विषय «लैंगिकता»

जागतिकीकरण आणि लैंगिकताविषयक बदल

जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा आणि प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत झाला आहे, हे माझ्या प्रतिपादनाचे प्रमुख सूत्र आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचे पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे.

नवे पर्व, नवे प्रश्न

नव्वदचे दशक आले. खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खाउजा) पर्व सुरु झाले आणि सर्व काही वेगाने बदलले. त्यापूर्वी शहरीकरण, आधुनिकीकरण, शिक्षणाचा प्रसार इ. घटकांमुळे खेड्यांतील व शहरांतील वातावरण हळूहळू बदलत होते. स्त्रीमुक्तीचळवळ आकार घेत होती. बलात्कार, माध्यमांतून घडणारे स्त्रीदेहाचे प्रदर्शन, असे मुद्दे सार्वजनिक चर्चेत आणण्याचा तिचा प्रयत्न सुरू झाला होता.

पुढे वाचा

पुरुषत्वाचा लैंगिक मसुदा – अर्ध्या वाटेवरचे विचार

अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ने एके काळी मला झपाटलं होतं. ही मुंबईची आणि मुंबईतल्या माणसांची गोष्ट आहे. प्रत्येक पात्राच्या अवतीभवती घडणाऱ्या घडामोडींमधून मुंबई ‘घडते’ आणि कादंबरी पुढे सरकते. यात अय्यर नावाचा पत्रकार आहे, डी-कास्टा हा कामगार पुढारी आहे, मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे आहेत, काही आम आदमी – दयानंद पानिटकर, किशोर वझे हे आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक दुय्यम व्यक्तिरेखा आहेत. कादंबरीने जे झपाटलं, त्यात एक कोन त्यातील काही थेट लैंगिक संदर्भाचा होता. मी ही कादंबरी वाचली, तेव्हा वीस-बावीस वर्षांचा होतो. काही मुली किंवा स्क्रीनवरील काही ललनांविषयी विशेष ममत्व वाटण्याचा हा काळ होता.

पुढे वाचा

‘द नेकेड ॲण्ड द न्यूड’

[बघण्याच्या पद्धती  (Ways of Seeing) हे पुस्तक जॉन बर्गर ह्यांच्या बी.बी.सी. टेलिव्हिजन सीरीजवर आधारलेले आहे. 1972 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाने पाश्चात्त्य कलाकृतींकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. पाच लेखकांनी मिळून हे पुस्तक ‘घडवले’ आहे. ‘बघणे बोलण्याच्या आधी येते. बोलायच्या आधी मूल बघायला आणि ओळखायला शिकते’ ह्या वाक्यापासून सुरुवात झालेले हे पुस्तक आपले बघणे हे आपल्या श्रद्धा, ज्ञान आणि परंपरा ह्यांनी कसे संस्कारित झालेले असते हे युरोपिअन तैलचित्रांच्या माध्यमातून तपासते. पुस्तकातील सात निबंधांमधून लेखक वाचकाच्या मनात प्रश्न जागे करू इच्छितात.

पुढे वाचा

खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?(भाग १)

साधना साप्ताहिकाच्या २८ मे १९९४ च्या अंकामध्ये श्रीमती शांता बुद्धिसागर ह्यांचा ‘खरी स्त्रीमुक्ति कोठे आहे?’ हा लेख प्रकाशित झाला आहे. त्यांनी ‘चारचौघी‘ ह्या नाटकाची सविस्तर चर्चा करून शेवटी आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्या म्हणतात की, “काही मूल्ये—विचार हे शाश्वत स्वरूपाचे असतात. सध्या आपण अशा तर्‍हेची विचारधारा तरुणांच्या पुढे ठेवीत आहोत की स्त्रीपुरुष कोणत्याही जातिधर्माचे असोत, सुखी कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एका वेळी एकाच स्त्री-पुरुषाचे सहजीवन होणे हीच आदर्श कुटुंबरचना असली पाहिजे. परंतु केवळ पुरुष जे जे करतो ते ते स्त्रीलाही करता आले पाहिजे ह्या एकाच विचाराच्या आहारी गेल्यामुळे येथे सर्वच प्रश्नांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहिले गेले आहे व ते सुद्धा एकांगी आणि आत्मकेन्द्रित दृष्टिकोणातून.

पुढे वाचा

कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं?

स्त्री, अत्याचार, नकोशी, स्त्री-पुरुष नाते, हिंसा
—————————————————————————–

स्त्री आणि हिंसा हे नाते अतिशय गुंतागुंतीचे आहे. काही प्रकारच्या स्त्रियांना, उदा. संतानहीन, विधवा, कुरूप –त्या‘तशा’ असल्यामुळे हिंसा भोगावी लागते. पण ‘तशा नसणाऱ्या’ स्त्रियांनाही कुठे सुटका आहे हिंसेपासून? आणि हिंसा करणारा पुरुष तरी ती करून सुखी, समाधानी असतो का? इत्यादी प्रश्नांचा वेध घेणारा लेख.
——————————————————————————

आमच्या गावाकडं सुगीचा हंगाम चालला होता. अशा वेळी बाया उडदामुगाच्या शेंगा तोडताना एकमेकींची फिरकी घेत राहतात. एका मैतरणीचा काळानिळा पडलेला ओठ पाहून बाजूची म्हणली, “काय गं, हे असं झालं ते प्रेमाचं म्हणावं की रागाचं?’‘

