समता (भाग 2) पुस्तकपरिचय : द स्पिरिट लेव्हल

[गेल्या अंकात विषमता आणि चिंता, विषमतेचे माप, आसास निर्देशांक हे भाग पूर्ण आले. आलेख आणि सांख्यिकी याची सुरुवात येथे पुन्हा देत आहोत.]
TSL मधील सर्व आलेख खालच्या डाव्या कोपऱ्यात सुरू होतात. आडव्या अक्षावरील मापे उजवीकडे वाढत जातात, तर उभ्या अक्षावरील मापे वरच्या दिशेने वाढत जातात. अशा आलेखांत डावीकडे खाली सुरू होऊन उजवीकडे वर जाणारी रेषा दोन मापांचा थेट संबंध दाखवते; म्हणजे आडवे माप जास्त तर उभेही माप जास्त. याउलट डावीकडे वरून सुरू होऊन उजवीकडे खाली जाणारी रेषा व्यस्त संबंध दाखवते, की आडवे माप जास्त तर उभे माप कमी.

पुढे वाचा

विकासनीतीची प्रतीकचिह्न (भाग-२)

1966 मध्ये भारतात हरितक्रांतीची सुरुवात झाली. ही सुरुवात तशी दणकेबाज होती. 1965-66 मध्ये भारतात अन्नधान्याचे एकूण उत्पादन 72.35 दशलक्ष टन होते. त्यानंतर फक्त 5 वर्षांत, म्हणजे 1970-71 मध्ये या उत्पादनाने 108.42 दशलक्ष टनाचा उच्चांक गाठला. ही घटना इतकी क्रांतिकारी होती की त्यातून कुठे तरी हरितक्रांती या शब्दाची निर्मिती झाली असावी. खरे तर या क्रांतीच्या मुळात असलेली नवी विकसित बियाणे देशात इतर ठिकाणीही वापरात आणण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण इतर राज्यांच्या तुलनेत हरितक्रांती सर्वाधिक वेगाने पसरली ती पंजाब आणि हरयाणामध्येच.
पंजाबमधले अन्नधान्य उत्पादन 1965-66 मध्ये 3.39 दशलक्ष टन होते, ते वाढत वाढत 1985-86 मध्ये 17.22 दशलक्ष टनापर्यंत पोचले.

पुढे वाचा

एक क्षण स्तब्धता

या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी
या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी
मी तम्हाला एक क्षण स्तब्ध राहण्याची विनंती करेन;
… त्यांच्या स्मरणार्थ जे अकरा सप्टेंबरला
वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मारले गेले….
… आणि त्यांच्यासुद्धा, जे त्या हल्ल्याच्या सूडापोटी
छळले गेले, तुरुंगात टाकले गेले, दिसेनासे झाले,
अत्याचारित आणि बलात्कारित झाले, आणि मारले गेले..
…अमेरिका आणि अफगाणिस्तान, दोन्ही देशातल्या पीडितांसाठी
आणि मी अजून एक विनंती करू शकत असेन तर…
… स्तब्धतेची – एक पूर्ण दिवस,
त्या हजारो पॅलेस्तीनींसाठी जे अमेरिकेच्या हातांनी
आणि पाठोपाठ दशकानुदशके इस्रायली फौजांच्या
अतिक्रमणाने मारले गेले.

पुढे वाचा

इतिहासकार

भांड्यात दूध उकळत ठेवले तर ते उतू जाते. असे का घडते हे मला माहीत नाही, आणि माहीत करून घ्यावेसे वाटलेही नाही. या प्रश्नावर मला कोणी छेडले तर मी बहुधा त्याचे कारण हे देईन की दुधाच्या ठिकाणी उतू जाण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. ते तसे खरेही आहे, पण त्याने काहीच स्पष्ट होत नाही. पण मग मी काही भौतिक शास्त्रज्ञ नाही. त्याचप्रमाणे भूतकालीन घटनांविषयी, त्या तश्या का घडल्या हे जाणून घेण्याची इच्छा न बाळगता एखादा त्याच्यासंबंधी वाचन किंवा लेखनही करू शकेल. किंवा एखाद्याला इतके म्हणणे पुरेसे वाटेल, की दुसरे जागतिक महायुद्ध घडून आले.

पुढे वाचा

पत्रसंवाद

अरुंधती डांगे, 9, लक्ष्मी-सदा अपार्टमेंट, विकासनगर, वर्धा रोड, नागपूर मोबा.9371458002
आजचा सुधारक या मासिकाचे दोन्ही मराठीकारण विशेषांक वाचले. संपूर्ण लेखकवर्गाने अत्यंत कळकळीने मराठीकारणासंबंधी आपले विचार मुद्देसूद रीतीने मांडले आहेत आणि हे खरोखरीच फार आवश्यक होते.
‘मराठी भाषेला सध्या अत्यंत दुर्गती प्राप्त झाली असून, तिच्या या अवस्थेला बरीच कारणे जबाबदार आहेत’, असे म्हणण्याची किंवा चर्चा करण्याची सध्या पद्धत – ज्याला आपण फॅशनही म्हणू शकतो – आलेली आहे.
माझी आई आजारी असेल तर त्यामागे परकीय शक्तीचा हात असला पाहिजे, असे न मानता, तिची सेवा आणि योग्य तो औषधोपचार करून तिला ठणठणीत बरी करणे हे मी माझे जिव्हाळ्याचे काम समजते – कर्तव्य समजत नाही.

