आंतरधर्मीय विवाह, मानवी नातेसंबंध, कलमा
________________________________________________________
मुस्लीम मुलगा व ख्रिश्चन मुलगी ह्यांचा विवाह, तोही आजच्या ३५ वर्षांपूर्वी.सुनबाई तर हवीशी आहे, पण तिचा धर्म न बदलता तिला स्वीकारले, तर लोक काय म्हणतील ह्या पेचात सापडलेले सासरे व प्रेमाने माने जिंकण्यावर विश्वास असणारी सून ह्यांच्या नात्याची हृद्य कहाणी, मुलाच्या दृष्टीकोनातून —
________________________________________________________
आमच्या लग्नाला कोणाचा विरोध नव्हता. आशाबद्दल तक्रार नव्हती. आमचे वडील तिच्या गुणांचे कौतुक करायचे. परंतु तिने मुसलमान व्हावे एवढीच त्यांची अट होती. आम्ही एकमेकाला व्यक्ती म्हणून पसंत केले होते. धर्मांतराचा विषयच नव्हता.
विषय «विषमता»
ऱ्होड्सचे पतन होताना
ऱ्होड्स, इतिहासाचे पुनर्लेखन, द. आफ्रिका , वर्णद्वेष
—————————————————————————–
राष्ट्रवाद ही सतत प्रगमनशील संकल्पना आहे. प्रत्येक राष्ट्राच्या, राष्ट्रवादाचे कल्पनाविश्व वेगवेगळे असते व प्रत्येक राष्ट्रामध्ये यासंदर्भात स्थित्यंतरेही होत असतात. इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या काळात एकेकाळी आदरस्थानी असणाऱ्या पण आता व्यापक समुदायाच्या रागद्वेषाचे लक्ष्य बनलेल्या प्रतीकांचे काय करायचे? ह्या प्रश्नाकडे डोळसपणे बघायला शिकविणारा हा लेख ..
—————————————————————————–
अद्भुतरम्य इतिहास
19 वे आणि 20 वे शतक राजकीय नेत्यांच्या आणि महापुरुषांच्या (Heroes) पुतळ्यांच्या उभारणीचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. विशेषत: 19 व्या शतकात उदयास आलेल्या अद्भुतरम्य (Romanticist) इतिहासलेखन-परंपरेमुळे या प्रक्रियेला गती मिळाली.
ग्राउंड झीरो: जे एन यु
जे एन यु, देशद्रोह, शैक्षणिक स्वातंत्र्य
—————————————————————————–
गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ — जे एन यु – सर्वत्र गाजते आहे. तेथील विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार ह्याला देशद्रोहाच्या आरोपावरून झालेली अटक, तीस हजारी कोर्टाच्या आवारात वकिलांनी त्याच्यावर चढवलेला हल्ला, काही दूरचित्रवाहिन्यांनी व संसेदेच्या व्यासपीठावरून खुद्द सत्ताधारी पक्षाने जेएनयुची देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून केलेली संभावना व्यथित करणाऱ्या आहेत. सादर आहे ह्या घटनाक्रमाचा जेएनयुत जाऊन मुळापासून घेतलेला आढावा.
—————————————————————————–
नवी दिल्लीच्या महरौली-वसंतकुंज भागात वसलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे.
डावे पक्ष आणि जातीचा प्रश्न
डावे पक्ष, जात, डॉ. आंबेडकर
———————————————————————————-
गेल्या नव्वद वर्षांत अनेक ऐतिहासिक घोडचुका करून व त्यातून काही न शिकून भारतातील डाव्या पक्षांनी आपली वैचारिक दिवाळखोरी वारंवार सिद्ध केली आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेले कम्युनिस्ट आता अस्तित्वाच्या संकटात सापडले आहेत. अशा वेळी भारतीय समाजव्यवस्थेतील ‘जात’ ह्या मूलभूत घटकाचा पुनर्विचार करण्याचा संकेत दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी दिला आहे. त्यांच्या ह्या समीक्षेची समीक्षा करणारा हा लेख.
—————————————————————————
इसवी सन २०१६ मध्ये होणारी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक ही भारतातील डाव्या पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.
अनुभव: मुलगी दत्तक घेताना
दत्तक, स्त्री-पुरुष भेदभाव
—————————————————————————
एकविसाव्या शतकात मुलगी दत्तक घेण्याच्या एका जोडप्याच्या निर्णयावर सुशिक्षित समाजाकडून मिळालेला प्रतिसाद, आपल्याला अंतर्मुख करणारा
—————————————————————————
गाथा तिच्या घरी आली त्याला आता पुढच्या महिन्यात (ऑगस्टला) तीन वर्ष होतील. तेव्हा ती एक वर्षाची होती. या तीन वर्षांत आनंदाच्या अगणित क्षणांनी आमची ओंजळ भरलीये तिनं ! मूल दत्तक घ्यायचा निर्णय मी लग्नाआधीच – व्या वर्षी घेतला होता चतुरंगमधल्या एका लेखामुळे. लग्न ठरवताना मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला, अनिलला सांगितलं तेव्हा त्यालाही हा निर्णय आवडला. लग्न झाल्यावर आम्हाला जे मूल होईल त्याच्या अपोझीट सेक्सचं मूल दत्तक घ्यावं असं मला वाटलं.
