विषय «श्रद्धा-अंधश्रद्धा»

किर्लोस्कर मासिक, अंधश्रद्धा निर्मूलनाची एक सामाजिक चळवळ

महाराष्ट्रातील औंध संस्थानात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१० साली पहिला उद्योगसमहू काढला. ह्या किर्लोस्कर उद्योगसमहूाचे ‘किर्लोस्कर खबर’ हे मुखपत्र हे त्या काळचे एक नवमतवादी, पुढारलेले मासिक होते. १९२० ऑगस्टला त्याचा पहिला अंक निघाला. 

आपल्या समाजात ज्या अनिष्ट कल्पना व रूढी बोकाळल्या आहेत त्यांचे स्वरूप उघडे करून त्यांना आळा घालण्याचे प्रयत्न हे मासिक करील असे आश्वासन शंकरराव किर्लोस्कर यांनी या अंकात दिले. सामाजिक सुधारणा, जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये वैचारिक पातळीवर किर्लोस्कर मासिकातून तर प्रत्यक्षात किर्लोस्करवाडीमध्ये जोपासली जातच होती. र.धों. कर्वे, महादेवशास्त्री दिवेकर, वि.दा.

पुढे वाचा

नास्तिकता कशासाठी?

आस्तिकता आणि नास्तिकता ह्या दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आपल्या आजूबाजूच्या समाजातील माणसे काही प्रमाणात आस्तिक तर काही प्रमाणात नास्तिक असतात. पण उघडपणे आपण आस्तिक आहोत असे सांगणाऱ्यांपेक्षा नास्तिक आहोत असे सांगणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. ज्यांची धर्मग्रंथ, श्रुती-स्मृती, मंत्रसंहिता, उपनिषदे ह्यांवर परमश्रद्धा आहे आणि ज्यांना वेदाच्या दिव्यतेबाबत आस्था आहे अशांना आस्तिक म्हणतात. तर ज्यांचा वेदावर विश्वास नाही, जे वैदिक सिद्धांताबाबत तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची चिकित्सा करतात ते नास्तिक आहेत. मात्र नास्तिकता म्हणजे एवढेच असे नव्हे. नास्तिकता म्हणजे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टिकोन होय.

पुढे वाचा

नास्तिकांचे अध्यात्म

सध्या इये मराठीचिये देशी नास्तिक मेळाव्यांचा हंगाम आहे. आयोजनातील वीरश्री पहाता लवकरच नास्तिकांसाठी आरक्षणाची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, सावधान!!! त्याचवेळी हे ‘असले’ मेळावे घेऊन काय साध्य होणार? ह्या प्रश्नावर घमासान चर्चा झडत आहेत. एकुणांतच नास्तिकांत हाणामाऱ्या फार. सगळेच शहाणे, तेंव्हा असे होणारच. त्यात सर्व नास्तिकही समान नाहीत. त्यातही देव नाहीच अशी खात्री असलेले/ल्या, नुसती शंका असणारे/ऱ्या, निसर्गपूजक असे प्रकार आहेत. त्यामुळे इथे जरी मी ‘नास्तिक असे करतात’ वगैरे विधानार्थी भाषा वापरली असली तरी मी आपला माझ्यापुरता बोलतो आहे. ‘आपुलाचि वाद आपणांसी’ अशा प्रकारचा हा संवाद आहे.

पुढे वाचा

नास्ति(ऐ)क्याची गोची!

नास्तिक म्हणून काहीही लिहिताना दहा वेळा विचार करावा लागतो. प्रथम “लिहायची गरज आहे का? सगळे तेच तेच तर लिहितात!” ही स्वतःलाच बजावणी! घरच्यांना सांगितल्यावर “तुला काय करायचे ते उद्द्योग कर बाहेर, आम्हांला नको सांगू, तुमच्या पापात आम्ही सहभागी नाही” अशी आपण वाल्मिकी होण्याची कोणतीही शक्यता नसतानाही वाल्या-कोळ्यास कुटुंबाकडून मिळालेली सणसणीत प्रतिक्रिया आपणास देतील का? तरीही मनाचा हिय्या करून लेख लिहिल्यावर तो “छापणाऱ्याला आवडेल का आणि लोक तो वाचतील का? अश्या असंख्य प्रश्नांना पार करून मगच हा लेखरूपी गर्भ आकार घेऊ लागतो!

पुढे वाचा

आरोग्याविषयीच्या अंधश्रद्धा व उपचार

आपले आरोग्य चांगले असावे असे कोणाला वाटत नाही? मला शारीरिक व्याधी जडू नये, मला कोणताही मानसिक आजार होऊ नये ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र हे होऊ नये यासाठी जी काळजी घ्यावी लागते त्यासाठी मात्र कोणाचीच तयारी नसते. कारण ही तयारी ठेवायची तर स्वतःला खूप बदलावे लागते. आरोग्याबाबतच्या अंधश्रद्धेचेही असेच आहे. आरोग्य तर चांगले पाहिजे पण त्याच्याशी संबंधित अंधश्रद्धा सोडायच्या नाहीत, तर हे जमणार कसे? यासाठी आरोग्य आणि अंधश्रद्धा यांचा काय संबंध आहे हे आपण आता समजून घेऊया.

आरोग्याशी संबंधित अनेक अंधश्रद्धा आहेत, ज्या निखालसपणे अज्ञानावर आधारित आहेत.

