प्रश्न : आज बहुसंख्याकवाद आणि धार्मिक हिंसेला सामोरे जाताना हा विषय आपण घेतला आहे, तेव्हा हा जो बहुसंख्याकवाद आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं?
विश्वंभर चौधरी : आपल्याला एक सवय झाली आहे की बहुसंख्याकवाद हा आपण फक्त धार्मिक अंगानी पाहतो. पण आपल्या सोयीसाठी तो आपण जातीय अंगानीपण पहायला पाहिजे. मला एक चर्चा आठवते – एबीपी माझा ह्या चॅनेलसाठी झालेली आणि ठाण्याच्या एका हिंदुत्ववादी ग्रुपसोबत – त्या चर्चेत मी होतो आणि नाव बदलण्याचा मुद्दा त्यात होता. औरंगजेब रोडचं नाव बदलण्याचा असा काहीतरी मुद्दा होता.