मी नास्तिक आहे. सध्याचे प्रचलित धर्म जे शिकवतात तसा कुठलाही ईश्वर/अल्ला/प्रभू अस्तित्वात नाही, तसेच स्वर्ग-नरक अस्तित्वात नाही असंच माझं मत आहे. स्वर्ग-नरकाच्या कल्पनेतून मांडलेल्या पाप-पुण्याच्या थोतांडावर माझ्यासह हजारो नास्तिकांचा विश्वास नाही. पण प्रश्न इथेच संपत नाही.
माझ्या सभोवती कित्येक श्रद्धावान लोक आहेत ज्यांच्याकडे तर्कावर जगण्याइतकी विचारक्षमता आणि त्याद्वारे तयार होणारी सारासार विवेकबुद्धी नाही. जीवन व्यतीत करण्यासाठी कशावर तरी श्रद्धा ठेवणे ही त्यांची मानसिक गरज आहे. अशा भोळ्याभाबड्या लोकांचा ईश्वररूपी आधार काढून घेतला तर त्यांचं जगणं असह्य होईल, असं मला नेहमी सुचवलं जातं.