पुढे वाचा

श्रद्धा आणि श्रद्धा

आदरांजली : मेघश्याम पुंडलिक रेगे
(२४-१-१९२४ ते २८-१२-२०००)

महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानात्मक व वैचारिक क्षेत्रात गतशतकाच्या उत्तरार्धात ज्यांनी आपल्या वैचारिक व्यक्तिमत्वाने ठसा उमटविला, त्यांपैकी प्रा. मे.पुं. रेगे हे एक महत्त्वाचे विचारवंत होते. त्यांच्या जीवनाचे वर्णन करतांना प्रा. रा.भा. पाटणकरांनी लिहिले आहे, “प्रा. रेगे एक तत्त्वज्ञ, प्रबोधनकार आणि सॉक्रेटिक शिक्षक होते. त्यांचे जीवन म्हणजे समाजातील सर्व थरांवर काम करीत करीत मुक्त होण्याचा एक मूर्तिमंत प्रवास होय.”

तर, तत्त्वज्ञ दि.य.देशपांडे यांनी रेग्यांविषयी लिहिले आहे, “या व्यक्तीपुढे आपण सर्व खुजे आहोत हे सतत जाणवते.”

स्वत: ‘आजचा सुधारक’ परिवाराने त्यांच्याविषयी म्हटले आहे, “प्रा.

पुढे वाचा

अविनाश पाटील ह्यांचे भाषण

‘ब्राइट्स सोसायटी’च्या वतीने आयोजित या नॅशनल एथिस्ट कॉन्फरन्सच्या उद्घाटनसमारंभाच्या निमित्ताने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच इतर सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो कारण त्यांनी भारतीय सांवैधानिक व्यवस्थेने दिलेल्या अधिकाराला मूर्त स्वरूप दिलेले आहे. संस्थेची नोंदणी करून जे काही अधिकार, स्वातंत्र्य मिळवलेले आहे ते पुढच्या काळात ब्राइट्सच्या वतीने चाललेल्या, चालवायच्या कामाला एक मोठा अवकाश निर्माण करून देऊ शकेल. तो अवकाश काय असू शकतो? कदाचित ॲड. असीम आपल्याला सांगतील. पण एक महत्त्वाची पायरी आपण ओलांडली आहे आणि ती पायरी ओलांडल्यामुळे आता आपल्या संसदेला पर्याय म्हणून ‘धर्मसंसद’ उभी करणाऱ्यांनादेखील आपण ‘काटे की टक्कर’-अगदी कॉन्स्टिट्यूशनली आणि लीगली-देऊ शकतो; अनुषंगाने आपली पायाभरणी झाली आहे असं म्हणू शकतो आणि यासाठी पुन्हा एकदा ब्राइट्सच्या सात-आठ हजार सहकाऱ्यांचं, सदस्यांचं, हितचिंतकांचं अभिनंदन.

पुढे वाचा

अविनाश पाटील ह्यांच्या भाषणाचे समालोचन

डिसेंबर २०२२ च्या १८ तारखेला पुण्यातल्या गोखले सभागृहात राष्ट्रीय नास्तिक परिषद थाटात सम्पन्न झाली. परिषदेची सुरुवात अविनाश पाटील यांच्या विचारप्रवर्तक भाषणाने झाली. अविनाश हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ब्राइट्सचे जुने स्नेही आणि सहयोगी आहेत. महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर आपल्यातून हिरावले गेले, त्यावेळी बसलेल्या तीव्र धक्क्यातून आणि कठोर अग्निपरीक्षेतून बाहेर पडण्यासाठी अविनाश यांनी अंधश्रद्धांशी लढ्याचा अधिक तीव्र निर्धार केला. दाभोलकरांची हत्या ही कदाचित अजूनही त्याचा ‘तपास’ करणाऱ्या CBI साठी एक रहस्य असेल, पण जगभरच्या विवेकवादींसाठी ते तसे नाही.

पुढे वाचा

शिवप्रसाद महाजन ह्यांचे भाषण

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आजच्या या ब्राइट्स सोसायटीच्या परिषदेत तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रविवारची सकाळ असूनदेखील सर्वांनी उत्साह दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि अभिनंदन. ब्राइट्स सोसायटीच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. जे अनेक विचारवंत, लेखक, मान्यवर यांची भाषणं ऐकत आणि व्हिडीओ पहात मी इथपर्यंत आलो आहे, ते बरेच मान्यवर समोर बसलेले पाहून थोडं दडपण येतं. तसचं दडपण मलाही आलेलं आहे. ब्राइट्स सोसायटीने आजपर्यंत अनेक परिषदा-मेळावे केलेले आहेत, अजूनही चालू आहेत. त्यांनी अनेक विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या, त्या प्रकाशित केल्या, पुस्तकसुद्धा प्रकाशित केलेलं आहे.

पुढे वाचा

असीम सरोदे ह्यांचे भाषण

कुमार नागे यांची एक वेगळी स्टाईल आहे, जी कोणालाही कॉपी करता येत नाही आणि अशी त्यांनी माणसं जोडलेली आहे. तर ही ताकद आणि सम्यक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे. विशेषत: सामाजिक आणि रचनात्मक काम करताना. मंचावर उपस्थित मान्यवर आणि पुढे बसलेले मित्र-मैत्रिणींनो, मी आज काही महत्त्वाचं बोलणार आहे असं सांगितल्यामुळे खूप मोठी जबाबदारी येऊन पडते की महत्त्वाचंच बोलायला पाहिजे, त्यामुळे ते ऐकल्यावर तुम्हीच ठरवा की ते महत्त्वाचं आहे का? तर मागेही मी या विषयावर बोललो होतो, पण काही नवीन गोष्टी आहेत त्यांबद्दल उल्लेख करायला पाहिजे.

पुढे वाचा