– अॅडम फर्ग्युसन
ॲन एसे ऑन द हिस्ट्री ऑफ सिव्हिल सोसायटी
आवडलेल्या पुस्तकाची सुबुद्ध मराठी वाचकांना ओळख करून द्यावी म्हणून लिहायला सुरुवात केली. परंतु पुस्तकाच्या शीर्षकाचे मराठी भाषांतर काय करावे येथपासून अडचण सुरू झाली.