पुढे वाचा

समता पुस्तक-परिचय : द स्पिरिट लेव्हल

विषमता आणि चिंता

माणसे सतत एकमेकांशी तुलना करत असतात. उंची, वजन, रंगरूप अशा सुट्या गुणांपासून सुरू होत तुलना अखेर सामाजिक स्थानापर्यंत जाऊन पोचते. रॅल्फ वॉल्डो इमर्सन या अमेरिकन विचारवंत व साहित्यिकाने नोंदले, “प्रत्येक माणसाच्या नजरेत एकूण माणसांच्या प्रचंड श्रेणीपटातले स्वतःचे स्थान नेमके ठरलेले असते, आणि आपण सतत ही मोजपट्टी वाचायला शिकत असतो, याची खात्री आहे.’ (‘Tis very certain that each man carries in his eye the exact indication of his rank in the immense scale of men, and we are always learning to read it).

पुढे वाचा

‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’: जन-आरोग्य-अभियानाची भूमिका

पार्श्वभूमी
2000 साली आपण जनस्वास्थ्य अभियानची स्थापना केली तेव्हापासून आपण ‘सर्वांसाठी आरोग्य’ या ध्येयासाठी एकत्रित येऊन काम करत आहोत. आरोग्यदायी अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण, पर्यावरण, रोजगार हे सर्व भारतातील सर्व जनतेला देणारी अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था उभी राहिल्याशिवाय ‘सर्वांसाठी आरोग्य’ हे ध्येय प्रत्यक्षात येणार नाही. त्यासाठीचा लढा फार मोठा व्यापक लढा आहे. या व्यापक लढ्याच्या संदर्भात अन्न-सुरक्षेसाठी चाललेल्या लढ्यात जन स्वास्थ अभियान म्हणून काही विशिष्ट योगदान आपण एका बाजूला करायचे तर दुसऱ्या बाजूला सर्वांसाठी आरोग्य-सेवा’ या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करायचे असे आपण ठरवले.

पुढे वाचा

विकासनीतीची प्रतीकचिह्न (भाग-१)

विचारायला हवेत असे काही प्रश्न
संसदेला उद्देशून 20 एप्रिल 2005 ला केशूभाई पटेल-गुजरातचे माजी मख्यमंत्री म्हणाले होते, “आपल्याकडे जर भाक्रा नांगल नसते तर आज आपण रेशनच्या रांगेत उभे असतो.” असे म्हटले जात असताना देखील प्रत्यक्षात लाखो लोक भूक आणि कुपोषण ह्यांना सामोरे जात असलेले आपल्याकडे होते. यातील उपरोधाचा भाग बाजूला ठेवला तरीही या विधानावरून भाक्रा नांगल प्रकल्प हे भारताच्या विकासविषयक चर्चेतले एक प्रतीकचिह्नच कशाप्रकारे बनून गेलेले होते याची प्रकर्षाने जाणीव होते.
अशी प्रतीकचिह्न असण्याचा एक महत्त्वाचा फायदा असतो. फारसे काही न सांगताही आपला दृष्टिकोण काय आहे, आपल्याला काय महत्त्वाचे वाटते हे त्यावरून स्पष्ट होते.

पुढे वाचा

मोठ्या धरणाची सामाजिक किंमत

विस्थापित झालेले लाखो लोक आज अस्तित्वातच नाहीत. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ते त्या इतिहासातही नसतील, तेव्हा आकडेवारी म्हणूनही नसतील. काहीजण तर तीन-चार वेळा विस्थापित झालेले आहेत. एखादे धरण, दारूगोळा सरावासाठी जागा, युरेनियमची खाण, एखादा ऊर्जा प्रकल्प…! एकदा घसरण सुरुवात झाली की थांबायला वावच नसतो. त्यातले बहुसंख्य लोक, यथावकाश आपल्या मोठ्या शहरांच्या परिघावरील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन पडतात आणि स्वस्त बांधकाम मजुरांमध्ये सामावले जातात. हे खरे आहे की त्यांना नष्ट केले जात नाही किंवा गॅसचेंबर्समध्येही पाठविले जात नाही. पण माझी खात्री आहे की त्यांचे जगणे हिटलरच्या कोणत्याही छळछावणीपेक्षाही भयानक असते.

पुढे वाचा

मराठी माणूस आणि उद्योजकता

एखाद्या समाजाला स्वतःच्याच भूमीवर आपल्या भाषेसाठी, आपल्या सामाजिक अस्मितेसाठी संघर्ष करावा लागणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. आज मराठी समाजावर हीच वेळ ओढवली आहे. याला कारणीभूत कोण आहे? अर्थात आपणच! आपली अनाठायी सहिष्णु वागणूक, राजकारण्यांची स्वार्थी वृत्ती, समाजधुरीणांची उदासीनता अशी अनेक कारणे यामागे आहेत. या सगळ्या कारणांसोबतच आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक बाजूकडे होत असलेले आपले दुर्लक्ष! दारिद्र्य आणि सज्जनपणा यांची आपण निष्कारणच जोडी जमवली आहे. श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करणे हा आपल्याला दुर्गुण वाटतो. ठेविले अनंते तैसेचि रहावे किंवा अंथरूण पाहून पाय पसरावे अशा उक्ती आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीने मनावर घेतल्या आहेत.

पुढे वाचा