‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकातील लेखांवर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यांपैकी काही नवे मुद्दे, प्रश्न व विचार व्यक्त करणार्या प्रतिक्रिया संबंधित लेखांच्या खाली प्रकाशित केल्या आहेतच.
ह्या विशेषांकात इतर लेखांव्यतिरिक्त ‘सुधारक’च्या ऑक्टोबर २०१९ च्या अंकात प्रकाशित झालेल्या डॉ. सुभाष आठले ह्यांच्या ‘मेकॉले, जी एम फूड्स आणि कॅन्सर एक्सप्रेस’ ह्या लेखावरील प्राची माहूरकर ह्यांची प्रतिक्रिया प्रकाशित केली. त्यावरही अनेकांचे अभिप्राय आले. त्यांपैकी निवडक लेखाखाली प्रकाशित केले आहेतच.
‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकात डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांच्या “या मार्गानेच जाऊया” या लेखाच्या पुन:प्रसिद्धीनिमित्ताने अंबुजा साळगांवकर आणि परीक्षित शेवडे ह्यांनी आपली प्रतिक्रिया पाठवली.