कार्यक्रमाचे आयोजक आणि उजेडाकडे जाण्याची इच्छा असणाऱ्या आणि उजेडाच्या दिशेने बघत असणाऱ्या सगळ्या बंधुभगिनींनो,
कायदा, कायद्याचे क्षेत्र किंवा एकूणच कायद्याच्या संदर्भात बोलायचे झाले तर, सध्या काही खूप चांगले वातावरण नाही हे नक्की. आपण कायद्याकडे जसे बघतो, तसे अर्थ आपल्याला त्यात दिसतात. परंतु कायदा किंवा न्याय मिळणे प्रक्रियावादी होणे हे अत्यंत विदारक सत्य आहे. महाराष्ट्रातल्या अनेक न्यायालयांनाच नाही तर, भारतातल्या अनेक न्यायालयांना न्यायमंदिर असे नाव दिलेले आहे. आता काही मुसलमान लोकांनी म्हटले की न्यायमंदिरच्या ऐवजी न्यायमस्जिद म्हटलेले चालेल का? हा प्रश्न उभा केलेलाच चालणार नाही अनेकांना.