हिटलरसंबंधी दोन चित्रपट
हिटलर, एकाधिकारशाही, फॅसिझम
आधुनिक मानवी इतिहासातील काळाकुट्ट पट्टा म्हणून दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंची वंशहत्या या घटनेकडे बघितले जाते. त्यासाठीचा खलनायक म्हणून आणि प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या आणि युद्धाच्या काळातील जर्मनीचा हुकूमशहा म्हणून हिटलर आपल्याला ज्ञात आहे. हिटलरसंबंधी दोन चित्रपटांची ओळख करुन देणे हा या लेखाचा हेतू आहे. यातील पहिला चित्रपट आहे ’डाऊनफॉल’; ज्याची मांडणी हिटलरच्या आयुष्यातील शेवटच्या दहा दिवसांतील घटनांवरती आधारलेली आहे. दुसरा चित्रपट आहे ’हिटलर : द राईज ऑफ इव्हिल’; ज्यात हिटलरच्या राजकारणातील प्रवेशापासून तो हुकुमशहा बनण्यापर्यंतच्या कालावधीतील राजकीय घटनांवर आधारलेले चित्रण आहे.
कुंभारवाडा
काळ्या डागांनी गालबोटलेल्या सूर्याने फुंकलेले वारे
भन्नाट भिरभिरतात पृथ्वीच्या चुंबकीय भोवर्यात
मग उभं राहातं ध्रुवप्रदेशात अरोरा बोरिआलिसचं अद्भुत प्रकाशशिल्प,
न्हाऊ घालत घनतिमिर थंडगार प्रदीर्घ रात्रीला
दिसतात कधी सप्तरंगाचे तुषार उडणार्या थेंबांतून निघताना
घुसमटलेल्या प्रतिभेच्या अनावर उन्मेषाप्रमाणे
आणि बहरून येतात फ्रॅक्टल्सच्या अनंत वृक्षांवर रंगभरली फुलं
प्रत्येक परागात त्या वृक्षाच्या अनंत प्रतिमा बाळगून
कुंभारवाड्यात मात्र अजूनही भाजली जातात त्याच जुनाट मातीची भांडी
चार साच्यांची विविधता व अर्धज्ञानी बोटांच्या ठशांची समृद्धता मिरवत
तोच कंटाळवाणा चंद्र जातो ठरल्याप्रमाणे लिंबोणीच्या झाडाआड,
आणि छचोर तोता मैनेच्या पिंजर्यावर सावलीचं जाळं पडतं
लाजेचं काजळ थोबाडावर पसरून मग सूर्यच काळाठिक्कर पडतो
आणि युगायुगांची रात्र निर्लज्जपणे फैलावत राहाते.
पुरोहित राजा आणि राजधर्म
आज (२३ एप्रिल २०१४) सर्व पत्रपंडित आणि ‘पोल’पंडित एकमुखाने सांगत आहेत की येत्या १६ मे रोजी नरेंद्र मोदी यांना भारताच्या पंतप्रधानपदाची वस्त्रे मिळतील. मतभेद असलेच तर भाजपचे संख्याबळ, सरकार बनवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून व आघाडीबाहेरून किती मदत लागेल, त्या मदतीसाठी काय मोल द्यावे लागेल, वगैरे तपशिलाबाबत आहेत.
इथपर्यंत पोचण्यासाठी मोदी, त्यांचा पक्ष भाजपा, त्यांचे ‘माहेर’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या सर्वांनी गेले सहा महिने मोदींची जनमानसातील प्रतिमा बदलण्याचा चंग बांधला आहे. संघ प्रचारक, कट्टर हिंदुत्ववादी, तितकेच कट्टर मुसलमानद्वेष्टे, ही मोदींची प्रतिमा पुसून एक सेक्युलर विकासपुरुष अशी प्रतिमा रेखण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.
इतिहासजमा ?
(नुकतेच मरण पावलेले विंदा करंदीकर यांच्या १९९७ च्या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणातला हा अंश, आपले वायय वृत्त (एप्रिल २०१०) मधून, साभार)
सामान्यतः सुशिक्षित, यशस्वी व सुखवस्तू समाजात वावरत असताना त्यातील माझे काही मित्र मला म्हणतात, “करंदीकर, तुमचे ते मार्क्स व गांधी हे आता इतिहासजमा झाले हे मान्य करा.” हे बोलत असताना ‘शेवटी इष्ट ते घडले’ याचा त्यांना होणारा सात्त्विक आनंदही मला दिसत असतो. पण ते मान्य करण्याच्या अवस्थेत मी अजूनही नाही; अजूनही मी मुख्यतः मार्क्सवादी व थोडासा गांधीवादी आहे.
इतिहासाच्या पुनर्लेखनातले धोके
अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष श्रीयुत सूरजभान यांच्या काही कल्पना विचित्र आहेत. भारतीयांना इतिहासाशी काही घेणेदेणे नाही, या मताला त्या कल्पना दुजोरा देतात. सूरजभान सांगतात की सर्व पुस्तकांमधून दलितांची हेटाळणी करणारे उल्लेख काढून टाकायला हवेत. याची सुरुवात म्हणून संत तुलसीदासांच्या रामचरितमानसातील प्रसिद्ध ओळी
“ढोल, गवार, शूद्र, पशु, नारी ये सब ताडन के अधिकारी” गाळाव्या, असे सूरजभान सुचवतात.
आता वरील ओळी खेडूत, दलित, पशू आणि स्त्रियांना अपनामास्पद आहेत, हे तर खरेच आहे. ढोल बडवावा तसे या साऱ्यांना बडवावे, असे त्या सांगतात.