पुढे वाचा

आगळी सर्वान्या

लिंगबदल, तृतीयपंथी, लिंगसंवेदनशीलता
—————————————————————————–
आज एकविसाव्या शतकातही आपण तृतीयपंथींना व अस्पष्टलिंगींना स्वतंत्र ओळख देऊ शकत नाही?…. हा लेख वाचल्यावर तरी आपली लिंगसंवेदनशीलता वाढेल अशी आशा आहे.
—————————————————————————–
ज्याच्याशी तुम्ही मित्र म्हणून गप्पागोष्टी केलेल्या असतात, अगदी कालच त्याच्याकडून एका टेक्निकल टॉपिकवर मत मागितलेलं असतं, जो इतके दिवस अत्यंत सौम्य, सौजन्यशील संवाद साधणारा असतो, तो अचानक तुम्हाला आत्यंतिक रागाने लिहितो – “तुमने मेरा अपमान किया है… तू मला सर म्हणून संबोधलंस?” क्षणभर माझ्या मनात धस्संच. मी ते वाक्य “सर नाही संबोधलंस’‘ असंच वाचलं नि तीनतीनदा खात्री करून घेतली की मी सर असंच संबोधलं आहे.

पुढे वाचा

युद्ध माझं सुरू

स्त्री, दुःख, हिंसा, बलात्कार, समस्या
—————————————————————————–
पुण्यात राहणारी लष्करातली उच्चपदस्थ महिला अधिकारी परळी वैजनाथहून परतत असताना तिच्यावर 2010 च्या एप्रिल महिन्यात चार दरोडेखोरांनी बलात्कार केला. बलात्काराच्या घटनेनंतर खचून न जाता तिनं या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. सहा वर्षांच्या न्यायालयीन लढाई नंतर तिला न्याय मिळाला आहे. या चौघा नराधमांना जन्मठेपेची शिक्षा मोक्का न्यायालानं दिली आहे. या सहा वर्षांच्या कालखंडात तिला कुठल्या प्रसंगांतून जावं लागलं, तिलाकाय काय सहन करावं लागलं, पोलिस खात्याचं सहकार्य कसं मिळालं या सगळ्याचा तिच्याशी प्रत्यक्ष भेटीत बोलून घेतलेला हा वेध…
—————————————————————————–
लष्करातली त्रेचाळीसवर्षीय उच्चपदस्थ महिला अधिकारी परळीवैजनाथच्या दर्शनाहून पुण्याला परतत असताना चार तडीपार गुंडांनी पाठलाग करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पुढे वाचा

भाबडी परिभाषा

‘जिथून सुरू होतं दुसऱ्याचं नाक
तिथेच माझ्या स्वातंत्र्याचा अंत होतो’

अशा तऱ्हेने स्वातंत्र्याला परिभाषित करताना
स्त्रियांचा विसर पडला
की
त्यांच्यापाशी नाकाहून अधिक
उन्नत जे काही आहे
त्याला तुम्ही स्वतःच्या स्वातंत्र्यात सामील करून घेतलं?

वर्गलढा आणि स्त्री-पुरुष लढा ह्यांतील साम्यभेद

[द सेकंड सेक्स ह्या स्त्रीवादावरील अग्रगण्य पुस्तकाची लेखिका सिमाँ दि बोवा आणि प्रसिद्ध तत्त्वचिंतक, लेखक जाँ पॉल सार्च ह्यांनी विसाव्या शतकात केलेला सहजीवनाचा प्रयोग अनेक अर्थांनी नावीन्यपूर्ण व वादळी ठरला होता. पुरुषाने वर्चस्व गाजवायचे आणि स्त्रीने त्याच्या छायेप्रमाणे राहायचे ह्या जागतिक गृहीतकाला छेद देत ही दोन स्वतंत्र विचाराची व्यक्तिमत्त्वे विवाह न करता जन्मभर एकत्र राहिली. तो स्त्रीवादी चळवळीच्या सुरुवातीच्या बहराचा काळ होता. तसेच मार्क्सवादाचाही प्रभाव जगभरात होता. बहुतांश स्त्रीवादी लेखन हे स्त्रियांनी केलेले आहे. पुरुषांनी त्यावर सोयिस्कर मौन बाळगले आहे असे मानतात.

पुढे वाचा

सिमाँ दि बोवा

प्रिय सार्च, मला महिलाप्रश्नाविषयी तुझी मते जाणून घ्यायची आहेत. ते मुख्यतः ह्या कारणासाठी, की तू ह्या विषयावर कधीही मोकळेपणाने बोलला नाहीस. आणि मला विचारायचे आहे, तेही हेच, की तू जर कृष्णवर्णीय, कामगार इत्यादी सर्वच शोषितांबद्दल बोलतोस, तर स्त्रियांबद्दल का नाही ? सार्च – मला वाटते, ह्याचे मूळ कारण माझ्या बालपणात दडलेले आहे. मी महिलांच्याच घोळक्यात लहानाचा मोठा झालो. माझी आई व आजी दोघींनी माझे खूप लाड केले. माझ्या अवतीभवती अनेक लहान मुली असत. त्यामुळे मुली व महिला हेच एका परीने माझे विश होते.

पुढे वाचा